४ वर्षांची पोरगी म्हणतेय मी तर ९ वर्षांपूर्वीच जळून मेले होते

१९९५ सालचा ‘करण- अर्जुन पिक्चर, जो बॉलिवूडच्या आजपर्यंतच्या सगळ्यात सुपर – डुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. सलमान आणि शाहरुखच्या जोडीने आजही लोकांच्या मनावर राज्य केलंय. या पिक्चरचे डायलॉग आजही मार्केट खातात. एवढंच नाही तर तुम्ही राजस्थानात कधी भटकायला म्ह्णून गेलाय तरी तिथं पुष्कर म्हणून गाव या पिक्चरमुळेच फेमस झालंय, आपण अशी म्हणू शकतो कि एक प्रकारचं टुरिस्ट प्लेस झालय.

असो.. आपला विषय भरकटायला नको. तर ह्या पिक्चरची  स्टोरी होती पुनर्जन्मावर. ज्यात करण आणि अर्जुन असलेल्या सलमान आणि शाहरुख खानचा  पुनर्जन्म होतो आणि ते आपल्या मागच्या जन्माचा बदला घेतात. आता  पिक्चरची स्टोरी आहे म्हणून चांगली वाटली. पण खऱ्या आयुष्यात पुनर्जन्म सारख्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर लोक खुळ्यात काढतील. पण राजस्थानात म्हणे खरचं पुनर्जन्म झालाय… 

आता आधी एक गोष्ट क्लियर करू कि, भिडूचा सुद्धा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. पण व्हायरल होतंय म्हंटल्यावर ते आपल्यापर्यंत पोहोचवणं आपलं कामचं आहे. पण जेव्हा ही स्टोरी भिडूला समजली ना तेव्हा दोन मिनिट आपण सुद्धा हँग झालो.

तर झालंय असं कि, राजस्थानमधील राजसमंद इथल्या एका ४ वर्षाच्या मुलीनं तिच्या पुनर्जन्माबद्दल दावा केलाय, जो खरचं धक्कादायक आहे. ती तिच्या भूतकाळात ज्या गोष्टी सांगतेय, तिचा मागच्या जन्मात केव्हा आणि कसा मृत्यू झाला, तिच्या घरी कोण- कोण आहे हे सगळं आणि ते पण एकदम अचूक. तीच बोलणं ऐकून आई-वडिलांपासून पार नातेवाईक आणि गावातल्या मंडळींची सुद्धा झोप उडालीये. 

राजस्थानातल्या नाथद्वाराला लागून असलेल्या परावल या गावात राहणाऱ्या रतनसिंह चुंडावत यांना ५ मुली आहेत. रतनसिंह एका हॉटेलमध्ये काम करतात. त्यांची धाकटी मुलगी किंजल सध्या ४ वर्षाची आहे. पण तिचं कोणाला सुद्धा हैराण करेल असं..ती सारखी आपल्या भावाला आणि आपल्या आई- वडिलांना भेटायचंय असं म्हणते. आता सुरुवातीला रतनसिंह यांच्या कुटुंबीयांनी याकडं दुर्लक्ष केलं. 

पण काही दिवसांपूर्वी किंजलची आई दुर्गा हिने तिला वडिलांना बोलवायला सांगितलं. तेव्हा किंजल म्हणाली, पप्पा तर पिपलांत्री गावात आहेत. तीच हे उत्तर ऐकून तिची आई हैराण झाली. आई दुर्वाने पुन्हा किंजलला विचारले, तर किंजल म्हणाली, 

‘हो तेच माझं गाव आहे. आई-वडील आणि भावासह माझं सगळं कुटुंब पिपलांत्री इथं आहे. बाबा ट्रॅक्टर चालवतात. ९ वर्षांपूर्वी ती जळाले होते, ज्यात माझा जीवसुद्धा गेला होता, मग ऍम्ब्युलन्सने मला इथे सोडले.  

मुलीचं हे सततचं बोलणं ऐकून दुर्वा वैतागली होती, तिने रतन सिंह यांना हि गोष्ट सांगितली. आपल्या मुलीला बाहेरच काही झालंय अश्या भितींन किंजलच्या घरच्यांनी तिला मंदिरात नेलं, बाबा- बुवांना दाखवलं, डॉक्टरांकडे नेलं. पण सगळेच सांगायचे मुलगी नॉर्मल आहे. पण किंजल ऐकायला काही तयार नव्हती तिचा एकच आग्रह होता कि तिला तिच्या घरी पिपलांत्री इथं जायचंय. 

आता पिपलांत्री हे तेच गाव आहे, जिथे ९ वर्षांपूर्वी उषा नावाच्या महिलेचा जळून मृत्यू झालेला. आणि हे गाव किंजलच्या गावापासून ३० किलोमीटरवर आहे. २०१३ मध्ये उषा किचनमध्ये काम करत असताना गॅसमुळे जळाली. उषाला दोन मुलेही आहेत.

आता किंजलच्या या सततच्या हट्टाला कंटाळून तिच्या घरच्यांनी तिच्या म्हणण्यानुसार वागायचं ठरवलं. किंजलची गोष्ट पिपलांत्रीच्या पंकजपर्यंत जाऊन पोहोचली. पंकज हा उषाचा भाऊ. जेव्हा किंजलने पंकजला पहिले तिचा आनंद ओसंडून वाहत होता. फोनमध्ये आई आणि उषाचा फोटो दाखवल्यावर ती ढसाढसा रडायला लागली. त्यांनतर मात्र किंजलच्या घरच्यांनी पिपलांत्री गाठलं. पण जसे -जसे तिच्या घरचे त्या गावाकडे जायला निघाले किंजल स्वतः आपल्या घराचा पत्ता सांगायला लागली आणि सगळ्यांना घरी नेलं. 

उषाची आई गीता पालीवाल यांनी सांगितले की,

किंजल जेव्हा आमच्या गावात आली तेव्हा असे वाटले की जसं काय ती बऱ्याच वर्षांपासून सगळ्यांना ओळखतेय. तिने घरातल्या सगळ्यांना ओळखले, एवढंच नाही तर आधी ती ज्या बायकांना ओळखायची त्यांच्याशी सुद्धा किंजल बोलायला लागली. किंजलने उषाला आवडणाऱ्या फुलांबद्दलही किंजलने विचारलं कि आता कुठय. तेव्हा उषाच्या घरच्यांनी सांगितलं कि, ते झाड आम्ही ७-८ वर्षांपूर्वीच काढून टाकलयं. 

आता या घटनेनंतर किंजल आणि उषाच्या कुटुंबात चांगले संबंध तयार झालेत. किंजल ऊषाच्या घरातल्या सगळ्यांशी बोलते. उषाची आई सांगते, ‘आम्हालाही वाटतं की आपण उषाशीच बोलतोय. उषा लहानपणी अशीच बोलायची.’

तज्ज्ञ सुद्धा म्हणतायेत कि, हे होऊ शकत, ज्याला पार्ट ऑफ परसायकॉलॉजी म्हंटल जात. याआधीही अश्या घटना पाहायला मिळाल्यात.  

आता ही गोष्ट कितपत खरी आहे हे तर माहित नाही. पण भिडू ही स्टोरी आपल्याला जरा विचित्र वाटत असली तरी त्या भागातल्या आसपासच्या गावकऱ्यांनी हेच खरं असल्याचं म्हंटलंय

हे ही  वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.