कुमार सानू ते द्रविड ; क्रेड ला 90’s जॉनर कळला अन् कंपनी सुसाट सुटली

क्रेड,

च्या जाहिराती तुम्ही युट्युब किंवा टिव्ही चॅनलवर पहिली नसले हे शक्य नाही. त्यांच्या जाहिरातीत कोणीही विचार केला नसेल अस दाखविण्यात आलंय. राहुल द्रविड सारख्या शांत खेळाडूला रस्त्यावर भांडण करतांना दाखविल्यानंतर क्रेडच्या ॲप सर्वाधिक चर्चा झाली होती.

द्रविड ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर साधा राग व्यक्त करत नाही तर दुसऱ्या गाड्यांना बॅटने मारताना दाखवलंय. 

ऍडच्या खाली देण्यात आलेलं डिस्क्रिप्शन देखील वाचण्यासारखं आहे. राहुल द्रविड स्वतः लिहतात, ८ एप्रिला अजय याने मला सिंग्नलवर ओवरटेक केलं त्याने आठ दिवस नंतर येथेच भेटावं. मी त्याची वाट पाहतोय. 

तुम्ही म्हणत आसाल मग तुम्हाला परत क्रेड ची आठवण का झाली ? तर काल रात्री मित्रांबरोबर आयपीएलची मॅच पाहत होतो. प्रत्येक २-३ ओव्हरच्या मध्ये क्रेडच्या मजेशीर ऍड दाखविण्यात येत होती.  मित्राला विचारलं अरे बाबा ही क्रेड भानगड नेमकी काय आहे?

तो पण बिचारा आपल्या एवढाच हुशार निघाला म्हणाला पेटीम सारखं ॲप असेल. दुकान, हॉटेल मध्ये जाऊन ऑनलाईन पैसे करता येत असेल. त्यात वीज बिल, रिचार्ज, रेल्वेचे तिकीट काढण्याची सोय असेल. यावेळी माझ्या लक्षात आलं की, क्रेड बद्दल आपल्या एवढंच सगळ्यांना ज्ञान आहे. त्यामुळे क्रेड नेमकं काय आहे? कोणासाठी तयार केलं आहे? त्याचा फायदा कसा होतो? हे सगळं जरा बघू या म्हटलं. 

 नाक्यावरील किराणा दुकानात तुमची आमची उधारी असते. तसंच काहीसा प्रकार हा क्रेडिट कार्डचा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला कमी वेळत कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम क्रेडिट कार्ड करत. सध्या क्रेडिट कार्ड वापरण्याची संख्या वाढत चालली आहे. 

एक अहवालानुसार २०२१ पर्यंत भारतात ६२ लाखांपेक्षा अधिक लोकं क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. 

क्रेडिट कार्ड वरून वस्तू खरेदी केल्यावर ते पैसे महिन्याभराने भरता येतात. मात्र, आपण तारीख विसरलो तर त्यावर व्याज चढत. तुमचा क्रेडिट स्कोर खराब होतो. पुढच्यावेळी तुम्हाला बँक कर्ज देत नाही. अशा विसरभोळ्या लोकांच्या मदतीसाठी कुणाल शहाने क्रेड ॲपचा तयार केले आहे. 

२०१८ ला स्थापन झालेल्या का कंपनीने एप्रिल २०२१ मध्ये युनिकॉर्न क्लब मध्ये प्रवेश केला. भारतातील एकूण क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांपैकी २२ टक्के लोकं क्रेडच्या माध्यमातून  आपले बिल भरत असल्याचा दावा कुणाल शहा यांनी केला आहे. 

क्रेडचे फायदे काय आहेत, 

आपण जेवढ्या बील भरतो आपल्याला तेवढंच क्रेड कॉईन मिळतात. आपण त्यावर कॅशबॅक मागू शकतो किंवा या ॲप वर विकण्यात येणाऱ्या वस्तू खरेदी करू शकतो.  

प्रत्येकवेळी आपण बील भरल्यानंतर Gpay प्रमाणे कधी ६ रुपये मिळतात तर तुम्ही लक्की असाल तर बिला एवढंच कॅशबॅक मिळू शकतो. या एका स्कीममुळे क्रेड वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जर तुम्ही एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड वापरणार असाल तर त्याच सगळं मॅनेजमेंट क्रेडवर एकाच ठिकाणी होत. ॲपवरच तुम्हाला क्रेडीकार्डची सगळी माहिती मिळते. 

क्रेडची संकल्पना नेमकी काय आहे. 

क्रेडिट कार्ड ही काही नवी संकल्पना नाही. तुम्हाला क्रेडिट म्हणजेच पैसे उपलब्ध करून देते. क्रेडिट कार्डच बिल बँक आठवण करूनही तुम्ही ते भरले नाही की, त्यावर चढ्या दराने व्याज चढवितात. तुमचा क्रेडिट स्कोर खराब होतो. पुढच्यावेळी कुठलीही बँक कर्ज देतांना हजारदा विचार करते. अशांसाठी मुख्यतः क्रेड ॲप तयार करण्यात आलं. 

तसेच क्रेडकडून हाउस रेंट, ९ टक्के व्याजाने पैसे सुद्धा उपलब्ध करून देते. २०१८ मध्ये क्रेडची  स्थापना मुंबईतील कुणाल शहा यांनी केली. 

दरवेळी तुम्ही क्रेडिट कार्डच वेळेवर बिल भरता आणि तुमचा क्रेडिट स्कोर सुद्धा चांगला आहे असे असतांना तुम्हाला त्याचा काहीच फायदा होत नाही. अशा ग्राहकांसाठी एक वेगळा प्लँटफॉम तयार करण्याचा विचार कुणाल शहा यांच्या डोक्यात होता.

वेळेवर बिल भरणाऱ्या क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना विशेष असं काही मिळत नाही. त्यांचे प्रश्न कोणी सोडवत नाही. अशांची संख्या अधिक आहे. या लोकांना लक्ष करून शहा यांना क्रेडची संकल्पना सुचली. 

कुठलीच बँक तुम्ही वेळेवर कर्ज फेडले म्हणून तुम्हाला बक्षीस देत नाही. हीच पद्धत शहा यांना बदलायची होती. त्यासाठीच क्रेडची स्थापना केली. वेळेवर टॅक्स भरणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्यांना रिवार्ड द्यायचा असा हेतू शहा यांचा होता. 

कुणाल शहा हे मूळचे मुंबईचे. त्यांचे लहानपण दक्षिण मुंबईत गेले. ते व्यावसायिक कुटुंबातून येतात. मध्येच एमबीए सोडत संदीप टंडन सोबत पैसाबँक नावाची एक वेबसाईट सुरु केली होती. पैसाबँक च्या माध्यमातून जर खरेदी केली तर कॅशबॅक, कुपन देत होते. हि कंपनी सोडली आणि फ्री रिचार्ज नावाचं नवीन कंपनी सुरु केली होती. २०१७ हि कंपनी ऍक्सिस बँकेला विकली आणि २०१८ मध्ये क्रेडला सुरुवात झाली. 

ऑफरची माहिती आणि वस्तू ॲपवर उपलब्ध आहेत,  

क्रेड हे बिल भरतांना ऑफरची माहिती देण्यात येते. त्यामुळे ते वापरणाऱ्याला आपल्या किती फायदा होणार याची माहिती मिळते. अनेक कंपन्यांचा वस्तू ॲपवर उपलब्ध आहेत ते दाखविण्यासाठी क्रेड संबंधित कंपनीकडून पैसे घेते. प्रत्येकवेळी क्रेड क्रेडिट कार्ड वापरण्याला ऑफर देते त्यातून क्रेडला पैसे मिळतात.     

ॲप वापरून बिल भरणाऱ्याचा डेटा क्रेड जमा झाला आहे. या डेटाच्या आधारेच क्रेड आपल्या वापरकर्त्यांना ऑफर देत असते. इतर आर्थिक संस्था देखील क्रेडकडे वारकर्त्यांच्या डेटाची मागणी करते. या डेटाच्या बदल्यात क्रेड मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. 

क्रेडने अगोदरच जाहीर केले आहे की, ॲप वापरून बिल भरणाऱ्याकडून कुठलीही फी घेतली जात नाही. कंपनी ही ॲपच्या माध्यमातून ज्या इतर सेवा पुरविते त्यातून पैसे कमविते. या कंपनीची नेट व्हॅल्यू दीड हजार कोटींच्या पुढे आहे. 

 ४ वर्षांपूर्वी सुरु झालेली हा स्टार्टअप 

तुम्हाला आम्हाला फायदा करून देणारी कंपनी सुद्धा चांगलीच मोठी होत चालली आहे. नवीन काही दिल्यास मार्केट मध्ये जागा फिक्स होत असते हे कुणाल शहा यांच्या उदाहरणावरून समजून येते.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.