हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या एम एफ हुसेनला कतारने नं मागता नागरिकत्व दिलं होतं

सध्या देशात नूपुर शर्मा प्रकरणाने रान पेटलं आहे. टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर ईशनिंदेचे देखील आरोप झाला होता. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी होत होती. यावरून कानपूरमध्ये दंगा देखील झाला होता. मात्र भारतीय जनता पार्टी असू दे की केंद्र सरकार यांच्याकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती.

मात्र सूत्र तेव्हा हालली जेव्हा अरब राष्ट्रातून भारताच्या मालाला बॉयकॉट करण्याच्या, या राष्ट्रातून हिंदू भारतीय कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या बातम्या येऊ लागल्या. 

आणि शेवटी मग नुपूर शर्माला ‘फ्रीन्ज इलिमेंट’ म्हणत भाजपातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कतार, कुवेत या देशातील राजदूतांनी पत्रकं काढून या प्रकरणावर स्पष्टीकरण पण दिलं.

मात्र याचवेळी विषय निघाला तो म्हणजे एम एफ हुसेन यांचा आणि आज बॉयकॉट घालण्यात पुढं असलेल्या कतार या अरब राष्ट्राचा. भारतातल्या सर्वात प्रतिभावंत चित्रकरांमध्ये एम एफ हुसेन यांचं नाव घेतलं जातं. 

१९५५ मध्ये पद्मश्री , १९७३ मध्ये पद्मभूषण आणि १९९१ मध्ये पद्मविभूषण यावरूनच त्यांचं काम कळतं.

जगभरातल्या प्रदर्शनांमध्ये त्यांची चित्र कोट्यवधींच्या घरात विकली गेली. विशेष म्हणजे एमएफ हुसेन म्हणजेच  मकबूल फिदा हुसेन यांचं महाराष्ट्राशी विशेष नातं आहे. हुसेन यांचा जन्म झाला, आपल्या पंढरपुरात. तर ते शिकले मुंबईतल्या जेजे स्कुल ऑफ आर्ट्समध्ये.

मात्र याचवेळी त्यांची चित्रंही वादाचा विषय ठरली होती.

१९९६ मध्ये एका हिंदी मासिकाने १९७० च्या दशकात एम एफ हुसेन यांनी काढलेल्या हिंदू देवतांच्या चित्रांवर प्रक्षोभक लेख प्रकाशित केल्यानंतर श्री हुसेन यांच्या अडचणींचा काळ सुरू झाला. त्यांची  भारतमातेच्या आणि देवी सरस्वतीची चित्रं अपमानकारक असल्याचा आरोप झाला.

यामुळे भारतात त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हेगारी खटले दाखल झाले. ज्यात मुख्यतः एम एम एफ हुसेन यांनी चित्रांद्वारे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत होता.

श्रीमान हुसेन यांचाच्यविरोधात तेव्हा भारतातील विविध न्यायालयांमध्ये त्यांच्याविरुद्ध ९०० खटले दाखल झाल्याचं सांगण्यात येतं.

हिंदुत्त्ववाद्यांकडून ठीक ठिकाणी हुसेन यांच्याविरोधात हिंसक आंदोलनं करण्यात येत होती. त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनांची तोडफोड करण्यात येत होती. या सगळ्यामुळे त्यांच्या चित्रांचे भारतात प्रदर्शन देखील होत नव्हतं.

मग अखेर २००६ मध्ये एम एफ हुसेन यांनी भारत सोडला.

या काळात ते दुबईमध्ये राहिले. त्यानंतर ते जगभर फिरत होते मात्र भारतात मात्र ते नव्हते. पुढे त्यांनी BBC ला दिलेल्या त्यांच्या शेवटच्या मुलाखतीमध्ये २००५ मध्येच भारत सोडल्याचं आणि काही प्रोजक्ट करण्यासाठी भारताबाहेर आल्याचं म्हटलं होतं.

मात्र एकदिवस एक इंटरेस्टिंग न्युज आली. 

कतार या अरब देशाने एम एफ हुसेन यांना नागरिकत्व दिलं. 

फेब्रुवारी २०१० मध्ये कतारने भारतात ईशनिंदेचा आरोप झालेल्या एम एफ हुसेन यांना त्यांच्या देशाचं नागरिकत्व दिलं होतं.

WhatsApp

विशेष म्हणजे कातरचा समावेश जगातील अशा देशांमध्ये होतो जिथलं नागरिकत्व मिळवणं सगळ्यात अवघड मानलं जातं. ज्या व्यक्तीचे वडील कतारी आहेत त्यांनाच नागरिकत्व सहजासहजी मिळतं. वर्षाला फक्त ५० नागरिकांनाच नागरिकत्व देण्यात येतं, त्यासाठी पण २५ वर्ष सलग देशात राहण्याची अट आहे.

मात्र एम एफ हुसेन यांच्यासाठी असा कुठलाही निकष लावण्यात आला नव्हता.

विशेष म्हणजे कतारच्या राष्ट्रीयत्वासाठी हुसेन यांनी अर्ज देखील केला नव्हता. कतारच्या राजघराण्याच्या आदेशावरून त्यावेळी ९५ वर्षे वय असलेल्या एम एफ हुसेन यांना नागरिकत्व बहाल करण्यात आलं होतं.  कातरचं राजघराणं ‘आधुनिकतेकडे’ झुकणारं असल्याने हुसेन यांना नागरिकत्व देण्यात आल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि एम एफ हुसेन भारतात परतल्यावर त्यांना पूर्ण सुरक्षा देण्यात येइल असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत होतं.

हुसेन यांच्या विरोधात दशकभर आंदोलनं करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने त्यावेळी हुसेनसारखे देश भारत सोडत असतील तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.

९ जून  २०११ मध्ये लंडन येथे एम एफ हुसेन यांचा मृत्यू झाला होता.

हे हि वाचा भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.