विश्वनाथन आनंदच्या आधी, सुतारकाम करणारे रफिक खान बुद्धीबळातले सुपरस्टार होते…

आपल्या देशात आपण काय खेळ खेळतो यावर आपल्या बुध्दीची बुद्धिमत्ता ठरवली जाते. त्यातही आपल्यासारख्याला कोणी बुद्धिबळ खेळताना पाहिलं तर मग आपण जोकचा विषय झालोच म्हणून समजा. पण असे अनेक भिडू लोकं आहेत ज्यांनी आपलं टॅलेंट जगाला दाखवून दिलं. अनेकदा असे लोकं आपल्याला दिसतात की त्यांचा बाज वेगळा असतो पण एखाद्या गोष्टीत ते इतके टॅलेंटड असतात की तिथं त्यांचा हात कोणी धरू शकत नाही.

आता रीलवर व्हायरल झालेले लोकं आपण पाहतोच म्हणा म्हणजे एखादा पोलिसवाला गाणे गाताना दिसतो तेंव्हा आपण आपसूकच लाईक करतो. तर मेन विषय होता पेशाने सुतार असलेल्या रफिक खान यांनी पहिल्यांदा भारताला चेस ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. तर ही कामगिरी त्यांनी कशी केली याची डिटेल माहिती आपण घेणं आवश्यक आहे.

मध्यप्रदेशचा आणि बुद्धिबळाचा दुरान्वयेही संबंध नव्हता तेव्हाचा हा काळ. उलट बिमारू राज्य म्हणून मध्यप्रदेश त्याकाळात प्रसिद्ध होतं. पण हेच मध्यप्रदेश पुढे देशाचा अभिमान वाटावा असं राज्य ठरलं कारण या मध्यप्रदेशमध्ये भारताला पहिल्यांदा चेस ऑलिम्पियाडमध्ये मेडल मिळवून देणारा हिरा जन्माला आला होता आणि त्याचं नाव होतं रफिक खान, व्यवसाय सुतारकाम फ्रॉम द भोपाळ. हीच त्यांची पुढे ओळख बनली.

1946 साली रफिक खान यांचा जन्म झाला. कारपेंटर हा त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय होता. सुतारकामात रफिक खान तरबेज होत गेले. कारण हाच एक व्यवसाय त्यांना कसाबसा जमेल असं त्यांच्या घरच्यांना वाटत होतं.

सुतार कामातून त्यांचा एक चहाचा ब्रेक ठरलेला असायचा आणि त्यातून दुकानावर येणाऱ्या लोकांना ते बुद्धिबळ खेळताना बघायचे. हा चहाचा ब्रेक रफिक खान यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. रोजचा एक तास ते फक्त चेसचा अभ्यास करण्यासाठी काढू लागले. इंटरनॅशनल स्तरावर भारतीय बुद्धिबळ नेमकं कुठे आहे याचा ते सतत आढावा घ्यायचे आणि त्यानुसार अपडेट राहायचे. 1975 रफिक खान यांनी मध्यप्रदेशाची स्टेट चेस स्पर्धा जिंकली आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावला. मेन म्हणजे ही त्यांची पहिलीच वेळ होती एखाद्या व्यासपीठावर चेस खेळण्याची.

1976 साली बी लेव्हलची नॅशनल स्पर्धा रफिक खान खेळले आणि त्यात सलग 9 वेळा ते विजयी झाले. 13 पॉइंट्सने जिंकण्याचा रफिक खान यांचा रेकॉर्ड अजुनही कोणाला मोडणे जमलेला नाहीये. पण इथ अजुन एक धडा त्यांना मिळाला. याच वर्षी एका स्पर्धेत रफिक खान यांचा खेळ लईच वाईट झाला मग त्यांनी ब्रेक घेत पुन्हा सराव सुरू केला. कमबॅक कशाला म्हणतात तर याला, अफाट परिश्रम घेऊन 1978 साली रफिक खान पुन्हा मैदानात आले आणि या बुद्धिबळाच्या पटावर विजयी झाले. 

त्याकाळी रफीक खान हे चेस जगतातले सेलिब्रिटी होते पण भारतीय प्रशासनाने त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. पण भारतीय जनता पाठीशी असल्याने रफिक खान हे पहिले खेळाडू ठरले जे ऑलिम्पियाड साठी उतरणार होते.

लोकांना नाराज न करता रफिक खान सिल्व्हर मेडल जिंकून आले. ही काय साधीसुधी घटना मुळीच नव्हती. पहिल्यांदा भारताला चेस ऑलिम्पियाडमध्ये मेडल मिळालं होतं.

या विजयानंतर मात्र रफिक खान काय थांबले नाही आणि त्यांचा विजयरथावर स्वार झालेला वारू चौखूर उधळत सुटला. 1984, 1986 आणि 1992 च्या पिलू मोदी या स्पर्धेत रफिक खान अजिंक्य राहिले. 1982 साली रफिक खान हे लुरांस टुर्नामेंटचे स्टार खेळाडू ठरले.

रफिक खान यांच्या या कामगिरीच्या जोरावर मध्यप्रदेश चर्चेत आलं आणि तिथल्या तरुणांना स्फूर्ती मिळाली. यावरून बऱ्याच चर्चा झडल्या, बातम्या पडल्या की सुतारकाम करणारे रफिक खान यांची ही कामगिरी. 

पण मुळात कुठलंही काम छोट- मोठं अस काही नसतं पण आपण आपली आवड जपून कसं जगभर नाव कमवू शकतो याचं सगळयात भारी उदाहरण म्हणजे रफिक खान. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.