लैंगिक गुन्ह्यासाठी १०७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मुस्लिम धर्मगुरूला ठोठावण्यात आली आहे…
लोकांना धार्मिक गोष्टीत अडकवून ठेवणे आणि त्यातून त्या भोळ्या लोकांची फसवणूक करणे किंवा लैगिंक शोषण करणे या घटना जगाला नवीन नाहीत.
युरेशियाचा देश असलेल्या तुर्कस्तानमधून एक अत्यंत घृणास्पद प्रकरण समोर आले आहे ते म्हणजे तुर्कस्तानमधील मुस्लिम धर्मगुरू अदनान ओक्तार याला लैंगिक गुन्ह्यासाठी 1075 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रसिद्ध धार्मिक नेत्याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती आणि आता त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुस्लिम धर्मगुरू अदनान ओक्तार नक्की कोण आहे ?
अदनान 1990 च्या दशकात जगासमोर आला. धर्माच्या आधारावर भरपूर कमाई केली आणि तुर्कस्तानच्या सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये त्यांची गणना होते. अदनानचे स्वतःचे टीव्ही चॅनल देखील होते जे 2011 मध्ये सुरू झाले होते. तुर्की मीडिया वॉचडॉग RTK द्वारे चॅनेलला अनेक वेळा दंड ठोठावण्यात आला आणि नंतर बंद करण्यात आला.
अदनान हा तुर्कस्तानमधील एका पंथाचा प्रमुख आहे जो लोकांना कट्टरतावादाबद्दल भाषणे देत असे. हा धर्मगुरू टीव्हीवर प्रवचन देत असे आणि त्याला हजारो मुलींनी घेरले असायचे. भाषणाच्या वेळी अदनान टीव्ही शोमध्ये या महिलांसोबत डान्सही करायचा. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, अदनान या मुलींना ‘किटन’ म्हणायचा. अदनानवर लैंगिक गुन्हे, मुलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि राजकीय आणि लष्करी हेरगिरी अशा गंभीर आरोपांनाही सामोरे जावे लागले आहे.
आता अजून एक धक्कादायक प्रकरण म्हणजे तुर्कस्तानच्या अनादोलू न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 236 जणांवर अजूनही खटला सुरू असून त्यापैकी 78 जण ताब्यात आहेत. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अदनानने सुमारे 1000 महिलांशी संबंध असल्याचे मान्य केले होते. एका महिलेने न्यायालयात सांगितले होते की, अदनानने तिच्यासोबत आणि अनेक महिलांशी जबरदस्तीने संबंध ठेवले होते आणि या लोकांना गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास भाग पाडले होते. अदनानच्या घरावर छापा टाकताना सुमारे ६९ हजार गर्भनिरोधक गोळ्याही जप्त करण्यात आल्या.
लोकांना धर्माच्या नावावर द्वेष पसरवणे आणि समाजात दुफळी निर्माण करण्याचं काम अदनान ओक्तार बऱ्याच वर्षांपासून करत होता. जगभरातून लोकं त्याला समज देण्याचा प्रयत्न करत होते. अनेक न्यूज चॅनलवाल्या मंडळींनी त्याला वेळीच सुधारण्याचा सल्लाही दिला होता. त्याच्या या लैंगिक शोषण, अत्याचाराची फुटेजही मीडियाने व्हायरल केली होती तरीही अदनान सुधारला नाही. शेवटी पापाचा घडा भरतोच.
आता या अदनान ओक्तारला थोडथोडकं नाही तर तब्बल 1075 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. जर नीट विचार केला तर जन्मठेपेची शिक्षा जरी असली तरी इतके वर्ष म्हणजे महाकठीण काळ आहे पण बऱ्याच लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे की शेवटी अदनान ओक्तारला एकदाची अटक झाली आणि शिक्षाही अशी मिळाली की परत कोणी असे धर्माच्या नावावर स्टंट करण्याच्या नादी लागणार नाही.
हे ही वाच भिडू :
- विखेंनी हजारो शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि पंतप्रधानांच्याकडून भाव वाढवून घेतला
- रॅपचा देव समजल्या जाणाऱ्या टूपाकची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती…
- बाबरीचा निकाल लावून माजी न्यायाधीशांनी सहकाऱ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये वाईन पार्टी दिलेली.
- मोठमोठ्या कंपन्यांना टक्कर द्यायला मध्यमवर्गीय घरातल्या मुलीनं इलेक्ट्रिक स्कुटर बनवलीये…