एड्स म्हणजे काय ? कसा होतो, त्याची लक्षणे आणि त्याच्यावरील उपाय.

एड्स म्हणजे काय? 

एड्सचा फुलफॉर्म ऍक्वायर्ड इम्युनो डेफिशियंसी सिंडरूम असा आहे. एड्स म्हणजे कुठला हि आजार किंवा रोग नाहीये. एड्स ज्याला होतो त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हळूहळू इतके रोग तयार होतात कि त्याचे शरीर रोगाचे माहेरघर बनते. आणि त्या व्यक्तीला मरणाची वाट बघण्या पलीकडे दुसरं काहीही करता येत नाही. सध्या मार्केट मध्ये काही औषध उपलब्ध आहेत. त्या औषधांचा वापर करून त्याला होत असणारा त्रास कमी करता येतो. पण एचआयव्ही बरा करता येईल अशी औषध उपलब्ध झालेलं नाहीत. आणि त्याच्यावर काही इलाज हि करता येत नाही.

एड्स नेमका का होतो ?

एचआयव्ही वायरस ने जर मानवी शरीरात प्रवेश केला तर त्या व्यक्तीला एड्स होतो. हा विषाणू मानवी शरीरात गेल्यानंतर ६  महिने  ते १० वर्ष कालावधीत कधीही त्या व्यक्तीला एड्स होऊ शकतो.

२०१५ च्या आकडेवारी नुसार भारतात २५ लाख लोक एचइव्ही ग्रस्त होते. आणि त्यातल्या ६८ हजार लोकांचा त्याच वर्षी मृत्यू झाला होता. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा एचआयव्ही ग्रस्त देश आहे.

 

एड्स झालेला आहे हे ओळखायचे कसे ? किंवा एड्स ची लक्षण. 

  • कित्येक आठवड्यां पासून ताप असेल.
  • कित्येक आठवडे खोकला असेल.
  • विनाकारण वजन कमी होत असेल.
  • तोंडामध्ये छाले येणे.
  • भूख न लागणे, अन्नावरची वासना नाहीसी होणे.
  • सतत जुलाब होणे.
  • गळा आणि बगलेमध्ये सूज येणे.
  • त्वचेवर पुरळ येणे, हे पुरळ खूप खाजतात आणि त्यांना खाजवल्यानंतर त्या ठिकाणी दुखायला लागते.
  • झोपताना घाम येत असेल.

एड्स होण्याची करणे.  

हवा, पाणी, कीटकांच्या किंवा डासांच्या चावण्याने एड्स होत नाही.

  • एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे एड्स होतो.
  • एड्स ग्रस्त व्यक्तीने रक्तदान केले असेल आणि ते रक्त जशास तसे जर दुसऱ्या रुग्णाला दिले तर त्यामुळे एड्स होतो. एड्स ग्रस्त व्यक्तीने वापरलेल्या सुया, सीरिंज, इंजेकशन  जर निरोगी माणसाला वापरल्या तर यातुन त्या निरोगी माणसाला एड्स होऊ शकतो.
  • महिला गरोदर असताना जर त्यांना एचआयव्ही झाला असेल तर त्यांना होणाऱ्या बाळाला हि एचआयव्ही होतो. मात्र योग्यवेळी यावर उपचार करता येतात. एड्स झालेल्या महिलेकडून जर बाळाला स्तनपान केले गेले तरी देखील त्या बाळाला एड्स होतो.

एड्सचा सर्वात जास्त धोका कोणाला असतो. 

  • जी लोक इंजेक्शन द्वारे मादक पदार्थांचं सेवन करतात.
  • घरापासून दूर राहणाऱ्या व्यक्ती एकापेक्षा जास्त लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवतात त्यातून हि एड्स होतो.
  • अधिक व्यक्तिसोबत केलेल्या शारीरिक संबंधातून एड्स होण्याचा धोका जास्त वाढतो.

एड्स पासून स्वतःचा बचाव कसा करता येतो. 

  •  वर सांगितलेली काही लक्षण आढळली तर तुमची आणि तुमच्या पार्टनरची एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी. कोणत्याही सरकारी दवाखान्यात हि टेस्ट मोफत केली जाते आणि टेस्ट करून घेणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवले जाते.
  • समजा एखाद्याला एसटीडी म्हणजे सेक्सुअली ट्रान्समीटेड डिसीज असतील तर त्यांनी त्यावर लवकरात लवकर औषधोपचार करून घ्यावा कारण एसटीडी झालेल्या व्यक्तीला एड्सची लागण खूप लवकर होते.
  • कंडोमचा योग्य वापर कसा करायचा हे शिकून घेतले पाहिजे.
  • आपला शारीरिक संबंध फक्त आपल्या पार्टनर सोबतच असुद्या कारण एकापेक्षा जास्त व्यक्तीं सोबत लैंगिक संबंध ठेवल्यास एड्स होण्याचा धोका वाढतो.
  • वापर केलेल्या इंजेकशन, सिरिंज चा पुन्हा वापर होत नाहीये ना याची खात्री करावी.
Leave A Reply

Your email address will not be published.