जेलमध्ये बसून सुकेश चंद्रशेखरने 200 करोडची खंडणी उकळली होती…

काही काही गोष्टी या बॉलिवूड सिनेमा म्हणा किंवा हॉलिवूड सिनेमा म्हणा यांना देखील तोंडाला फेस आणतील अशा असतात. सिनेमावरून गोष्टी इन्फ्लुएन्स असतात असं म्हणतात पण काही किस्से हे सिनेमाच्या स्क्रिप्टला सुद्धा गुलीगत धोका देणारे असतात.

अनेक चोरीचे , हाणामारीचे सिनेमे आपण पाहत असतो म्हणजे एकदम हाय हॉलटेज वाले तसाच एक प्रकार घडलाय भारतात. हा किस्सा जेव्हा उघडकीस आला तेव्हा पोलीस आणि शासकीय यंत्रणा देखील चाट पडले की एखाद्या व्यक्तीची दहशत आणि समोरच्याला बाटलीत उतरवण्याची कला काय लेव्हलची असेल. तर सोडा हा सगळा मॅटर थेट किश्यात घुसू.

जेलमध्ये बसून 200 कोटींची खंडणी वसूल करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरची ही गोष्ट. फुल शातीर बुद्धी आणि चाप्टर मस्तक वाला सीन. आता ही 200 कोटींची खंडणी साध्यासुध्या माणसाकडून उकळणं शक्य नव्हतं त्यामुळे या सुकेश चंद्रशेखरने थेट रॅनबॅक्सीच्या मालकाच्या पत्नीची फसवणूक केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने तुरुंगात बसून २०० कोटी गोळा केले.

सुकेशने रॅनबॅक्सीचे मालक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग हिला भारत सरकारचा अधिकारी असल्याचे दाखवून २०० कोटींहून अधिकची फसवणूक केली.

वास्तविक रॅनबॅक्सीचे मालक शिविंदर सिंग तुरुंगात आहेत. तुरुंगात असलेल्या बिझनेस टायकूनला जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली सुकेश चंद्रशेखरने त्याची पत्नी अदिती सिंह यांच्याकडून सुमारे २१५ कोटी रुपये उकळले. सुकेशने कधी कायदा सचिव, गृहसचिव तर कधी पंतप्रधान कार्यालयाचे प्रतिनिधी, गृहमंत्री बनून हे कलेक्शन केले. ही फसवणूक करण्यासाठी सुकेशने काही मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि व्हॉइस मॉड्युलेशन सॉफ्टवेअरचा वापर केला.

अदिती सिंगने नातेवाइकांकडून दागिने, मालमत्ता आणि कर्ज घेऊन सुकेश चंद्रशेखरला २०० कोटींहून अधिक रुपये दिले. अंमलबजावणी संचालनालयानेच अदिती सिंगला तिच्याविरुद्ध होत असलेल्या फसवणुकीबद्दल सतर्क केले.

गेल्या वर्षी 15 जून रोजी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने शिविंदर सिंह यांची पत्नी आदिती सिंह यांना पहिल्यांदा फोन केला होता. सुकेश अनूप कुमार, भारत सरकारचे कायदा सचिव बनून अदिती सिंग यांच्याशी बोलला आणि आरोग्य सेवांमध्ये त्यांना मदत करण्यास सांगितले. सुकेश अदितीला खात्री करण्यासाठी तिला आलेले कॉल नंबर तपासायला सांगतो. अदितीने नंबर तपासला असता तो लॉ सेक्रेटरी ऑफिसचा असल्याचे समजले.

त्यानंतर सुकेश अभिनव, अनूप कुमारचा कनिष्ठ अधिकारी म्हणून बोलला आणि पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सूचना मिळाल्यानंतर आपण बोलत असल्याचे आदितीला पटवून दिले. यादरम्यान सुकेशने अभिनव कुमार यांना अदिती सिंहच्या पार्टी फंडात योगदान देण्यास सांगितले. यानंतर त्याने आदिती सिंहकडे २० कोटी रुपयांची मागणी केली. असे केल्याने तिचा नवरा तुरुंगातून बाहेर येईल आणि व्यवसाय पुन्हा सुरू होईल या आशेने आदिती सिंगने अनेक वेळा पैसे दिले.

अदिती सिंगने नातेवाइकांकडून दागिने, मालमत्ता आणि कर्ज घेऊन सुकेश चंद्रशेखरला २०० कोटींहून अधिक रुपये दिले. गेल्या वर्षीच, अंमलबजावणी संचालनालयाने अदिती सिंगला तिच्याविरुद्ध झालेल्या फसवणुकीबद्दल सतर्क केले होते. यानंतर आदिती सिंहने सुकेशसोबतच्या कॉलचे सर्व रेकॉर्डिंग ईडीकडे सुपूर्द केले. त्यानंतर अदिती सिंहने सुकेश चंद्रशेखर विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

विशेष म्हणजे, रॅनबॅक्सीचे मालक शिविंदर सिंग आणि त्याचा भाऊ मालविंदर यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांविरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही भाऊ सध्या तिहार तुरुंगात बंद आहेत.

पण या सुकेश चंद्रशेखरने एकदम पद्धतशीर प्लॅन बनवला आणि जेलमध्ये बसल्याबसल्या 200 कोटी गोळा केले होते पण पापाचा घडा उशिरा का होईना भरतोचं आणि आता जेलमध्ये तो शिक्षा भोगतोय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.