याला म्हणतात नशीब, 22 वर्षांपूर्वी हरवलेले 8 कोटींचे सोने मुंबईतील कुटुंबाला परत मिळाले…

नशीब कधीही बदलू शकते. भिकाऱ्याला श्रीमंत बनवू शकते ते म्हणजे नशीब आणि राजाला भीक मागायला लावू शकते तेही नशीबच. आता लॉटरी सुद्धा अशाच लोकांना लागते ज्यांच्या ती नशिबात असते बाकी आपण आयुष्यभर जरी लॉटरी फाडत राहिलो तर काय फायदा नाही. पण नशीब जोरावर असेल तर काहीही होऊ शकतं. असाच प्रकार मुंबईतील एका कुटुंबासोबत घडला. चराघ दिन या फॅशन ब्रँडच्या मालकांना २२ वर्षांपूर्वी चोरीला गेलेले सोने परत मिळाले, सोन्याची किंमत ८ कोटी आहे.

हे सोनं मिळालय चराग दिन या फॅशन ब्रँडच्या मालकाला म्हणजेच राजू दसवानी यांना. सत्र न्यायालयाने ५ जानेवारी रोजी राजू दासवानी यांना सोने परत करण्याचा निर्णय दिला. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेले सोन्याचे नाणे, दोन सोन्याच्या बांगड्या, 1300 ग्रॅम आणि 200 मिलीग्राम वजनाच्या दोन इंगॉट्सचा समावेश आहे.

13 वर्षांपूर्वी संपूर्ण वस्तूची किंमत 13 लाख होती ती आता 8 कोटी झाली आहे. राजू दासवानी यांनी बिले आणि पावत्या सादर केल्या होत्या ज्यावरून ही मालमत्ता त्यांच्या कुटुंबाची असल्याचे सिद्ध झाले.

न्यायमूर्ती या निर्णयात म्हणाले, या तत्सम आणि विशेषत: सोन्याच्या वस्तू पोलीस कोठडीत ठेवण्यात काही अर्थ नाही. याला 19 वर्षे उलटून गेली आहेत. फरार आरोपीही अद्याप पकडलेला नाही. तक्रारदाराला मालमत्ता मिळण्यास वर्षे लागत असतील, तर ती न्याय आणि कायदा व सुव्यवस्थेची चेष्टा करण्यासारखे आहे. सरकारी वकील इक्बाल सोलकर आणि कुलाबा पोलिसांचे निरीक्षक संजय डोनर यांनी सांगितले की, त्यांना सोने परत करण्यात कोणतीही अडचण नाही.

1998 मध्येच हे सोनं नाणं आणि दागिने चोरीला गेले होते तेव्हा मालक होते अर्जन दासवानी. पैकी टोळीतील तीन आरोपी पकडले गेले आणि त्यांच्याकडून लुटीचा काही मुद्देमाल जप्त करण्यात आला. खटल्यानंतर तिघांनाही 1999 मध्ये सोडण्यात आले. अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत. अर्जन दासवानी यांचे 2007 मध्ये निधन झाले. पोलिसांनी छायाचित्रे घेऊन हस्तांतराचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाचा हा आदेश ऐकल्यानंतर दासवानी कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असल्याचे राजू दासवानी यांच्या वकिलाचे म्हणणे आहे. चोरीला गेलेला माल त्यांच्या पूर्वजांचा असून या वस्तूशी घरातील सदस्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. राजू दासवानी आणि त्यांच्या दोन बहिणी या मालमत्तेचे कायदेशीर वारस आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या बहिणींनी यापूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

म्हणजे 22 वर्षानंतर हा अनपेक्षित धनलाभ या दासवानी कुटुंबाला झाला आहे. त्यावेळी या सोन्याची किंमत लाखांत होती आणि आता ते हरवलेलं सोनं सापडलं तर त्याची किंमत कोटीच्या घरात गेलीय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.