तब्बल ७१ गाणी असलेल्या सिनेमाचा रेकॉर्ड अजूनही तुटलेला नाही

भारतीय सिनेमा म्हणजे दरवेळी काही तरी भव्य दिव्य पाहायला मिळेल असाच एकंदरीत झोन असतो म्हणजे आजवर आपण पाहिलेल्या सिनेमांनी आपल्यावर जादूच अशी केली आहे की थेटर म्हणल्यावर किंवा बॉलिवूड सिनेमा म्हणल्यावर गाणी हे कम्पल्सरी असलेलं इंव्हेंशन आहे. जर सिनेमांमधून गाणी काढून टाकली तर सिनेमा चालेल की नाही इतपत वांदे होतील. म्हणून अजूनही आपल्याकडे ऑडियंसला सिनेमाचं इन्विटेशन कार्ड म्हणुन गाणी आधी ऐकवली जातात आणि गाणी जर खतरनाक असेल तर सिनेमा चालतो हे एक साधं गणित असतं. गाण्यांशिवाय आपली सिनेसृष्टी अपूर्ण आहे. म्हणजे आपल्या भावभावना या बऱ्याचश्या सिनेमाच्या गाण्यांनी मांडून ठेवल्या आहेत हे ही काही कमी नाही.

गाण्यांमुळे सिनेमा एकदम उठावदार होतो आणि हिट होण्याचे चांसेस जास्त असतात. उदास मन असेल तर गाणी ऐकून मन रिझवता येतं. आता तुम्ही म्हणाल अरे भिडू गाणी गाणी लावलय पण नेमका विषय काय आहे का नुसतं गाणीच म्हणत बसणार आहे. तर पब्लिक विषय जाणून घेऊया जर तुम्हाला विचारलं की एखाद्या सिनेमात किती गाणी असू शकतात किंवा तुम्हाला माहिती असलेला सर्वाधिक गाण्यांचा सिनेमा कुठला ?

तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झाल तर 4 किंवा 5 असेल असा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो आणि दुसऱ्या प्रश्नाचं बोलायचं झालं तर हम आपके है कौन किंवा हम साथ साथ है असू शकतो, अजून आपल्या मराठी सृष्टिकडे वळल तर पिंजरा आहे आणि बरेच आहेत.

पण आजचा किस्सा अशा एका सिनेमाचा आहे ज्यात थोडे थोडके नाही तर तब्बल 71 गाणे होते, जोक नाय भिडू खरी बातमी आहे ही.

पिंजरा सिनेमातसुद्धा बरीच गाणी होती पण तो विषय नंतर कधीतरी आधी आता हा मॅटर सोल्व करू. तर 1932 साली एक सिनेमा आला होता आणि सिनेमा होता इंद्रसभा. या सिनेमात डायरेक्ट 71 गाणी होती आता तुम्ही म्हणाल भिडू सगळं बजेट काय नुसतं गाण्यालाच दिलेलं की काय पण हे खरय. विश्वास बसायला कठीण आहे पण इंद्रसभा सिनेमात 71 गाण्यांची मेजवानी होती. सिनेमा 3 तासांचा आणि गाणी 71. आलम आरा हा सिनेमा आला तेव्हा त्यात 7 गाणी होती पण त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला तो इन्द्रसभा या सिनेमाने. पण इंद्रासभा सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करणं अजून कोणाला जमलेल नाही.

इंद्रसभा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं जेजे मदन यांनी. हा सिनेमा 1853 साली आघा हसन अमानत लिखित उर्दू नाटकावर आधारित होता. या सिनेमाचे संगीतकार होते नगरदास जे या सिनेमा मुळे प्रचंड लोकप्रिय झाले होते. इंद्रसभा सिनेमात केलेल्या गाण्यांमध्ये शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा बेस्ट कॉम्बो होता. ठुमरी, गजल, लोकगीते, चौबोला ( पाकिस्तानातल्या काव्य परंपरेत वापरण्यात येणाऱ्या लोकगीतांच्या ओळी ) छंद सगळ समाविष्ट होतं.

सरकारी नोकरीसाठी विचारलेल्या प्रश्नांमध्ये असे प्रश्न येतात त्यात हा इंद्रसभा सिनेमाच्या गाण्यांचाप्रश्न असतोच. पण वास्तविक परिस्थिती ही आहे की आता या सिनेमातील गाण्यांची फारच थोडी प्रिंट कॉपी उरलेली आहे म्हणजे जवळपास ती गाणी नाहीतच जमा आहेत.

या सिनेमामुळे पुढे गाण्यांची संख्या कमी कमी होत गेली. 1943 साली आलेल्या शकुंतला या सिनेमात 42 गाणी होती. 90चं दशक येता येता मग हा आकडा 12 ते 14 गाण्यांवर आला. मग हा रेकॉर्ड तेव्हा हम आपके है कौन या सिनेमाच्या नावावर होता की त्यात 14 गाणी होती. त्या खालोखाल सिलसिला, मोहब्बते आणि ताल या सिनेमाचा 10 किंवा त्याहून अधिक गाणी असल्याचा रेकॉर्ड आहे.

पण इंद्रसभा या सिनेमाचा नाद करायचा नाय कारण 71 गाणी एका सिनेमात ही कल्पनाच करवत नाही पण गाणी हा सिनेमाच्या दृष्टीने किती महत्वाचा भाग आहे याची प्रचिती येते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.