माजी सैनिकाचं नशीब बघा घरबसल्या 5 करोड रुपये मिळालेत….

नशीब आणि त्याच्याविषयी असणाऱ्या मानवी जीवनातील समजुती याबद्दल बऱ्याच लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. नशिबाचा भाग होता म्हणून झालं किंवा आमचं तर बॅडलक खराब होतं अशी बरीच कॅची वाक्य आपण आपल्या मित्रांच्या तोंडून ऐकत असतो. लॉटरी हा सुद्धा नशीबाचाच भाग म्हणावा लागेल. आमचं नशीब पांडू म्हणून इथं चालत नाही इथं लागतो धीर आणि जिद्द की लॉटरी आपल्यालाच लागेल. नशिबावर हा गेम चालतो म्हणजे एकदा का बड्या नंबरची लॉटरी लागली की पुढची बरीच वर्षे बसून आरामात जातात. नाही लागली तर मग खरेदी करणं आलंच.

आता हा एवढा नशिबावर का बोलतोय असं तुम्ही म्हणत असाल तर किस्साचं असा आहे भिडूनो की वाचल्यावर लॉटरी खरेदी करण्याचं व्यसन लागू शकतं. मागच्या 15 वर्षांपासून एक माजी सैनिक लॉटरी खरेदी करत असायचा आणि आज त्यांना इतकं मोठं भरघोस धनलाभ या लॉटरी तिकीट विजेत्या घटनेतून झालाय की कुणालाही विश्वास बसणार नाही. तर जाणून घेऊ काय विषय आहे.

हरियाणातील भिवानी येथील रहिवासी असलेल्या माजी सैनिकाचे नशीब अचानक उघडले. त्यांना एकाच फटक्यात 5 कोटींची लॉटरी लागली आहे. आता 30% कर कापल्यानंतर त्यांना 3.5 कोटी रुपये मिळतील.

भिवानीच्या बरडू मुघल येथील रहिवासी असलेले अत्तर सिंग हे सैन्यातून नायक पदावरून निवृत्त झाले. गेल्या 15 वर्षांपासून तो लॉटरी खरेदी करत आहे. त्यांनी लॉटरीवर आतापर्यंत 10 लाख रुपये खर्च केले आहेत. अनेक छोटी बक्षिसे निघाली, पण आता मोठे बक्षीस निघाले आहे. त्यांना दोन मुलं आहेत जे सैन्यात आहेत. ते 2007 मध्ये निवृत्त झाले आणि तेव्हापासून लॉटरी खरेदी करतात. 6 महिन्यांपूर्वीही त्यांना 90 हजार रुपयांची लॉटरी लागली होती. सध्या त्यांनी पैसे कुठे खर्च करायचे याचे नियोजन केलेले नाही.

त्यांनी नागालँड सरकारची लॉटरी खरेदी केली होती. सुरुवातीला आपले नाव पहिल्या क्रमांकावर येईल असे त्याला वाटले नव्हते. त्यांचा विश्वास बसत नव्हता. अनेक वेळा जुळलेली तिकिटे. त्यानंतर एजन्सी चालकाशी बोलणे झाले. मगचं त्यांनी विश्वास ठेवला. ते म्हणतात की आता ते आयुष्यात कधीही लॉटरीची तिकिटे विकत घेणार नाही. त्यांनी लॉटरी खरेदी केली होती आणि लॉटरीचा निकाल 1 जानेवारीला लागला.

अत्तर सिंह यांनी सांगितले की त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि आता ते आयुष्यात पुन्हा कधीही लॉटरीची तिकिटे खरेदी करणार नाही. त्यांच्यासोबत लॉटरी तिकीट एजन्सीचे ऑपरेटर लक्ष्मण सिंगही उपस्थित होते. त्यांनी 24 डिसेंबर रोजी किल्लनवली येथून डिअर ख्रिसमस आणि न्यू इयर बंपर लॉटरीची पाच तिकिटे 10 हजार रुपयांना खरेदी केल्याचे सांगितले. एका तारखेला त्याचा निकाल इंटरनेटवर आला तेव्हा आनंदाला थारा नव्हता.

अत्तर सिंग यांनी सांगितले की, लॉटरी काढण्यासाठी सरकारने सांगितलेल्या सर्व कागदपत्रांसह कोलकाता येथे जावे लागेल. तेथे सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर एक महिन्यानंतर लॉटरीची रक्कम त्यांच्या खात्यावर पाठवली जाईल.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.