जेव्हा नेस्ले कंपनीला पैसे देऊन स्टॉक जाळावा लागला होता….

सब्जी लायी मॅगी बनायी, मा बोली बस दो मिनिट…

ही टॅगलाईन बऱ्याच लोकांना अजूनही आठवत असेल. अमिताभ बच्चन यांची मॅगीची जाहिरात भरपूर लोकप्रिय झाली होती. खरतर मॅगी चर्चेत आली ती नेस्ले या ब्रँडमुळे , मॅगीची जागतिक लेव्हलवर क्रेझ निर्माण झाली तीही नेस्लेमुळेचं.

खाद्यपदार्थ बनवणारी ही कंपनी नेस्ले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतातील किटकॅटच्या विशेष पॅकेजिंगबाबत नुकतीच घटना घडली आहे. झालं अस की नेस्ले इंडियाने भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा यांच्या प्रतिमा असलेल्या रॅपर्समध्ये किटकॅटचा नवीन स्टॉक सादर केला आणि मार्केटमध्ये येताच ते वादात सापडले. नेस्ले इंडियाला सोशल मीडियावर भगवान जगन्नाथ आणि किटकॅट पॅकेटवरील इतर चित्रांमुळे ग्राहकांच्या संतापाचा सामना करावा लागला. लोकांनी कंपनीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. परिणामी, नेस्ले इंडियाने याबद्दल खेद व्यक्त केला आणि बाजारातून नवीन वादग्रस्त पॅकेजिंगचे किटकॅट कार्टन्स परत मागवले.

नेस्ले इंडियाच म्हणण आहे की नवीन पॅकेजिंगचा उद्देश केवळ देशातील सुंदर आणि निसर्गरम्य स्थळांना हायलाइट करणे हा आहे. मात्र, गेल्या वर्षीच हे डबे बाजारातून काढून घेतले होते. ओडिशाची संस्कृती किटकॅट पॅकेट्सवर पटचित्राद्वारे कोरली गेली. यापूर्वी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीने किटकॅट चॉकलेट पॅकेटवर मेघालयातील मणिपूरचे केबुल लमजाओ नॅशनल पार्क दाखवल्याबद्दल माफी मागितली होती. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या आक्षेपानंतर कंपनीने हे पाऊल उचलले होते.

नेस्ले वादात सापडण्याची ही पहिली किंवा दुसरी वेळ नाही. याआधीही नेस्ले टीका आणि वादांना बळी पडली आहे. काही मोठ्या वादांबद्दल बोलायचे तर, 1977 मध्ये अमेरिकेत नेस्लेचा बहिष्कार देखील खूप गाजला होता. म्हणजे नेस्लेने त्यांच्या बेबी फॉर्म्युला या प्रॉडक्टची अशी मार्केटिंग केली होती की आईचं दूध बाळाला पोषक नाही तेवढ आमचं प्रॉडक्ट आहे. नेस्लेचे बेबी फॉर्म्युला आईच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक असल्याचा कोणताही पुरावा नसला तरी त्यांनी अशा प्रकारे मार्केटिंग केली होती आणि शिव्या खाल्ल्या होत्या.

यामुळे 1977 मध्ये अमेरिकेत नेस्लेवर बहिष्कार टाकण्यात आला आणि नंतर तो हळूहळू युरोपमध्येही पसरला. 1984 मध्ये नेस्लेने WHO-समर्थित आंतरराष्ट्रीय मार्केटिंग कोड पालन करण्याचे मान्य केल्यावर बहिष्कार अधिकृतपणे बंद झाला. पण 1989 मध्ये हा बहिष्कार पुन्हा सुरू झाला. यानंतरही नेस्लेवर 1990 च्या दशकात पाकिस्तानसारख्या विकसनशील देशात अशाच प्रकारच्या मार्केटिंग पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप होत राहिला.

कॅनडामध्ये, चॉकलेटच्या किमतीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पर्धा ब्युरोने 2007 मध्ये नेस्ले कॅनडाच्या कार्यालयांवर (हर्शे कॅनडा आणि मार्स कॅनडा येथील कार्यालयांसह) छापे टाकले. नेस्लेच्या अधिकाऱ्यांनी किमती वाढवण्यासाठी कॅनडामधील विरोधी स्पर्धकांशी संगनमत केल्याचा आरोप करण्यात आला होता.
2007 मध्ये छापे सार्वजनिक झाल्यानंतर, नेस्ले आणि इतर कंपन्यांना किंमतींसाठी क्लास ऍक्शन खटल्यांचा सामना करावा लागणार होता. नेस्ले $9 दशलक्ष सेटलमेंटपर्यंत पोहोचले, यानंतर युनायटेड स्टेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर क्लास कारवाईचा खटला दाखल झाला.

2015 मध्ये नेस्लेच्या लोकप्रिय उत्पादन मॅगीबाबत भारतात बराच गदारोळ झाला होता. मे 2015 मध्ये, बाराबंकी, उत्तर प्रदेशच्या अन्न सुरक्षा नियामकांनी अहवाल दिला की 2 मिनिटांत बनवलेल्या मॅगी नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) चे प्रमाण अत्यंत जास्त आहे. तसेच लिडची पातळी परवानगी दिलेल्या रकमेच्या 17 पट आहे. यानंतर मॅगी विशेषत: मुलांच्या आरोग्याला घातक असल्याच्या अनेक वादविवाद झाले आणि देश-विदेशात अनेक तपासण्या झाल्या. भारत सरकारने जून 2015 मध्ये संपूर्ण देशात मॅगी नूडल्सवर बंदी घातली.

नेस्लेने नेहमीच आपली नूडल उत्पादने सुरक्षित असल्याचे सांगितल. मॅगीने भारतात बंदी घातल्यानंतर सुमारे 320 कोटी रुपयांचा स्टॉक रिकॉल केला आणि स्टॉक जाळण्यासाठी एका सिमेंट कारखान्याला 20 कोटी रुपये दिले. भारताच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने नेस्ले इंडियाला मॅगीमध्ये योग्य प्रमाणात MSG आणि लीड जास्त केल्याबद्दल 640 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

ऑगस्ट 2015 मध्ये, यूएस हेल्थ रेग्युलर FDA ने चाचण्या केल्या, ज्यामध्ये मॅगीमध्ये लीडचे प्रमाण धोकादायक पातळीवर नसल्याचे समोर आले. 13 ऑगस्ट 2015 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने देशातील मॅगीवरील बंदी उठवली, कारण बंदी लादताना योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही. मॅगीने नोव्हेंबर 2015 मध्ये भारतीय बाजारात पुनरागमन केले.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.