मंगल पांडेचं नाव पुस्तकात आहे पण “तिलका मांझी” पहिले शहीद होते…?

१८५७ चा उठाव हा इंग्रजांविरोधातला पहिला उठाव समजला जातो. एनफिल्ड बंदूकासाठी आवश्यक असणाऱ्या काडतुसांवरची पिशवी दाताने तोडावी लागत असे. या पिशवीसाठी गाईच्या कातड्याचा उपयोग केला जात असल्याची माहिती मिळाली. इंग्रजांविरोधात बंड पुकारण्यात आलं. ८ एप्रिल १८५७ रोजी या बंडासाठी कारणीभूत असणाऱ्या मंगल पांडेना फाशी देण्यात आली. बंड व्यापक झालं. 

हाच तो १८५७ चा उठाव.

या घटनेनंतर शाळेच्या पाठ्यपुस्तकांपासून सर्वच ठिकाणी मंगल पांडे हे स्वातंत्र संग्रामाचे पहिले शहीद म्हणून शिकवलं जावू लागलं, पण या घटनेच्या पुर्वी बरोबर ४२ वर्षांपुर्वी तिलका मांझी शहीद झाले होते. 

१३ जानेवारी १७८५ रोजी इंग्रजांनी तिलका मांझी यांना फाशीची शिक्षा दिली होती. या घटनेनंतर कित्येक आदिवासींनी जमिनदार आणि इंग्रजांविरोधात बंड पुकारलं. या बंडात आदिवासी समाजाचे नायक असणारे बिरसा मुंडा देखील सहभागी होते. त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी इंग्रजांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला होता. बिरसा मुंडा देखील तिलका मांझी यांच्या त्यागामुळे प्रभावित झाले होते अस सांगण्यात येत.

आजच्या पाठ्यपुस्तकात पहिल्या शहीद असणाऱ्या तिलका मांझी याच नाव नसलं तरी आदिवासी बांधव मात्र आपल्या गीतांमधून तिलका मांझींचा त्याग जपून ठेवतात.  

तुम पर कोडों की बरसात हुई

तुम घोड़ों में बांधकर घसीटे गए

फिर भी तुम्हें मारा नहीं जा सका

तुम भागलपुर में सरेआम

फांसी पर लटका दिए गए

फिर भी डरते रहे ज़मींदार और अंग्रेज़

तुम्हारी तिलका (गुस्सैल) आंखों से

मर कर भी तुम मारे नहीं जा सके

तिलका माझी

मंगल पांडेय नहीं, तुम

आधुनिक भारत के पहले विद्रोही थे

तिलका मांझी यांना प्रकाशझोतात आणण्याच काम महाश्वेता देवी यांनी केलं. महाश्वेता देवी यांच्या बंगाली भाषेतल्या शालगिरर डाके या कादंबरीत तिलका मांझी आणि त्यांच्या विद्रोहाचा उल्लेख आहे. त्यास सोबत हिंदीतील साहित्यिक राकेश कुमार सिंह यांच्या हुल पहाडिया या पुस्तकात तिलका मांझी यांच जबरा पहाडिया म्हणून वर्णन करण्यात आलं आहे. 

तिलका मांझी यांचा विद्रोह लोकांसमोर आला नाही त्याच महत्वाच कारण म्हणजे ज्या प्रमाणे त्यांचा विद्रोह ब्रिटींशाविरोधात होता त्याच प्रमाणे तो स्थानिक जमिनदारांविरोधात देखील होता. जमिनदार आणि ब्रिटींशांमध्ये असणाऱ्या साटेलोटामुळे आदिवासी समाजावर अन्याय होत होता अशा वेळी तिलका मांझींनी बंडाचे निशाण फडकावले होते.

तिलका या शब्दालचा अर्थ रागिट आणि लाल डोळ्यांचा व्यक्ती. त्यात ते गावप्रमुख होते. आदिवासी समाजात गावप्रमुखाला मांझी म्हणून बोलवण्याची प्रथा होती. म्हणून त्यांच नाव तिलका मांझी अस होतं. त्यांनाच जबरा पहाडियां या नावाने ओळखलं जायचं. जबरा पहाडिंया अर्थात हिल रेंजर्सच. या शब्दांचे उल्लेख ब्रिटीशांच्या कागदपत्रात असल्याचे देखील असल्याच सांगण्यात येत.

राजमहल, झारखंड टेकड्यांचा प्रदेशात तिलका मांझी च वर्चस्व होतं. १७७१ ते १७८४ पर्यन्त ब्रिटीश सत्तेला हादरे देण्याच आणि जमिनदारांविरोधात बंड करण्याच काम तिलका मांझी याने केले. त्यामुळेच तिलका मांझी उर्फ जबरा पहाडिया च्या विरोधात ब्रिटीश आणि जमिनीदार एक झाले होते. 

भागलपूर भागात इंग्रज क्वीवलेंड हा कलेक्टर होता. या कलेक्टरला मारण्याच काम तिलका मांझी याने केलं. त्यानंतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी तिलका मांझीची धास्ती खाली होती. पुढे आयरकुट याच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या जाळ्यात तिलका मांझी अडकला गेला. तिलका मांझीला अटक करुन टेकड्यावरुन भागलपूर शहरात आणण्यात आलं. अटक करुन आणताना त्याला घोड्याच्या पाठीमागे बांधण्यात आलं होतं.

अशा प्रकारचा अत्याचार झाल्यानंतर तिलका मांझी अर्धमेला झाला होता. पण जेव्हा त्या भागलपुरच्या मुख्य चौकात आणण्यात आलं तेव्हा त्यांने त्याच जोषात ब्रिटीश सत्तेला आव्हान दिलं.परिणामी भितीने आणि आदिवासींना दहशत बसवण्याच्या उद्देशाने ब्रिटीशांनी तिलका मांझी यास वडाच्या झाडावर लटकावून फासी दिली.

आज भागलपूर शहरात तिलका मांझी भागलपूर विश्वविद्यालय आहे. इथेच तिलका मांझी यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे. आणि इतिहासतज्ञ देखील तिलका मांझी यांना आधुनिक इतिहासातला पहिला शहीद व्यक्ती घोषीत करण्यासाठी प्रयत्न करत असतात.  

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Ganesh says

    सदर लेखात 17 व्या शतकात बिरसा मुंडा हयात होते असे लिहल आहे

    आणि दुसया लेखात https://bolbhidu.com/remembering-birsa-munda-on-his-birth-anniversary/
    18 व्या शतकात बिरसा मुंडा जन्मले अस लिहल आहे

Leave A Reply

Your email address will not be published.