फाशी जाताना रामप्रसाद बिस्मिल म्हणाले, मरणाचं दुख: नाही आईपासून दुरावण्याचं दुख: आहे.

आजच्याच दिनी ११ जून १८९७ रोजी उत्तरप्रदेशच्या शहाजांपूरमध्ये मुलाराणी आणि मुरलीधर बिस्मिल यांच्या पोटी हा क्रांतिकारक मुलगा जन्माला आलेला. त्याच नाव ठेवलं होतं रामप्रसाद. जन्मावेळी मुलाची स्तिथी फार नाजूक होती. मुलगा वाचेल याची शंका फार कमी. तो वाचवा यासाठी आई वडिलांनी अनेक उपाय केले. यासगळ्यातून तो वाचला आणि पुढे क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल नावाने ओळखला गेला.

रामप्रसाद यांचे शिक्षण घरीच वडील मुरलीधर यांचा देखरेखीखाली चालू झाले. त्याकाळी उर्दूचा बोलबाला असल्याने वडील त्यांना एका मौलवी साहेबांकडे उर्दू शिकण्यास पाठवू लागले. वडिलांचा त्यांच्या शिक्षणाकडे विशेष कटाक्ष असायचा. शिकण्यात हलगर्जीपणा केल्याने वडिलांचा बेदम मार पडल्याचा ते आपल्या आत्मचरित्रात सांगतात.

” चौथी पास होऊन पाचवीत गेलो होतो. तेव्हा वय जेमतेम १४ वर्ष होत. घरातील पैसे चोरून त्या पैशाच्या कादंबरी विकत घेण्याची सवय लागली होती. “

कादंबऱ्या वाचणे हा त्यांचा आवडता छंद होता. याशिवाय त्यांना उर्दू साहित्य आणि गजलांचा पण चस्का लागला होता. सिगारेट सोबत त्यांना भांग पिण्याचेही व्यसन लागलेले. त्यांच्या ह्या वाईट सवयींमुळे ते परीक्षेत दोन वर्षे नापास झाले. कोवळ्या वयात लागलेल्या या सवयी सोडणे त्यांना कठीण होऊन बसल होत.

ते जिथून पुस्तके, कादंबऱ्या विकत घेत होते तो विक्रेता पंडित वडील मुरलीधर यांचा ओळखीचा होता. बाल रामप्रसाद यांची ती सवय बघून त्यांना वाईट वाटायचे. शेवटी एक दिवस बाल रामप्रसाद यांची वडिलांकडे तक्रार केली. तेव्हापासून वडील सावध राहू लागले आणि रामप्रसाद सुद्धा सावधच होते. त्यांनी त्यांच्याकडून खरेदी करणे बंद केले. पण देवाला काही मान्य नव्हते. एक दिवस रामप्रसाद भांगच्या नशेत वडिलांच्या कपाटावर हात साफ करत होते, पण असावधनतेने कपाटाची कडी जोरात वाजली. ते आईच्या कानावर पडल आणि त्यांनी त्याला रंगेहात पडकल.

त्यांनी वडिलांच्या कपाटाची दुसरी चावी बनवून घेतली होती. यानंतर त्यांच स्वताच कपाट तपासले तर त्यात अनेक कादंबऱ्या, गझलांची पुस्तके आणि काही पैसे होते. वडिलांनी सगळी पुस्तके फाडून जाळून टाकली. तिथून पुढे त्याच्या वागणे लक्ष दिले जाऊ लागले. पण रामप्रसाद वाईट सवयींचे शिकार झाले होते. ते सुटणे काही सोप नव्हत. त्यांनी सिगारेट सोडण्याचा बराच प्रयत्न केला पण ते काही केल्या शक्य होत नव्हते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आईच्या पैशावरही हात साफ करायचे सोडत नसत. पण आईकडे तितके पैसे नसायचे कि, त्यांचे शौक पुरवले जातील. शेवटी त्यांना उमजलं कि, हे सगळ करने काही चांगली गोष्ट नाही. नंतर पुढे हळूहळू करत त्यांच्या वाईट सुटल्या. “

क्रांतीकार्याची सुरुवात.. 

रामप्रसाद बिस्मिल यांच्या क्रांतीकारिकी जीवनाची सुरुवात १९१३ मधील गदर षड्यंत्रात भाई परमानंद यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर झाली. भाई परमानंद यांना फाशीची शिक्षा सुनावल्यावर चेताळून उठलेल्या रामप्रसाद यांनी ‘ मेरा जन्म ‘ हि शीर्षक कविता लिहिली आणि इंग्रजांचा समूळ नायनाट करण्यासाठी क्रांतिकारक बनण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यासाठी लागणारे हत्यार त्यांनी आपल्या पुस्तकांच्या विक्रीच्या पैशातून  घेतले.

पण नंतर तत्कालीन इंग्रज वाॅईसराॅयनी भाई परमानंद यांची फाशीची शिक्षा काळ्या पाण्याच्या शिक्षेत बदलून त्यांना अंदमानच्या सेलुलर जेल मध्ये पाठवले.

काकोरी कांड..

रामप्रसाद बिस्लीम यांच्या नेतृवाखाली १० जणांनी हा सुनियोजित कट रचला. ९ ऑगस्ट १९२५ रोजी लखनऊ जवळील काकोरी स्थानकावर रामप्रसाद आणि त्यांच्या साथीदारांनी रेल्वेतून घेऊन जात असलेल्या धनराशीवर धाड टाकली. ट्रेन चालकाच्या डोक्याला बंदूक लाऊन त्यांनी ट्रेनवर ताबा मिळवला होता. गार्डच्या डब्ब्यात असलेल्या लोखंडी तिजोऱ्या फोडून त्यातील चार हजार लुटन आक्रमणकारी दल तिथून फरार झाला.

ह्या कटात अशफाकउल्ला खां, चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिडी, सचिंद्र सान्याल, मन्मथनाथ गुप्त, रामप्रसाद बिस्मिल हे सहभागी होते. या काकोरी कांडने अनेक लोकांचे लक्ष वेधले. याने देशातील राजकारण आक्रमक झाले. पोलिसांनी अटकेसाठी धाडसत्र सुरु केले. यातच रामप्रसाद बिस्लीम यांना २६ सप्टेंबर १९२५ रोजी अटक झाली. खटला भरून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

फाशीचा दिवस

अखेर फाशी देण्याचा तो दिवस उजाडला. तारीख होती १९ डिसेंबर १९२७. 

त्या दिवशी रामप्रसाद यांची आई मुलरानी त्यांना भेटायला गोरखपूरच्या जेलला आल्या होत्या. त्यावेळी रामप्रसाद बिस्मिल रडत होते. त्यांच्या आईचेही डोळे पाणावले होते तरी त्यांनी धैर्य सोडले नाही. काळजावर दगड ठेऊन त्या म्हणल्या,

“अरे, मी तर समजत होती की माझा मुलगा फार बहादूर आहे. त्याच्या नावाने इंग्रज सरकार पण थरथरते. मला माहित नव्हत तो मरणाला इतका घाबरतो.”

त्या इतक्यावर न थांबता पुढे मुलाला विचारतात की,

” तुला असे रडून फासावर चढायचे होते तर तू क्रांतीचा मार्ग का निवडला ? मग तर तू हा रस्ताच निवडायची गरज नव्हती.”

नंतर रामप्रसाद यांनी आईचे डोळे पुसले आणि म्हणाले, त्यांचे अश्रू मरणाला घाबरण्याचे नाहीतर तिच्यासारख्या बहादूर आईपासून वेगळे होण्याच्या दुखाचे आहेत.  

फाशीवर चढण्याआधी त्यांनी प्रसिद्ध शायर ‘ बिस्मिल अजीमाबादी ‘ गझल ‘ सरफरोशो की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू-ए-कातील में है ‘ पूर्ण जोशात गायली आणि हसत हसत मरणाला सामोरे गेले. 

फाशी होण्यापूर्वी रामप्रसाद बिस्मिल यांनी आपल्या एका मित्राला एका पात्रात लिहिलेल्या या ओळी या आजही आपल्या देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरतात.

“१९ तारीख को जो कुछ होगा मैं उसके लिए सहर्ष तैयार हूँ।

आत्मा अमर है जो मनुष्य की तरह वस्त्र धारण किया करती है।

मरते हैं बिस्मिल, रोशन, लाहिड़ी, अशफाक अत्याचार से।

होंगे पैदा सैंकड़ों, उनके रूधिर की धार से।।

उनके प्रबल उद्योग से, उद्धार होगा देश का।

 तब नाश होगा सर्वदा, दुख शोक के लव लेश का।।

सब से मेरा नमस्कार कहिए,

 तुम्हारा “बिस्मिल”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.