लोकं रिल्स करून जेल मध्ये चाललेत हा कैदी जेलमधून tiktok गाजवतोय

टिकटॉक हा एक भयानक व्हायरस काही दिवसांपूर्वी आपल्या देशाला लागला होता. कसंय ना शेट, गेला घासत, डायरेक्ट 302, मर्डर, भाई असे अनेक शब्द आपण या काळात ऐकले असतील. हा व्हायरस पसरण्या आधीच भारत सरकारने त्याचं बांधकाम केलं पण यापेक्षाही खतरनाक व्हायरस आला तो म्हणजे रिल्स. म्हणजे एक वेळ टिकटॉक परवडलं पण रील्स नको अशी परिस्थिती आली आहे.

युट्युब वर रोस्टर लोकांचं रोस्टिंग बघितलं तर तुम्हाला अंदाज येईल की टिकटॉक किंवा रिल्स हे किती खतरनाक आहेत.

बरं ते सोड आपला विषय दुसरा आहे, कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी जेलचा वापर केला जातो म्हणजे त्याला जेलमध्ये डांबलं जातं या काळात कैद्याचे आयुष्य जेलच्या चार भिंतींमध्ये समाप्त होतं म्हणजे आयुष्यभर त्याला त्या खोलीतला अंधारच आपलं जीवन वाटू लागतो. जेलच कस असतं काम ना धाम उघड्या अंगाला घाम… पण जगामध्ये क्रिएटिव्ह लोकांची कमी नाही जेलमध्ये सुद्धा काही कैदी काहीतरी वाढव करत असतात म्हणजे पळून जाणे जेलमध्ये एखाद्याचा खून करणे वगैरे असे प्रकार ते करत असतात पण एखादा कैदी असतो एखादा क्रिएटिव गोष्टी करत असतो.

असाच एक भिडू आहे ज्याने सोशल मिडियाचा वापर करून कैदी जरी असला तरी त्याने आपल टॅलेंट जगाला दाखवून दिलं. कुकिंग डिशेस बनवून एका कैद्याने सोशल मीडिया गाजवला आहे.

कैदी बनला टिक टॉक स्टार….

हा कैदी फक्त म्हणण्या पुरता कैदी आहे आणि कैदी आहे म्हणून जेलमध्ये शिक्षा भोगतो आहे पण आपल्या शिक्षेचा पुरेपूर फायदा आणि आपल्या टॅलेंटचा वापर करून लोकांचं मन हा कैदी जिंकत आहे. हा कैदी जेलच्या कॅन्टीन मध्ये मिळणाऱ्या खाण्याच्या गोष्टींपासून आपल्या स्टाईलने वेगवेगळ्या डिशेस बनवतो आणि नंतर तो त्या गोष्टी टिकटॉक वर शेअर करायचा आणि लोकांचाही याला प्रचंड प्रोत्साहन होतं. म्हणजे बघा जगात काहीही होऊ शकतं याचा हा नमुना.

 

सुरुवातीला हे सगळं बरं होतं म्हणजे तो गडी जास्त फेमस नव्हता, पण जेव्हा तो फेमस झाला तेव्हा जेल मधल्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट खटकली की हा गडी व्हिडीओ शूट करण्यासाठी जेलमध्ये फोन कुठून आणतो एका बाजूला जेलमध्ये गेल्यानंतर मोठमोठे श्रीमंत लोकांना सुद्धा जेलमध्ये अन्नाची सवय करुन घ्यावे लागते तरी इथं हा गडी वेगवेगळ्या डिशेस काय बनवत होता हा मोठा प्रश्न होता. आपली क्रिएटिव्ह बुद्धी वापरून या कैद्याने वेगवेगळ्या डिशेस बनवून आपली क्रिएटिव्हिटी दाखवायला सुरुवात केली. जेलमध्ये त्याला दोन किटल्या मिळाल्या ज्याचा उपयोग करून त्याने चिकन स्टीव्ह, जमेकन करी आणि केक बनवले. आता हे सगळ करताना त्याला मजा वाटत होती म्हणून त्याने ठरवलं की आपलं हे टॅलेंट जगाला दाखवल पाहिजे म्हणून त्यांनी टिकटॉक च्या माध्यमातून आपल टॅलेंट दाखवायला सुरुवात केली.

या कैद्याचं खरं नाव काय आहे आपल्याला माहित नाही पण shotsneverfailing365 या नावाने त्याचं टिकटॉक व युट्युब वर अकाउंट आहे.

लोकांनी त्याच्या व्हिडिओना मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलं. लोकांचं वाढतं प्रोत्साहन बघून या कायद्याने छोटे छोटे आणि सोपे कुकिंग व्हिडिओ टिकटॉक वर टाकायला सुरुवात केली आणि लोक कौतुक करत राहिले. एक तर त्याचा व्हिडिओ असा होता जो बारा लाख वेळेस पाहिला गेला आणि तेव्हा कुठे तो स्टार शेफ बनला.

आता एवढं सगळं होतं म्हणल्यावर जेल अधिकाऱ्यांना याची कुणकुण लागणं सहाजिकच होतं. पोलिसांनी पाळत ठेवली आणि या कैद्याला रेड हँड पकडलं. सुरवातीला जेल अधिकारी सुद्धा त्याच्या या व्हिडिओचे फॅन होते पण नंतर त्यांना कळलं कि व्हिडीओ बनवणारा माणूस आपल्या जेल मधला कैदी आहे आणि त्यांची पाचावर धारण बसली. पोलिसांनी त्याचा फोन हिसकावून घेतला आणि टिक टोक वर त्याचे जितके व्हिडीओ होते ते सगळे डिलीट केले.

आता या कैद्याचं मत आहे की जेवण बनवणे ही त्याची पॅशन आहे जेलमधून सुटल्यानंतर तो स्वतः च एक रेस्टॉरंट सुरू करणार आहे आणि रेस्टॉरंट च्या माध्यमातून तो एक चांगल आयुष्य जगू इच्छित आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.