राजाच्या स्वयंपाकघरात पाप घडलं आणि डोसा निर्माण झाला…

बर्‍याच लोकांसाठी साउथ इंडियन फूड म्हणजे इडली डोसा इतकं असतं पण जे खाण्यापिण्याचे शौकीन असतात त्यांना मात्र साउथ इंडियन फूडच्या बऱ्याच गोष्टी माहीत असतात. साउथ इंडियन जेवण म्हणजे इडली डोसा असं कधीच नसतं. तोंडाची चव बदलण्यासाठी आणि आजारी ही पडणार नाही म्हणून लोक साउथ इंडियन रेस्टॉरन्ट ला पसंती देतात. म्हणजे आपणही कधी जर साउथ इंडियन रेस्टॉरन्ट ला गेलो तर इडली किंवा डोसाच मागवतो. एका बाजूला मऊशार इडली आणि एका बाजूला गरम-गरम कुरकुरीत डोसा. पण या डोसा चा शोध कसा लागला याबद्दल बर्‍याच गोष्टी प्रचलित आहेत ते आपण पाहूया आणि डोसा कसा निर्माण झाला त्याची माहिती पाहूया.

इंडियन मिरर या दैनिकाच्या मते कन्नड तमिळ तेलगू आणि मल्याळम या प्रत्येक भाषेत डोसा ला एकच नाव आहे. डोसा हा फक्त भारतीय राज्यात नाही तर श्रीलंका , मलेशिया आणि सिंगापूर यांच्यातही प्रसिद्ध आहे. डोसा कुठून आला कसा आला याबद्दल बरेच वाद-प्रतिवाद आहेत. इतिहासकार पी. थनकपण यांच्यामध्ये डोसा चा शोध कर्नाटक उडुपी येथे झाला. तर अन्न विशेषक केटी आचार्य हे म्हणतात की इसवी सन 1000 मध्ये डोसाचा उल्लेख संगम साहित्यात आढळतो. खरंतर तमिळ डोसा हात जाड आणि नरम असतो तर कर्नाटक मध्ये डोसा कुरकुरीत आणि पातळ असतो. बाराव्या शतकात संस्कृत विश्व कोशांमध्ये मनसोल्लास मध्ये डोसा या शब्दाचा उल्लेख आढळतो. हा विश्वकोश कर्नाटक चा राजा सोमेश्वर तृतीय याच्या शासन काळात लिहिला गेला.

आता जसं सुरुवातीला सांगितलं कि डोसा या पदार्थाबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत. SluRrp च्या एका लेखानुसार डोसा सगळ्यात आधी कर्नाटक मध्ये बनवला गेला.

उडुपीच्या एका ब्राह्मणाच ध्यान धार्मिक कर्मकांडावरून उडालं आणि त्याला दारू पिण्याची तीव्र इच्छा झाली. तांदूळ शिजवून आणि ते सडवून तो दारू घरीच बनवू लागला. हे दळलेले तांदूळ एकदा त्यानी तव्यावर टाकले आणि त्यापासून एक पदार्थ तयार केला आणि तो झाला डोसा. दारू आणि मांसाहार सेवन मानलं जायचं या प्रचलित कथेवर विश्वास ठेवला तर दोष यावरून डोसा याचा जन्म झाला.

डोसा या शब्दा सोबत जोडलेली अजून एक गोष्ट आहे. म्हैसूरच्या राजाने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अन्न व तसच शिल्लक राहिलं. राजाने आपल्या आचाऱ्याने मी सांगितलं की अन्न फेकून देता कामा नये मग त्यावर उपाय म्हणून राजाच्या आचाऱ्याने उरलेले सगळे मसाले आणि मोठ्या प्रमाणावर तूप घालून डोसा बनवला आणि बटाट्याच्या चटणी सोबत वाढला.

जर तुम्ही कट्टर खवय्ये असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की काही ठिकाणी डोसा त्रिकोणी तर काही ठिकाणी लांब आकाराचा असतो आणि त्यात मसाला भरून तो सर्व्ह केला जातो. अगोदर डोसा बटाट्याच्या भाजीतल्या तरी सोबत वाटला जायचा. डोसा हा दक्षिण भारतात हॉटेल मेस कॅन्टीनमध्ये नाश्त्याच्या स्वरूपात वाटला जायचा आणि त्यानंतर भारतभर डोसा हा नाश्त्याच प्रतीक बनला. आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डोसा बनवला जातो. कुठे सांभर आणि चटणीसोबत वाटला जातो तर कुठे इडली आणि त्याच्या मिश्रणासोबत. आता एक्सपिरिमेंट म्हणून पनीर, चीज, चॉकलेट, आईस्क्रीम अशा सगळ्या प्रकारचे डोसे बनवले जातात पण डोसा मात्र भारतभरात आवडीने खाल्ला जातो हे ही तितकच विशेष.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.