चीन आणि पाकिस्तानचे पुंग्या टाईट करणारे काली मिसाईल खरंच अस्तित्वात आहे कि नाही ?

एप्रिल २०१२. जगातील सर्वात उंच रणभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचीन ग्लेशियरमध्ये मोठं वादळ आलं होतं. उंच हिमालयावरून बर्फाचे मोठे मोठे कडे ढासळले आणि पाकिस्तानचे तब्बल १४० सैनिक या हिमवादळात दबून गेले. अनेक दिवसांपर्यंत त्यांचा पत्ताच लागला नव्हता. काही दिवसांनी त्या १४० पाकिस्तानी जवानांचे शव त्या सियाचीन ग्लेशियरमध्ये थंड पडलेल्या अवस्थेत सापडले.

पाकिस्तानमधल्या तज्ञांनी जगभरात आरडाओरडा सुरु केला की

हा अपघात नाही तर ही  भारताने आपले काली हे सिक्रेट वेपण वापरून केलेली कारवाई आहे.

पाकिस्तानच्या या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली. खरोखर भारताकडे असे काही सिक्रेट वेपण आहे का याची चर्चा सुरु झाली. तेव्हाच्या मनमोहन सिंग सरकारने याबाबत काहीही भाष्य केले नाही. मात्र पुन्हा काही वर्षांनी म्हणजे १४ जुलै २०१८ रोजी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित झाल्यावर मोदी सरकारचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी उत्तर दिले,

“हा विषय देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्यामुळे ही गोपनीय माहिती उघड करता येणार नाही.”

https://economictimes.indiatimes.com/news/defence/government-refuses-information-on-kali-5000-citing-national-security/articleshow/50234073.cms

मनोहर पर्रीकर यांनी असे उत्तर दिल्यामुळे या बद्दलचा संशय आणखी गडद झाला.पाकिस्तानचा दावा होता कि या गनचा प्रयोग  करून भारताने सियाचीन मधील बर्फ वितळले व यात त्यांचे जवान ठार झाले.

Untitled

इंडियन डिफेंस रिव्यू चे असोसिएट एडिटर कर्नल दानवीर सिंह यांनी तेव्हा एका वृत्त वाहिनीशी बोलताना काली हे खरोखर अस्तित्वात आहे असे सांगितले. मात्र त्याचा सियाचीनच्या घटनेमागे काही संबंध असल्याची पुष्टी मात्र त्यांनी केली नाही.

आजही अनेकांना प्रश्न पडतो की काली काय आहे? 

काली म्हणजे Kilo Ampere Linear Injector. काली हे एक लिनियर इलेक्ट्रॉन ऍक्सेलेटर आहे. यात छोटे छोटे असे अनेक संयंत्र असतात जे मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार करतात.सोप्या भाषेत याची कार्यप्रणाली समजावून घ्यायची असेल तर ते आपल्या घरातल्या कॅपॅसिटर किंवा कंडेन्सरप्रमाणे ऊर्जा बनवते. फक्त यात इतकी प्रचंड प्रमाणात क्षमता आहे ज्यामुळे शत्रू सैन्याचे सर्व इलेक्ट्रॉनिक मशीन बंद पाडता येतात.

याचा वापर एका हाय पॉवर मायक्रोव्हेह गन म्हणून करता येतो ज्यामुळे शत्रू देशाचे मिसाईलच नाही तर लढाऊ विमाने देखील पाडता येतात. पाकने आरोप केला त्याप्रमाणे काली मध्ये मोठमोठाले पर्वत वितळवण्याची क्षमता नक्कीच आहे.

सर्वप्रथम कालीची कल्पना सुचली भारताचे अनुसंशोधन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणवले जाणाऱ्या डॉ.आर.चिदम्बरम यांना.

भाभा ऍटोमिक रिसर्चचे प्रमुख शास्त्रज्ञ असणाऱ्या चिदम्बरम यांनी इंदिरा गांधींच्यावेळी घेण्यात आलेल्या पोखरण अणुचाचणीमध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. पुढे पोखरणची दुसरी चाचणी सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली साकार झाली. अनेक वर्ष ते भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व डॉ.मनमोहन सिंग यांचे विज्ञान विषयक सल्लागार होते.

या चिदंबरम यांनी १९८५ साली कालीची संकल्पना तेव्हांचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुढे मांडली.

मात्र यावरील काम सुरु व्हायला चार वर्षे उजाडली. १९८९ साली भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर आणि DRDO यांनी हे मशीन बनवण्यास सुरवात केली. याचे प्रमुख सल्लागार होते डॉकटर पी.एच.रॉन.

सर्वप्रथम तयार झालेले ऍक्सेलेटर ~0.4GW एवढ्या ताकदीचे होते. तेव्हा याला नाव काली ८० असे देण्यात आले होते. भारताच्या अनेक तज्ञ संशोधकांनी प्रयत्न करून याची ताकद वाढवत नेली.

या सगळ्यांच्या प्रचंड मेहनती चे फळ म्हणून २००४ साली काली ५००० हि तयार झाली.

‘काली’ च्या सुरवातीच्या आवृत्तीमध्ये प्रति नॅनो सेकेंदात एक गीगाबाइट इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्हजचा मारा करता येत होता  पण आताची १० टन वजनाची काली ५००० ही १०० मिली सेकेंदात ४० गीगावॉट पर्यंत उर्जा तरंग बनवू शकते.

याचंच अर्थ फक्त हवेतील विमाने नाही तर अंतराळातील उपग्रह उद्धवस्त करण्याची क्षमता कालीकडे आहे. म्हणूनच या सिक्रेट वेपनला फक्त पाकिस्तानच नाही तर चीन देखील घाबरतो.

अशा प्रकारचे मशीन फक्त अमेरिकेकडे उपलब्ध आहे असे म्हणतात. ते बोईंगने बनवले असून त्याचे नाव champ असे देण्यात आले आहे.

भारतीय आर्मी व या क्षेत्रात काम करणारे संशोधक कालीचा वापर आणखी कशात करता येऊ शकतो याची चाचपणी करत आहेत. Defence Ballistics Research Institute (DBRL) या चंदीगड मधील संस्थे मध्ये हा रिसर्च सुरु आहे. सध्या तरी IL-76 विमानांमध्ये काली फिट केले असल्याची चर्चा सर्वत्र असते.

भारताचे ब्रम्हास्त्र म्हणून कालीला ओळखले जाते. 

याच्या बद्दलची थोडी माहिती आपल्याला भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरच्या वेबसाईटवर अर्चना शर्मा या एका संशोधिकेने सादर केलेल्या रिसर्च पेपर मध्ये मिळते. याचाच अर्थ काली ५०००  अस्तित्वात आहे या बद्दल कोणतीही शंका नाही.

http://www.barc.gov.in/publications/nl/2013/spl2013/web/newsletter/pdf/DAE%20EA/paper05.pdf

या पूर्वी भारतीय सरकार हि माहिती संपूर्ण पणे दडवून ठेवत होते. मात्र नव्या मोदी सरकारच्या काळात या ब्रम्हास्त्रा बद्दलच्या अफवा, त्याची भोवती असलेले गूढतेचे वलय याचा चातुर्याने वापर करायचं ठरवलं. मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या संदिग्ध उत्तरामुळे हेच सिद्ध झाले. आजही चीनच्या सीमेवर सुरु झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत सरकार कालीची चर्चा मीडिया मध्ये पसरवते.

कालीची शक्ती किती आहे माहित नाही मात्र कालीचा वापर फक्त शत्रूला भीती घालण्यासाठी जरी केला तरी भविष्यातील अनेक युद्ध टाळता येतील हे नक्की.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.