राजीव गांधींना फसवुन अमेरिकेनं भारतात ‘गांजा’ बंद केला.

गांजा ही एकमेव वनस्पती आसेतू हिमाचल मोठ्या भितीयुक्त अभिमानाने खिश्यात ठेवली जाते.

पोरं लडाखला चालली तर त्यांना प्रेमानं सांगितल जात, बघ जरा चांगला माल आण. एकमेकांना भेट देवून गांजाचा मन:पुर्वक सन्मान केला जातो. गांजा पिणारे तर गांजाच्या वासाचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. दहा एकरातल्या उसात असणारं गांज्याचं रोपटं देखील हे वासानं शोधू काढू शकतात. पण हे सगळ झालं गांजा बद्दल. हे सगळं होतय ते बेकायदेशीर आणि हे बेकायदेशीर आहे हे ठरवण्यामागं कोण होतं माहित आहे का ?

तर यात सुद्धा अमेरिकेचा हात होता. अमेरिकेचा हात कुठे नसतो चुकून एकदिवस डोक्याला तेल जास्त लावलं तरी अमेरिकेचा हात तिथं पोहचू शकतो तर गांजा काय चिझऍ..

हा किस्सा तोच जेव्हा भारतात गांजा बंद करण्यात आला.

गांजाची महती आसेतू हिमाचल होतीच आणि हि महती ऐकूनच गांजावर कोणतीही बंदी आणण्यात आलेली नव्हती पण दूर देशात तिकडं अमेरिकेत वेगळचं कांड चालू होतं.

स्वागत हैं अमरिका मैं !!!

तर या अमेरिकेत पेनकिलर तयार करणाऱ्या कंपन्या व अल्कोहल, सिगरेट विक्रेते यांच्या दबावाखाली युनायटेड नेशन मध्ये गांजाबंदी करण्यात यावी असा प्रस्ताव आणला गेला. मुळात या प्रस्तावात गांजा हे सिंथेटिक ड्रग्स म्हणजेच कृत्रिम रसायन असल्याच दाखवण्यात आलं. असा हा सिंथेटिक ड्रग्सचा प्रस्ताव युनायटेड नेशन्स मधल्या सुशिक्षीत लोकांकडून मंजूर करुन घेण्यात आला.

लक्षात आलं गांजा = सिंथेटिक ड्रग्स आणि विशेष म्हणजे हे सगळ करताना अमेरिकेनं गांजा मारला नव्हता. पुर्ण शुद्धीत हा ठराव मंजूर करण्यात आला.

१९८५ साली अमेरिकेनं भारतावर दबाव आणुन या करारावर सही करायला लावली. परिणामी भारतात देखील गांजा बंदी करण्यात आली जगभरात गांजा बंद झाला. आत्ता अमेरिका आपल्या नावाला जागलं आणि डबलगेम करत अमेरिकेतल्या राज्यांनी गांजाबंदी उठवण्यास सुरवात केली. हळूहळू हळूहळू करत सगळा गांजा जनतेसाठी खुलं करण्यात आला.

(Photo credit should read MARTIN BERNETTI/AFP/Getty Images)

आज अमेरिकेल्या २७ राज्यांमध्ये हि बंदी उठवली गेली आहे तर जगभरातल्या ४० देशांमध्ये गांजा लिगल करण्यात आला आहे.

सध्या आपण काय करतोय तर अमेरिकेच्या दबावाखाली राहून आयुर्वेदिक उपचारासाठी महत्वाचा ठरणारा गांजा बंद करुन तोच पेनकिलरच्या महागड्या औषधाच्या स्वरुपात अमेरिकेकडून विकत घेतोय..

याला म्हणतात अमरिकां !!! धोरणं असावं तर अस कडक गांजा कडक माल…

( सदर लेख बेकायदेशीर नाही. गांजावर बंदी आहे, गांजावर बोलण्याबाबत नाही याची वाचकांनी आणि संपादकांनी शुद्धीत नोंद घ्यावी. )

हे ही वाच भिडू – 

Leave A Reply

Your email address will not be published.