शाळेत असतानाच अमित शहांना निवडणूक जिंकायचा नाद लागला तो अजून कमी झालेला नाही
2014 च्या भाजपच्या विजयात अमित शहांचा मोठा वाटा मानला जातो. त्यांच्या राजकीय रणनितीमुळे त्यांना भारतीय राजकारणाचे चाणक्य मानलं जातं. ज्यामूळं आज भारतात बहूतेक राज्यांत भाजपची सत्ता आहे. अश्या परिस्थतीत जाणून घेऊ अमित शहांबद्दलचे काही खास किस्से..
अहमदाबादपासून 50 कि.मी. अंतरावर असलेल्या मानसा शहरातील राजपूत चावडा घराण्याचे अमित शहा. त्यांनी 9 वी पर्यंतचे शिक्षण तिथेच केले आणि 1979 मध्ये पुढच्या शिक्षणासाठी अहमदाबादला गेले. शांत पण डोक्याने हुशार आणि दृढ निश्चयवाले शहा यांना त्या काळात देखील राजकारणात इंटरेस्ट होता.
सातवीमध्ये असताना अमित शहा यांनी वर्गाच्या मॉनिटरपदाची निवडणूक लढवली आणि पन्नास मुलांच्या वर्गात ७३% मते मिळवून विजयी झाले. निवडणुका जिंकायची सवय त्यांना तेव्हापासूनच लागली. आजवर अमित शहा एकही निवडणूक हरलेले नाहीत.
तिथल्या आरबीएल हायस्कूलमध्ये ते शिकायचे, जे शाही कुटुंबाच्या विशाल महालाजवळ आजही आहे. अमित शाह यांचे आजोबा गोकलदास यांचा तो महाल. त्यांचे काही मित्र त्यांचे किस्से सांगतात की, शाळेत एका नाटकात “पापा नो पक्ष पलटो” शहांनी एका वडिलांची भूमिका केली होती, जे आपल्या 6 मुलांना सरळ वळणावर आणतात.
त्यांचा आणखी एक मित्र राजूभाई पटेल सांगतात की, अहमदाबादच्या नौरंगपूरा इथं ते सोबत गोट्या आणि क्रिकेट खेळायचे. त्यांच्या म्हणण्यानुसार एक खेळाडू म्हणून शहा आपले लक्ष निश्चित करायचे. लक्ष गाठण्यासाठी रणनिती आखण्यात तर त्यांचे चांगलेच डोके चालायचे.
पटेल सांगतात की, शहांचे विचार एकदम अचूक असायचे आणि आरएसएसच्या राष्ट्रवादी सिद्धांतासाठी समर्पित होते. एखाद्या जादूगारा सारखं ते प्रत्येक व्यक्तीत आवश्यक त्या गोष्टी शोधून काढायचे. एकदा टार्गेट गाठल्यानंतर मी त्यांना कधी फेल होताना पाहिलं नाही.
आरएसएसचे वरिष्ठ स्वयंसेवक रतिभाई पटेल 80 च्या दशकाला सुरूवातीला शहांना सायकलवरून घेऊन जायचे. आरएसएसचा पहिला पाठ ते त्यांच्याकडूनच शिकले होते. ते सुद्धा मानतात की, त्यांच्यात रणनिती बनवण्याची क्षमता गजब आहे. आरएसएस परंपरेची त्यागाची भावना त्यांच्यात भरलेली आहे. फरक फक्त एवढाच आहे की, आधी ते पहिलवान होते, आता त्यांच शरीर भारी भरकम झालयं.
त्यांचे अजून एक सहकारी भरतभाई भट्ट सांगतात की, शहा नेहमीच सोबतच्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी तयार असायचे. 1998 मध्ये अहमदाबाद जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेत चेयरमन बनल्यानंतर ते गरीब, गरजू पण इमानदार आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांना कर्ज देण्याच्या बाबतीत उदार होतेहोते, पण ते वसूल करायच्या बाबतीत पण तितकेच कडक होते.
वीस वर्षांचे असताना शहांनी पीव्हीसी पाईप बनवण्याची छोटा फॅक्टरी उघडली. गुजरात मध्ये ठिबक सिंचनासाठी त्या पाईपांचा उपयोग व्हायचा. राज्यात ठिबक सिंचनासाठी लागणारे पाईप बनवणारे ते पहिले व्यावसायिक होते. गुजरातमध्ये मोदींनी आपल्या 12 वर्षाच्या कार्यकाळात ठिबक सिंचनावर खूप जोर दिला. आता गुजरात याबाबतीत टॉपला आहे. नंतर शहांनी शेयर मार्केटमध्ये पैसा लावायला सुरुवात केली. अमित शहांनी यांचा मुलगा जय शहा सांगतो की,
‘माझ्या वडिलांना व्यवसायात चांगलेच डोके होते, ते यात कायम राहिले असते तर मोठे व्यावसायिक बनले असते.
इंट्रेस्टींग गोष्ट म्हणजे शहा नेहमी आपली बायको सोनलबेन आणि मुलगा जयसोबत फिल्म पहायला जातात. अनेक वेळा तर फस्ट डे फस्ट शो. आपल्या सुखी कुटुंबाविषयी बोलताना शहा एका मुलाखतीत सांगतात की,
‘ कोणत्याही नेत्याचे कौटुंबिक जीवन जर सुखी नसेल तर त्याचं यश अर्धवटचं मानलं जात. मी याबाबतीत स्वत: ला नशीबवान मानतो.पण यामागचे श्रेय मी माझ्या पत्नी आणि मुलाला देईन, कारण मी त्यांना कमी वेळ देऊनही ते खूश आहेत.
अमित शहांच्या बाबतीतला आणखी एक किस्सा असा की, सोमनाथ मंदीराचे उपासक आहेत. जेव्हा सुप्रीम कोर्टाने सोहराबुद्दीन प्रकरणी त्यांच्या गुजरात प्रवेशास बंदी घातली होती आणि 2012 मध्ये ही बंदी हटवली होती. तेव्हा अमित शहा सर्वात आधी सोमनाथ मंदिरात पुजेसाठी गेले होते.
दरम्यान, 2010 ते 2012 पर्यंत गुजरातमध्ये बंदी घातलेली काळ अमित शहा यांच्यासाठी वरदान बनला. त्यांचा पत्नी आणि मुलाने त्यांना याकाळात खूप साथ दिली. मुलगा जय इंजीनियरिंगचे शिक्षण सोडून केसच्या वकिलांना भेटत होता. आपल्या कुटुंबासोबत शहांनी एकत्र दिल्लीत वेळ घालवला. शहा तो काळ नेहमी आठवताना सांगतात, माझ्या राजकीय लढाईमुळे माझ्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम झाला. पण त्यामुळे माझे कौटुंबिक नाते मजबूत झाले.
हे ही वाच भिडू :
- महाराष्ट्रात नाही पण बिहारमध्ये तरी अमित शहा शब्द पाळणार का ?
- या भेटीमुळे चर्चा सुरु झालीय, “अमित शहा जम्मू- काश्मीरसाठी मोठा निर्णय घेणार आहेत !”
- अमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री करणार होते.