एक आजार पसरला आणि गोव्याची राजधानीच बदलली

अख्या भारतात प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी फ्लॉप जाणारा प्लॅन म्हणजे गोवा. कारण गोवा म्हटलं की, एकतर घरचे लवकर काय पाठवत नाही आणि जरी पाठवलं तरी कुठं ना कुठं मांजर आडवी जातेचं. पण तरी प्रत्येकाचं ड्रीम असतं की एकदा तरी गोव्याला जाऊन यायचचं.

आता भिडू कारण तुम्हा आम्हा सगळ्यांनाचं माहितेय. एकतर गोव्यात बीच आहे, दूसरं स्वस्तात दारू, तिसरं तिथलं नेचर आणि चौथं फॉरेन टच वाटलं फिलिंग. त्यामुळे तरूण पोरांमधी तर गोव्याला जायची बरीच क्रेझ असते. त्यात जुनं गोवा आणि नवीन गोवा यांचा फॅनक्लब सुद्धा वेगळाच असतो.

आता जून्या गोव्यावरून आठवलं …. शाळेतल्या कुठल्याही पोराला विचारलं की गोव्याची राजधानी कुठली की तर ते लगेच सांगतयं पणजी. पण भिडू तुम्हाला माहितेय पणजी ही गोव्याची राजधानी नव्हतीचं , पण जसं सध्या कोरोना आला आणि सगळं चित्रचं बदललं तसाचं काहिसा प्रकार गोव्या सोबत झाला.

म्हणजे आता थोडं हिस्ट्रीपासून सुरूवात केली. तर असं म्हणतात की, १५ व्या शतकात विजापूर सल्तनतने मांडवी नदीच्या काठावर बंदर म्हणून या शहराची स्थापना केली. पण पुढे १५१० मध्ये पोर्तुगीजांनी ते ताब्यात घेतलं. त्यावेळी वेल्हा ही जून्या गोव्याची राजधानी होती.

पोर्तुगीजांचे व्हाइसरॉय आणि बाकी अधिकारी तिथेच रहायचे. पोर्तुगीजांची वेल्हा वसाहतचं होती. त्या सर्वांचे मुख्यालय तिथचं होतं, सगळा व्यापार तिथून चालायचा. त्यामुळे त्याला पूर्वेकडील ख्रिश्चनीकरणाचे केंद्र म्हंटले जायचे. १६ व्या शतकात त्यांची अंदाजे लोकसंख्या म्हणालं तर २,००,००० च्या आसपास होती, असं म्हणतात.

पण १७ वं शतक जसं उजाडलं तसं तिथं मलेरिया आणि कॉलराची साथ पसरली. शहर उद्ध्वस्त झाली. त्यात प्लेगने तर शहराला संपवायचचं ठरवलं होतं. दररोज हजारो लोक प्लेगच्या कचाट्यात सापडत होती. त्यामुळे लोक तो भाग सोडून दूसऱ्या ठिकाणी जायला लागली.१७७५ मध्ये तर फक्त १५०० लोकसंख्या उरली होती. त्यात व्हॉइसरॉय सुद्धा सध्याच्या पणजी भागात येऊन राहिले.

पणजी म्हणजे त्यावेळचा गावठाण भाग. लोकसंख्या तर पार कमी. जूना गोवा इथून १० किलोमीटर अंतरावर त्यामुळे लोकं प्लेगच्या भीतीने तो भाग सोडून पणजीमध्ये स्थलांतर झाले. हळू – हळू तिथली लोकसंख्या वाढली. पोर्तुगीज सुद्धा तिथून मसाल्याचा व्यापार करायला लागले.

आता सगळा कारभार, सगळी मुख्यालयं इकडं आल्यामूळं तिथं ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला. ज्यामुळे काहीच काळात पणजी छोट्या गावापासून मोठं शहर बनलं, आणि नंतर राजधानी म्हणून नावारूपाला आलं.

अशाप्रकारे एका व्हायरसमुळे गोव्याला पणजी राजधानी म्हणून मिळाली. आज पणजी पर्यटन केंद्राबरोबर सत्ताकेंद्र बनलीये.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.