milf xxx to love ru hentai. asian milf hot trio with pleasant babe.tamil sex

पुण्याच्या ARAI ने भारतात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारसाठी स्वदेशी चार्जर बनवलाय…

देशात इलेक्ट्रिक वाहनांची एन्ट्री झाल्यापासून लोक देखील यात इंटरेस्ट दाखवायला लागलीये. पेट्रोलच्या वाढत्या किमतीत काही रुपयांत सिंगल चार्जमध्ये गाडी वापरता येत असल्याने या वाहनांची अड्वान्स बुकिंग सुरु झालीये.

आता इलेक्ट्रिक वाहनं ही मुळात विदेशी संकल्पना. त्यामुळे या वाहनांचे बरेचसे पार्ट्स परदेशातूनच इम्पोर्ट केले जातात. ज्यामुळे या वाहनांची किंमत पेट्रोल- डिझलच्या वाहनांपेक्षा जास्त असते. हा आता काही भारतीय कंपन्यांनी ही इलेक्ट्रिक वाहनं बनवलीयेत, पण त्याचा चार्जर हा बाहेरूनचं मागवावा लागतो. 

आता या प्रॉब्लेमवर पुण्यातल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (ARAI) सोल्युशन शोधून काढलंय. एआरएआयने स्वदेशी प्रोटोटाइप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञान विकसित केलेय.

एआरएआयचे संचालक डॉक्टर रेजी मथाई यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की,

इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जर्स हे बाहेरील देशातून आयात करण्यात येतात. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आता एआरएआयने लाईट ईव्ही रिचार्ज पॉइंट तंत्रज्ञान विकसित केले आहे.

हे तंत्रज्ञान भारत चार्ज स्टॅंडर्ड, कॅडेमो, सीसीएस अर्थात कम्बाइन्ड चार्जिंग सिस्टीम यांच्या तोडीचे आहे.  त्याद्वारे भारतीय कंपन्याना आता स्वदेशी चार्ज उत्पादन करता येणे शक्‍य होणार असून हे चार्जर स्थानिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. 

त्यांनी पुढे म्हंटल कि, एआरएआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीतर्फे भारत एसी ००१ या पहिल्या चार्जरची निर्मिती केली जाणार आहे.  त्यासाठी आवश्यक चाचण्या प्रयोगशाळेत पूर्ण झाले असून त्याचा अनुपालन अहवाल देखील उच्च पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात  आलाय. सार्वजनिक क्षेत्रातील हा पहिलाच चार्जर असून याआधी एका खाजगी संस्थेने हे तंत्रज्ञान एआरएआयकडून घेतले आहे.

एआरएआयने २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ दरम्यान सिंम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०२१ या प्रसिद्ध वाहनविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.

एसी ००१ चार्जर हा एसी चार्जर असून चारचाकी वाहनांसाठी त्याचा वापर करणे शक्य आहे.  हा चार्जर सिंगल फेज असून त्याची बॅटरी २३० वोल्ट १५ अम्पियर क्षमतेची आहे. हा चार्जर वापरल्यानंतर किती वीज वापरली गेली, वाहन किती चार्ज झाले हे कळू शकणार आहे. महत्वाचं म्हणजे घराबरोबरचं हायवे वरही वाहन चार्ज करणे शक्य होईल.

त्याची सध्याची किंमत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये असणार आहे. तसेच भविष्यात टाईप टू प्रकारातील हाय पॉवर चार्जर सोबत दुचाकी वाहनांसाठी चार्जर निर्मिती करण्याचा कंपनीचा विचार आहे. 

येत्या काळात देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता एआरएआयच्या वतीने कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. एवढंच नाही तर पुण्याजवळच्या ताकवे या ठिकाणी नव्या मोबलिटी रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. या सेंटरसाठी वेगवेगळ्या टप्प्यात ऐकून ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.  केरळ व तेलंगणा येथील राज्य सरकारांशी याविषयी प्राथमिक चर्चा सुरू आहे.  अभ्यासक्रमाची काही ई-मोड्यूल्स आणि लॅबचाही यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) ही  संस्था १९९६ मध्ये स्थापन झाली, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीने भारत सरकारसोबत स्थापन केलेली देशातील आघाडीची ऑटोमोटिव्ह आर अँड डी संस्था आहे. ARAI ही भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाशी संलग्न एक स्वायत्त संस्था आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाने ARAI ला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था (SIRO) म्हणून मान्यता दिली आहे. पुढे, ARAI ही केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९ च्या नियम १२६ अंतर्गत भारत सरकारने अधिसूचित केलेली एक प्रमुख चाचणी आणि प्रमाणन संस्था आहे.

आता एआरएआयच्या या स्वदेशी चार्जरच्या उत्पादनामुळे इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळू शकेल. कारण चार्जरची निर्मिती जर भारतात केली तर त्याच्या इम्पोर्टवर लागणारे चार्जेस हटले जातील आणि काही प्रमाणात का होईना या वाहनांच्या किमती कमी होतील.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.

why not check here www.pornleader.net xxx sex vedios