३० वर्ष स्वतःच्या मुलीसहित इतर ६ जणींना घरात डांबून ठेवणारा अखेर मेला…

“१९९६ ची एक रात्र होती. काळोख्या शांततेत अचानक जोरात ओरडण्याचा आवाज मला आला. तो आवाज इतका कर्कश्य आणि भयावह होता की, आवाजाच्या दिशेने जाण्याचं देखील साहस माझ्यात होत नव्हतं. मात्र आवाज ओळखीचा होता म्हणून न राहावता आपोआप पावलं खिडकीकडे सरकत होती. तसतसा आवाज अजून स्पष्ट होत होता…

जोरजोरात किंचाळत, विव्हळत ‘मला मारून टाक’ अशी विनंती करणारा तो बायकी आवाज होता. हृदयाचे ठोके सांभाळत अखेर मी खिडकीतून बाहेर बघितलं. स्वतःच्याच रक्ताच्या थारोळ्यात माखलेली ती बाई माझी ‘आई’ होती आणि ज्याला ती अशा जीवनातून मुक्त करण्याची विनंती करत होती तो माझा ‘बाप’!

जो हसत तिच्या अवस्थेचं सुख भोगत होता.

त्यानंतर जे आयुष्य मी जगले ते एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे होतं, ज्याचे पंख कापले गेले आहेत. मला वाटायचं…देवा, जर सर्व जग असंच होणार असेल तर मी यात जगू शकत नाही. आता मृत्यु हाच उपाय आहे. मात्र तो मरू देखील देत नव्हता. तो बाप नव्हता नराधम होता.”

हे शब्द आहेत केटी मॉर्गन-डेव्हिस यांचे. आणि ज्या व्यक्तीबद्दल त्या सांगताय तो व्यक्ती ‘अरविंदन बालकृष्णन’.

अरविंदन बालकृष्णन याने जवळपास ३० वर्ष आपल्याच मुलीला कैद करून ठेवलं होतं. फक्त केटी एकटीच नाही तर अशा ६ महिलांना त्याने इतकेच वर्ष कैद केलेलं होतं. त्यांना तो मारहाण, बलात्कार आणि मानसिक टॉर्चर करायचा. त्यात त्याला खूप सुख भेटायचं. कुणालाही एकमेकांशी बोलणं, आवाज काढणंही निषिद्ध होतं. त्याला पाहिजे तेव्हा तो नियम बदलायचा. 

तो सगळ्यांची मनं वाचू शकायचा असा त्याचा दावा होता. घरातून कुणीच बाहेर पडू नये, अशी धमकी तो त्यांना द्यायचा. कुणी असं करू नये म्हणून त्याचे जासूस त्याने सगळीकडे ठेवल्याचं सांगायचा.  तसंच त्याला न विचारात काही करायचा प्रयत्न जरी केला तर ‘जॅकी’ त्यांना मारून टाकेल असं तो सांगायचा.

जॅकी म्हणजे त्याचा काल्पनिक रोबोट. 

WhatsApp Image 2022 04 09 at 7.16.04 PM

अरविंदन इतका सायको होता की, स्वतःला तो देव म्हणायचा.

त्याचा जन्म केरळमध्ये झाला. नंतर तो वडिलांसोबत सिंगापूरला गेला. त्याचे वडील ब्रिटिश नौदलात कारकून होते. नंतर अरविंदन शिक्षणासाठी लंडनला गेला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. कालांतराने तो इंग्लंडमधील सक्रिय लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आला. तसा तो स्वत:ला आणि पत्नी चंदाला कॉम्रेड म्हणू लागला. 

‘कॉम्रेड बाला’ किंवा ‘कॉम्रेड बी’ असं त्याने स्वतःचं नाव केलं. यासोबतच त्याने अनेक महिलांना आपल्या विचारधारेचं अनुयायी बनवलं. पुढे याच महिलांना त्याच्या क्रूरतेला बळी पडावं लागलं.

केटी मॉर्गनच्या सांगण्यानुसार…

त्याने ज्या लोकांकडे पाहिलं ते स्टॅलिन, माओ आणि पोल पॉट आणि सद्दाम हुसेन सारखे लोक होते. ते त्याचे देव आणि नायक होते. हे असे लोक होते ज्यांचं त्याला अनुकरण करायचं होतं. मात्र अगदी विकृत मार्गाचा त्याने अवलंब केला होता. महिलांना नजरकैदेत ठेवण्यात त्याला यश वाटायचं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणं, महिलेचा विनयभंग करणं आणि बळजबरीने त्यांना नरक यातना देत डांबून ठेवणं त्याला आवडायचं.

अशा त्याच्या पापाचा भांडाफोड झाला तो २०१६ मध्ये, तेव्हा त्याला २३ वर्षे तुरुंगात टाकण्यात आलं. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की, तो असं का करायचा? तेव्हा अरविंदनने न्यायालयात सांगितलं…

WhatsApp Image 2022 04 09 at 7.16.14 PM WhatsApp Image 2022 04 09 at 7.17.11 PM

सिंगापूरमधील आणीबाणीच्या परिस्थितीतून तो आला होता. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर तिथे ‘क्रूरता अविश्वसनीय आणि भयंकर होती’, विशेषत: ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली त्यांच्यासाठी. क्रूरता, हत्या, छळ, अटक आणि संपूर्ण कुटुंबांना चीनला परत पाठवण्यात आले. हे कोणालाच आवडणार नाही. 

अशा परिस्थितीतून सुटून अरविंदन यूकेमध्ये आला. तो लवकरच राजकीय गटात सामील झाला आणि स्वतःला ‘क्रांतिकारक समाजवादी’ म्हणून संबोधू लागला. सार्वजनिकपणे बोलू लागला आणि सहकारी विद्यार्थ्यांची भरती करू लागला. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस, बालकृष्णन याने मार्क्सवाद-लेनिनवाद-माओ झेडोंग विचारसरणीची कामगार संस्था स्थापन केली, ज्याचा उद्देश “फॅसिस्ट राज्य” उलथून टाकणं हा होता.

तेव्हाच त्याने त्याच्या अनुयायांना स्वतःला ‘कॉम्रेड बाला’ म्हणण्याचा आग्रह धरला.

कालांतराने, त्याचे विचार अधिकाधिक टोकाचे होत गेले. त्याच्या अनुयायांना कम्युनिस्टविरोधी मृत्यूमध्ये आनंद साजरा करण्याचा आदेश तो द्यायचा. आणि इकडे महिला स्त्रियांशी क्रूरतेने वागायचा.

अशा या क्रूरकर्म्याचा वयाच्या ८१ व्या वर्षी ७ एप्रिल २०२२ ला मृत्यू झाला आहे. दक्षिण लंडनमधील डार्टमूर तुरुंगात तो बंद होता. मात्र तिथेही त्याच्या सह-कैद्यांना त्याची भीती वाटायची.

तिथे देखील त्याचा ‘जॅकी’ कैद्यांच्या जीवावर उठला होता..!

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.