वर्ल्डकपमधल्या या पराभवामुळे महेंद्रसिंग धोनीचे पुतळे जाळण्यात आले होते.

शनिवारी या वेळच्या वर्ल्डकप मधला सगळ्यात रंगतदार सामना पाहायला मिळाला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान. बलाढ्य भारताला अफगाणिस्तान सारख्या नवख्या टीमने चांगलेच झुंजवले. एक वेळ अशी आली होती भारताला पराभवाची नामुष्की सहन करावी लागते की काय असे वाटत होते. पण शेवटी शमीने घेतलेल्या हॅटट्रिकमुळे ही वेळ आली नाही. या मॅचच्या निम्मिताने जुन्या एका मॅचच्या दुखऱ्या आठवणी जाग्या झाल्या.

२००७ च्या वर्ल्ड कप मधील ती मॅच.

भारताची ग्रुप स्टेजमधली पहिलीच मॅच बांगलादेश विरुद्ध होती. सगळ्यांनाचं माहित होते सचिन, द्रविड, गांगुली, सेहवाग, धोनी युवराजसारख्या बलवान बॅटिंग लाईनअप पुढे बांगलादेश म्हणजे अगदी शाळकरी टीम आहे. कोणी सट्टेबाज देखील बांगलादेश वर पैसे लावायला तयार नव्हते.

१७ मार्च २००७. कॅप्टन राहुल द्रविडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटीग करायचा निर्णय घेतला. गांगुली, सेहवाग ओपनिंगला उतरले. भारताच्या अवघ्या ६ धावा झाल्या होत्या तेवढ्यात मश्रफी मुर्तझाने सेहवागला बोल्ड काढले आणि फन्सन पहिला धक्का बसला.

तिथून पुढे भारतीय टीमला गळती सुरु झाली. उत्थापा, तेंडूलकर एकआकडी स्कोर बनवून पॅव्हेलीयनमध्ये परतले. द्रविडसुद्धा काही कमाल करू शकला नाही. महेंद्रसिंग धोनी तर डकवर आउट झाला. फक्त गांगुली आणि युवराजने दिलेल्या थोड्याफार लढ्यामुळे टीमचा स्कोर १९१ पर्यंत पोहचू शकला. मुर्तझा ने ४ विकेट्स पटकावल्या होत्या.

भारताला बॉलिंगमध्येही काही करता आले नाही. बांगलादेशने तमिम इक्बाल, मुशफिकर रहीम, शकीब अल हसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हे टार्गेट सहज गाठले. लाजीरवाण्या पराभवाने वर्ल्डकपच्या मोहिमेची सुरवात झाली

त्यादिवशी जे घडलं ते अविश्वसनीय आणि थक्क करणारं होतं. 

स्पर्धेच्या साखळी फेरीतच बांगलादेश कडून लज्जास्पद पराभव झाल्यानंतर बर्मुडा संघा विरुद्ध चांगली खेळी करत सामना जिंकला होता. पण पुढच्या फेरीत जाण्यासाठी  राहुल द्रविडच्या नेतृवातील भारतीय संघाला श्रीलंका सारख्या मोठ्या संघाला पराभूत करण्याचे आव्हान उभे होते.

या सामन्यातही भारताची बटिंग ढेपाळली. पूर्ण टीमने मुरलीच्या फिरकी पुढे १८५ धावात नांगी टाकली. सचिन आणि धोनी शून्यवर बाद झाले होते. धोनीचा या वर्ल्ड कप मधला दुसरा डक होता. श्रीलंकेने ६९धावांनी पराभव करत भारताला वर्ल्डकप मधून बाहेर काढले.

त्यानंतर प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी भारताच्या बाहेर पडताच प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. काही महिन्यानंतर राहुल द्रविड सुद्धा संघाच्या कर्णधारपदावरून पाय उतार झाला.

बांगलादेश सारख्या लहान्या संघाविरुद्ध हरल्याने भारतीय चाहते प्रचंड नाराज झाले होते. आपला संताप व्यक्त करायला ते रस्त्यावर उतरून प्रदर्शने करायला लागले. अशातच रांची मधील महेंद्रसिंग धोनीच्या घरावर २०० हून अधिक लोकांना हल्ला करत दगडफेक केली होती. घराच्या भिंती आणि खांब पाडले होते.

नाराज झालेल्या चाहत्यांनी धोनी हाय, धोनी हाय अशी निदर्शने केली होती. शिवाय जमावाने धोनीचा पुतळा सुद्धा जाळला होता. तेव्हा धोनीच्या घराचे संरक्षण वाढवून घराबाहेर अर्धसैनिक बलाची तुकडी तैनात करण्यात आली होती.

ms pro 1791189
 AFP PHOTO/SAM PANTHAKY (Photo credit should read SAM PANTHAKY/AFP/Getty Images)

अहमदाबाद मध्ये देखील अशीच निदर्शने केली गेली होती. त्यात कर्णधार राहुल द्रविडचा पुतळा जाळण्यात आल आहोत तर वीरेंद्र सेहवाग विरुद्ध घोषणाबाजी केली गेली होती. अशीच निदर्शने कलकत्त्यातही चालली होती. त्याबद्दल धोनी सांगतो,

“आम्ही दिल्लीत परतल्यावर आम्हला पोलीस व्हॅन मधून बाहेर येण्यात आले. मी वीरेंद्र सेहवाग समोर बसलो होतो. संध्याकाळ किंव रात्रीची वेळ असेल. आणि मध्येच आम्हाला मिडीयाच्या गाड्यांनी घेरले त्यांचे मोठ्याले कॅमेरे आणि लाईट्स आमच्यावर रोखलेले. तेव्हा अस वाटत होत की, जणूकाही आम्ही एखादा मोठा गुन्हाच केला आहे. एखादा खून किंवा दहशतवादी कारवाई केली आहे. थोड्या वेळाने आम्ही पोलीस स्टेशनला पोहचलो आणि थोडा इथेच बसलो. नंतर १५-२० मिनिटांनी आम्ही आपापल्या गाड्यांनी घरी गेलो. या सगळ्याचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आणि त्यातून मी स्वत चांगला क्रिकेटर व चांगला माणूस बनण्याचा निर्णय घेतला.”

क्रिकेट पंडितांच्या मते २००७ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या पराभवात प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्याच्या गोंधळलेल्या प्रयोगामुळे भारतीय टीम फसत गेली. पण सगळ्यात मनाला लागणारी घटना म्हणजे त्या दिवशीचा बांगलादेश विरुद्धचा पराभव होता.

२०११ च्या पुढील वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशाने उतरली. पहिलाच सामना बांगलादेश विरुद्ध होता. वीरेंद्र सेहवागने त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये आधीच घोषणा दिली होती. त्याने त्या सामन्यात धुव्वांदार १७५ धावा फटकावल्या. बांगलादेशला ८७ धावांनी हरवले. भारतीय प्रेक्षकांचा हा राग शांत केला.

एवढच नव्हे तर त्या वेळचा वर्ल्ड कप उचलून धोनीने कित्येक वर्षाचं भारतीय स्वप्न पूर्ण केलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.