आता क्रिकेट लीगला कलम 370 चं नाव दिलं जातंय

जवळपास 3 वर्षांपूर्वी म्हणजेचं 2018 साली केंद्रातील मोदी सरकारने  जम्मू-काश्मीर राज्याला विशिष्ट राज्याचा दर्जा देणारं कलम 370 काढून टाकल. आपल्या या निर्णयामुळे देशभरात मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षाव झाला. मोदी सरकारच्या चांगल्या कामाच्या यादीत या निर्णयाचा उल्लेख आवर्जून होतो. याचाच फायदा घेऊन आता मोदी सरकार कलम 370 च्या नावे स्पोर्ट्स लीग सुरु करणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदारसंघ असणाऱ्या गांधीनगरमध्ये या लीग भरणार आहेत. ज्यात भारतीय जनता पक्षाकडून  क्रिकेट आणि कबड्डी लीग सुरू करण्यात येणार असल्याचं समजतंय. 

आता या लीगमध्ये 370 चा संबंध म्हणजे गांधीनगरमध्ये भरणाऱ्या या लीगला नगर लोकसभा प्रीमियर लीग 370 किंवा GLPL 370 म्हटले जाईल. यामागे दोन हेतू आहेत एक म्हणजे  कलम 370 नंतर तरुणांमध्ये खेळांना प्रोत्साहन देणे आणि दुसरं म्हणजे भाजपला याच्याशी जोडणं.

 मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या या स्पोर्ट्स लीगमध्ये क्रिकेटसाठी 1400 संघांनी आणि कबड्डीसाठी 400 संघांनी रजिस्ट्रेशन केलं आहे.

पक्षाच्या राज्य युनिटचे सरचिटणीस प्रदीप सिंग वाघेला यांनी एका  वृत्तसंस्थेशी बोलताना म्हंटले की,

शहा हे गुजरातचा आवडता चेहरा आहेत आणि त्यांनीच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपवण्यासाठी कलम 370 रद्द केले. 370 हटवल्यानंतर त्यांच्याबद्दल तरुणांचे प्रेम अधिक वाढले आहे. आणि म्हणूनच भाजपने कलम 370 वर लीगचे नाव  ठेवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन जास्तीत जास्त तरुणांना भाजपशी जोडता येईल.

त्यांनी पुढे म्हंटले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खेळांमध्ये भारताचा सहभाग वाढवण्यावर भर दिला होता.  त्यामुळे तरुणांना कोणताही खेळ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा या स्पर्धेच्या आयोजना मागचा उद्देश आहे.  आम्ही क्रिकेट आणि कबड्डीपासून सुरुवात केली आहे, पण आम्ही अॅथलेटिक्समध्येही प्रयोग करणार आहोत.

 डिसेंबर ते जानेवारी दरम्यान या स्पोर्ट्स लीगचे आयोजन करण्यात आले आहे. 

पटेल यांच्या म्हणण्यानुसार किमान 2,000 क्रिकेट टीम एकत्रित करण्याचा विचार आहे. एक बूथ एक टीम म्हणून काम करेल.

दरम्यान, भाजपच्या या स्पोर्ट्स लीगमध्ये महिलांचा समावेश नाही. 18 वर्षांच्या वयोमर्यादेसह केवळ पुरुषांच्या सहभागास परवानगी आहे. तसेच फक्त तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी कमाल वय २५ वर्षे ठेवण्यात आले आहे.

पटेल यांनी सांगितले की , स्पर्धेचे आयोजन करणे ही गृहमंत्र्यांची कल्पना होती. एक बैठक झाली होती ज्यात शाह म्हणाले की, ऑलिम्पिक 2020 मध्ये देशाने चांगली कामगिरी केलीये आणि संघटनेच्या स्तरावर असेच काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. यातूनचं या लीगची  कल्पना पुढे आली. आणि आम्ही सर्वांनी या लीगचे नाव ठरवले. 

 पटेल म्हणाले, “15-20 आमदार असलेल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात संघटनेच्या ज्येष्ठ सदस्यांनी ठरवले की, असे नाव आल्याने राजकीय संदेश जाईल आणि त्याच वेळी तरुण भाजपमध्येही सामील होतील. पण हो गेममध्ये सहभागी होण्यासाठी सहभागींनी भाजप समर्थक असण्याची गरज नाही.

या लीगच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अमित शहा देखील येणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. 

आता स्वता: भाजप नेत्याने क्लियर केलयं की, भाजपमध्ये तरूणांना सहभागी करून घेणं या लीगचे उद्दिष्ट आहे. आणि आपलं हेचं उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी भाजप मंडळी कलम 370 च्या निर्णयाचं मार्केटिंग करतयं.

Leave A Reply

Your email address will not be published.