आठ वर्षांनी तुरूंगातून बाहेर आले. पण, आजही माजी आमदार रमेश कदम यांची क्रेझ आहे..

सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ शहरात २५० पैक्षाही अधिक बॅनर, फुलांची उधळण, हजारो कार्यकर्ते, रस्ते जाम आणि जोरदार घोषणा बाजी. हा सगळा थाटमाट होता मोहोळची माजी आमदार रमेश कदम यांच्यासाठी. आठ वर्षापासुन तुरूंगात असलेल्या रमेश कदमांची सुटका झाल्यानंतर त्यांच स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागताचे व अभिनंदनाचे बॅनर लावले होते. तसेच जेलमधुन सुटल्यानंतर अनेकांनी आपल्याशी संपर्क केला आहे असं त्यांनी म्हणलं आहे.

रमेश कदम यांच्या जेलमधून सुटण्यापेक्षा ते कोणासोबत जाणार यांचीच चर्चा अधिक प्रमाणात आहे. रमेश कदम यांच्यासाठी मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट हे ही प्रयत्न करत आहेत. त्यांची जेलमधून सुटका झाल्याने मोहोळ मतदार संघातील अनेक राजकीय गणितही बदलणार असल्याचं बोललं जात आहे. ज्यांच्या जेलमधुन सुटण्याने एवढी चर्चा होत आहे ते रमेश कदम कोन आहेत?. त्यांची मतदार संघात ताकद किती? सर्वच पक्षांना रमेश कदम का हवे आहेत जाणून घेऊयात.

सुरवातीला जाणून घेऊ रमेश कदम कोन आहेत?

रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. सोलापूर-मोहोळ मतदारसंघाचे आमदार म्हणून २०१४ ते २०१९ ला त्यांनी प्रतिनिधित्व केलं. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी तुरूंगात असताना अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. कुठेही प्रचार न करताना त्यांना २५ हजार मतं पडली. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या तोंटावर रमेश कदम यांना उमेदवारी दिली. भाजपचे क्षीरसागर व शिवसेनेचे शेजवाल यांचा पराभव करत रमेश कदम यांनी बाजी मारली.

काही महिन्यांनी कदमांनी स्वत:चे कार्यकर्ते निर्माण करून जम बसवायला सुरवात केली होती. ८ महिन्यांच्या कार्यकाळात थेट नागरिकांच्या समस्यांना हात घालत मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता अशा योजना सुरू केल्यामुळे ते जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर चर्चेत आले. त्यानंतर त्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात अध्यक्षपद मिळालं. अगदी कमी कालावधीत त्यांनी मोहळ मतदार संघात जम बसवला.

रमेश कदम बॅकफुटवर पडले  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात अध्यक्षपद मिळाल्यानंतर.

अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये ३१२ कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले. या प्रकरणी त्यांना ८ वर्षापुर्वी म्हणजेच २०१५ ला अटक करण्यात आली. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलं. तेव्हा पासुन रमेश कदम हे तरूंगात होते. २०१९ च्या निवडणूकीत त्यांना फारस सक्रीय होता न आल्याने आणि पक्षाने निलंबीत केल्याने त्यांना निवडणूकीत पराभूत व्हाव लागलं. जेलमध्ये गेल्या कारणाने मागच्या आठ वर्षात ते सक्रीय राजकारणातून बॅकफुटवर पडले.

रमेश कदम हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत.

मागे एका व्हिडीओ क्लीपमध्ये रमेश कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसुन आलं होतं. त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि २५ हजारांची लाच मागितली होती असा आरोप रमेश कदम यांनी केला होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते. तसेच मोहोळ येथील रस्त्यांवर प्रशासनाने लावलेली जाळी काढल्याच्या कारणावरुन सरकारी गुन्हा दाखल झाल्यानंतर, अटक होण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अटक आंदोलन त्यांनी केलं होतं. त्यावेळी आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली होती. या आणि अशा अनेक घटनेमुळे माजी आमदार रमेश कदम चर्चेत आले होते.

रमेश कदम यांना पक्षात घेण्यासाठी सर्वच पक्षांची चढाओढ लागल्याची पहायला मिळत आहे.

त्त्याच कारण त्यांची  सुटका झाल्या नंतर ठीकठीकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्यात शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तसेच मनसेनही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहरात पोस्टर लावले आहेत. तर रमेश कदम यांच्या म्हणण्यानुसार अनेक नेत्यांचे त्यांना पक्षात येण्यासाठी फोनही आलेले आहेत. त्यामुळे रमेश कदम यांची मतदार संघात नेमकी किती ताकद आहे असा प्रश्न नक्कीच पडतो.

आता जाणून घेऊया रमेश कदम यांची मोहोळ मतदार संघात ताकद किती आहे.

मोहोळ मतदारसंघ हा अनुसुचीत जातीसाठी राखीव आहे. सध्या यशवंत माने हे त्याठीकाणचे आमदार आहेत. यशवंत माने हे सध्या अजित पवार गटाकडून आहेत.

२०१४ च्या निवडणूकीत त्यावेळचे उमेदवार लक्षण ढोबळे यांचं तिकट कापून अजित पवार यांनी रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती.

त्यावेळी कदम निवडून आले आणि मतदार संघात आपलं वजन वाढवायाल सुरवात केली. पक्ष कोणता आणि झेंडा कोणता या पलीकडे जावून त्यांनी काम करायला सुरवात केली. मतदार संघातील विकास कामांमुळे त्यांची चर्चा सुरू झाली आणि त्यांनी त्यांचा मतदार बेस तयार केला.  रमेश कदम आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर मतदार संघात कर्ज वाटपासाठी त्यांनी मोठ मोठे कार्यक्रम घेतले. संपुर्ण मतदार संघात आपल्या कामाने आपला मतदार वर्ग तयार करण्यात त्यांना यश आलं. २०१९ ची विधानसभा निवडणूकीत कुठलाही प्रचार न करता २५ हजार मतं घेत त्यांनी पुन्हा एकदा त्यांची लोकप्रियता सिध्द केलेली आहे.

आता जेलमधून सुटका झाल्यानंतर थेट जनतेत जावून त्यांनी निवडूण लढवणार असल्याचं सांगितलं आहे. थेट मतदारांशी संपर्क असलेला आणि आपल्या कामामुळे चर्चेत असलेला उमेदवार आपल्या पक्षात असावा असं दोन्ही पवार गटाला वाटत आहेत. तसेच यात मनसेचीही हिच इच्छा आहे. पण, आपण जनतेत जावून त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हण्टलं आहे. स्थानिक राजकारणात आपला जम बसवलेले माजी आमदार रमेश कदम येत्या काळात कोनासोबत जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुटका झाल्यानंतर केलेलं शक्तीप्रदर्शन नक्कीच राजकीय समिकरण बदलवणार आहे हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.