भारताने पहिली गगनयान चाचणी यशस्वी पुर्ण केलीये, भारत स्वबळावर माणूस आवकाशात पाठवणार आहे..

प्रत्येक अपयशानंतर यश येतचं..फक्त प्रयत्न सोडता कामा नये..याची प्रचिती पुन्हा एकदा २१ ऑक्टोबरला आली..भारताने चंद्रयान-३ मोहीम यशस्वी केल्यानंतर, इस्रोची टीम तयारीला लागली, ती मानवरहित गगनयान मिशनच्या.. २१ ऑक्टोबरला त्याची पहिली चाचणी होती. ठरल्या प्रमाणे तयारीही झाली पण, हवामानाचा अंदाज घेण्यात आला, अन् पहिल्याच चाचणीत खराब हवामानामुळे भारताला अपयश आलं..पण म्हणतात ना, कोशीश करेने वालो की कभी हार नही होती, अगदी तेच वाक्य डोळ्या समोर ठेवून इस्रोच्या  टीमने..पुन्हा एकदा चाचणी घेतली आणि ती चाचणी यशस्वी झाली. २१ ऑक्टोबरच्या चाचणी दरम्यान काय घडलं?  मिशन गगनयान आहे तरी काय?  या मोहिमेतून काय साध्य होणार आहे?  मोहीमेचा एकुन खर्च किती?  याअगोदर कोणत्या देशांनी ही मोहीम यशस्वी केली आहे? भारताच्या या मोहीमेला किती दीवस लागणार आहेत जाणून घेऊया..

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने, २१ ऑक्टोबरला मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची,पहिली चाचणी घेण्याचा निर्णय घेतला..

सुरवातीला सकाळी ८ वाजता उड्डाण होणार होतं..मात्र खराब हवामानामुळे उड्डाणाची वेळ बदलून ८ वाजून ४५ मिनटं करण्यात आली. मात्र इंजिन त्यावेळी व्यवस्थित सुरू झालं नाही..या चाचणीसाठी टीव्ही-डी१ म्हणजेच द न्यू टेस्ट व्हेईकल  या रॉकेटचा वापर करण्यात आला आहे.. मानवी अवकाश मोहिमेत, अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी टीव्ही-डी१ मधील, क्रू मोड्यूलद्वारे ही चाचणी घेण्यात आली..क्रु मोडेल म्हणजे अंतराळविरांना ज्यामाध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं ते यंत्र..  पहिल्याच प्रयत्नात खराब हवामानामुळे भारताला अपयश आलं. पण, शास्त्रज्ञ निराश झाले नाही. चंद्राला गवसणी घालणाऱ्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न सुरूच ठेवले अन् अवघ्या दोन तासात दुसऱ्यांदा चाचणी घेतली.. श्रीहरीकोटातून उड्डाण घेतलेल्या यानाने बंगालच्या खाडीत यशस्वी लँडिंग केलं आणि गगनयानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली.. यामुळे संपुर्ण देशात आनंद साजरा करण्यात आला..

आजची पहिली गगनयान चाचणी तर यशस्वी झाली..पण ही गगनयान मोहिम काय आहे?

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी, लाल किल्लयावर केलेल्या भाषणात या मोहिमेची घोषणा केली होती. गगनयान २०२२ मध्येच प्रक्षेपित होणं अपेक्षित होते. पण,  कोविड माहामारीमुळे या मोहिमेला उशीर झाला..त्यानंतर आता या मोहीमेची तयारी सुरू झालीय.. ही मोहीम जर यशस्वी झाली तर, मानवा सोबत अंतराळ मोहीम करणारा भारत चौथा देश ठरेल. गगनयान मोहीम ही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे आणि त्याची पहिली चाचणीही पुर्ण झालीय. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येईल. भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील व दिलेल्या टार्गेट नुसार अवकाशाचा आभ्यास करतील..

ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे..कारण भारत पहिल्यांदा मानव विरहित आवकाशात जाण्याचा प्रयत्न करणार आहे..

ज्या रॉकेटच्या माध्यमातून ही मोहीम करण्यात येणार आहे.. ते रॉकेट यान इस्रोने तयार केलेलं आहे.. त्यामुळे भारताला आपल्या तत्रंज्ञाची ताकद किती आहे, हे जगाला सांगता येणार आहे..दुसरी गोष्ट म्हणजे भारतातील इतर भविष्यातील मोहीमा पुर्ण करण्यासाठी ही मोहीम फायद्याची आसणार आहे.. कारण या मोहीमेच्या माध्यमातून ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर, हे अंतराळ केंद्र आवकाशात उभारण्यासाठी मदत होईल.. या मोहीमेच्या माध्यमातून त्याचाही आभ्यास केला जाईल..या मोहीमेच्या माध्यमातून अंतराळात वेगवेगळे प्रयोग केले जाणार आहेत.. जसेकी यानाचं उड्डण आणि यान आपेक्षीत ठीकाणी पोहचवणं आणि थांबवण, इतर ग्रहावर जाण्यासाठी योजना आखणं..शिवाय अंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर चांगले आणि विश्वासु संबध या निम्मित्ताने वाढतील..

भविष्यात जागतिक अवकाश सेंटरचा यामुळे विकास होऊ शकतो आणि राष्ट्रीय हिताच्या संशोधनामध्ये भारताच एक वेगळं स्थान, जागतिक लेव्हलवर होऊ शकतं..

भारताच्या विज्ञान आणि संशोधनला यामुळे चालना मिळण्याचीही अपेक्षा आहे…यामुळे तत्रज्ञांन उद्योगात भारताचा आर्थिक फायदा होऊ शकतो..ही मोहीम भारतासाठी आणखी एका कारणासाठी महत्वाची आहे..कारण भारत स्वत:च्या यंत्राने ही मोहीम पुर्ण करणार आहे..ही मोहीम पुर्ण करणारा भारत जगातला चौथा देश ठरू शकतो..    इस्रोच्या मते, या चाचणीचे दोन उद्देश आहेत. पहिला उद्देश म्हणजे न्यू टेस्ट व्हेकल हे रॉकेट कस काम करत आणि दूसरा उद्देश आहे, गगनयान मोहिमेच्या वेळी, जर आपतकालीन परिस्थिती उद्भवली तर क्रू मॉडेलला रॉकेट पासून कसं दूर ठेवता येईन.

या अगोदर मानवरहित स्वबळावर अवकाश मोहीम करण्यात आल्या आहेत..

१२ एप्रिल, १९६१ रोजी ही मोहीम सोव्हीएत रशियाने केली होती.. रशियाकडून युरी गागारिन १०८ मिनिटं, अंतराळात राहणारे पहिले व्यक्ती ठरले होते. भारताचे राकेश शर्माही,  ३ एप्रिल, १९८४ रोजी रशियाच्या सोयुज टी-११ या यानाने अंतराळात गेले होते. तर, २० जुलै, १९६९ रोजी अमेरिकेच्या नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिल पाऊल ठेवल होत. शिवाय १५ ऑक्टोबर २००३ रोजी पायलट यांग लिवेई यांनी चीनकडून पहिली अंतराळ मोहीम केली.. भारताची जर ही मोहीम यशस्वी झाली, तर भारत स्वबळावर आवकाश मोहीम करणारा चौथा देश ठरणार आहे..या मोहीमेची जेवढी चर्चा आहे, तेवढीच चर्चा या मोहीमेसाठी होणाऱ्या खर्चाचीही होत आहे..

या अगोदर भारताला चंद्रयान मोहीमेसाठी ६१५ कोटी रूपये एवढा खर्च आला होता..तर गगनयान मोहीमेसाठी एकुन खर्च, जवळपास ९००० हजार कोटी रूपये एवढा येण्याचा अंदाज आहे..

म्हणजे चंद्रयान मोहीमेपेक्षा किती तरी पटीने हा खर्च मोठा असणार आहे, हे मात्र नक्की..

पण, आता एक प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल, चाचणी तर झाली पुढे काय?

तर, २१ ऑक्टोबर ला TV-D1 म्हणजे, व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लाईटची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.. त्यानंतर D2,D3,D4  या चाचण्या होणार आहेत..या चाचण्या कधी होणार या बद्दल अधिकृतरित्या इस्त्रोने सांगितलेलं नाही. पण.ही मोहीम तीन दिवस असेल, यामध्ये तीन अंराळवीर असतील..जे पृथ्वीच्या ४०० किलोमीटर कक्षेत जातील..ही मोहीम २०२५ पर्यंत पुर्ण होईल असा अंदाज आहे.. ही मोहीम पुर्ण झाल्यानंतर भारत जगाच्या पटलवार पुन्हा एक नवी ओळख निर्माण करू शकणार आहे.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.