सलमान खुर्शीद हिंदुत्वाची तुलना करतायेत ती बोको हराम संघटना नक्की आहे तरी काय

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून सध्या वाद सुरु झालाय. खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकातून हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. ज्यांनंतर एकच गोंधळ उडालाय. याप्रकरणी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यावर वकील विवेक गर्ग यांनीही दिल्लीत तक्रार दाखल केली आहे.

आता इसिस या दहशतवादी संघटनेबाबत अनेकांना माहित असेल. कारण अनेक दहशतवादी हल्ल्यात या संघटनेचा हात असतो. ज्यामुळे माध्यमातही त्याची चर्चा होत असते. पण खुर्शीत यांनी आपल्या पुस्तकात आणखी एका दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला आहे, ती म्हणजे बोको हरम.

तर बोको हराम ही नायजेरियातील एक दहशतवादी संघटना आहे. ज्यांची दहशत उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये आहे. या संघटनेला इस्लामिक स्टेट्स ऑफ वेस्ट आफ्रिका प्रांत (ISWAP) असेही म्हटले जाते.

२००२ पासून ही संघटना सक्रिय आहे. अबूबकर शिकाऊ आणि अबू मुसाब अल-बारनवी हे या संघटनेचे मुख्य नेते होते. यातला अबूबकर शिकाऊ हा यावर्षीच्या मी महिन्यात मारला गेला. असं म्हंटल जातंय कि, त्याने आत्महत्या केली होती. 

या संघटनेने अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहे. ज्यात चाड आणि कॅमेरून या देशांचाही समावेश आहे. माहितीनुसार नायजेरियन बोर्नो राज्यातील मिडुगुरी शहरातील स्थानिक बाजारपेठेत आत्मघाती बॉम्बरने लोकांमध्ये स्फोट घडवून आणला. एकापाठोपाठ एक तीन आत्मघातकी हल्ल्यांनी परिसर हादरला. स्फोटांनंतर आरडाओरडा सुरू केला, बाजारात चेंगराचेंगरी झाली आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागले. 

यावेळी २२ जणांचा मृत्यू झाला तर २८ जण जखमी झाले. तर वैद्यकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार जखमींची संख्या ७० पेक्षा जास्त आहे, ज्यात तीन हल्लेखोरांचा सुद्धा समावेश आहे. हे हल्ले बोको हरमने घडवून आणल्याचे उघड झाले.

नायजेरियातील लष्कर आणि पोलिसांनी २००९ मध्ये कट्टरपंथी संघटना बोको हरामच्या विरोधात ऑपरेशन सुरु केले गेले आणि यादरम्यान आतापर्यंत २०,००० लोक मारले गेले आहेत तर २६ लाख बेघर झाले आहेत. बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या शेकडो दहशतवाद्यांना खटल्यासाठी नागरी न्यायालयात हजर करण्यात आले असताना हे आत्मघाती हल्ले करण्यात आले आहेत.

२०१४ मध्ये या संघटनेने आपला आवाका वाढवला आणि हल्ल्यांमध्येही दुपटीने वाढ केली, त्याच्या वाढत्या ताकदीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की,  दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत २०१३ मध्ये नायजेरिया पाचव्या नंबरवर होता, पण पुढच्याच वर्षी म्हणजे २०१४ तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. 

तसं पाहिलं तर  मशीन गन वापरून सामूहिक हत्या ही त्यांची वेगळी ओळख आहे. पण आपली ताकद वाढवण्यासाठी या संघटनेने बाकीच्या दहशतवादी संघटनांकडून सुद्धा प्रशिक्षण घेतलं, स्फोटके आणि बॉम्बचा वापर करण्यास सुरुवात केली. 

इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीसने जारी केलेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्सनुसार, ISIS ने २०१४ मध्ये ११.८७२ लोकांना मारले, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बोको हराम संघटनेने ८,३८६ लोकांची हत्या केली, ज्यात मुलं, वृद्ध आणि तरुणांनाच सुद्धा समावेश आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.