तालीबानच्या संस्थापकाने पून्हा आपल्या निर्घृण शिक्षा कायद्यात आणायची घोषणा केलीय

काही महिन्यांपूर्वी तालिबानने एक – एक करत सगळ्या अफगाणिस्तानावर आपली सत्ता स्थापन केली. यानंतर जगभरातल्या सगळ्याचं माध्यमात तालीबान, त्यांच्या अधिपत्याखालचं आधीचं अफगाणिस्तानात, नियम, कायदे, महिलांसोबतची वागणूक, त्यांची शिक्षा, लिंग भेदभाव मग तो शिक्षणात असो, व्यवसायात असो किंवा वागणूकी संदर्भात असो या संबंधित व्हिडिओ, लेख, बातम्या व्हायरल व्हायला लागल्या.

अशातचं आता तालीबान सरकार आपल्या शिक्षेसंदर्भात नवीन आखणी करतयं. कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा देण्यात यावी. याबाबत मुल्ला- मौलवींशी चर्चा करतयं. या दरम्यान तालीबानच्या गेल्या सरकार मधल्या एका मंत्र्यांनं शिक्षेसंर्दभात एक विचित्र सल्ला दिलाय. 

तालिबानचे संस्थापक मुल्ला नुरुद्दीन तराबीने अफगाणिस्तानात त्यांची संघटना सत्तेवर आल्यानंतर चोरांसाठी अंग – भंगच्या  शिक्षेची पुन्हा एकदा अंमलबजावणी करणार असल्याची धमकी दिलीये.

एक-डोळा आणि एक पाय असणाऱ्या तालिबानच्या संस्थापकानं म्हंटलं की, चोरांचे हात कापण्याची शिक्षा पुन्हा एकदा आणली जाईल, परंतु अशी कारवाई यापुढे सार्वजनिकपणे केली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर तालिबान्यांनी केलेल्या कत्तलीचाही त्याने बचाव केला.

खरं तर, तालिबान बऱ्याचदा महिलांना चाबूक मारण्यापासून कथित गुन्हेगारांवर दगडफेक करण्यापर्यंतचे प्रकार खुलेआम करत असतात. फाशीची शिक्षाही लोकांसमोर दिली जाते.

मुल्ला नुरुद्दीन तराबीने तालिबानच्या कारवायांमध्ये हस्तक्षेप केल्यावर  जगाला भयंकर परिणामांची धमकी देखील दिली. शेवटच्या वेळी जेव्हा  तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली तेव्हा नुरुद्दीन या सरकारचा प्रमुख होता.

तो म्हणाला,

“स्टेडियममध्ये शिक्षा केल्याबद्दल प्रत्येकाने आमच्यावर टीका केली. पण, आम्ही जगातील या देशांच्या कायद्यांवर आणि शिक्षेवर भाष्य करत नाही. आमचे कायदे कसे असावेत हे कोणीही आम्हाला शिकवू नये. आम्ही इस्लामचे अनुसरण करू आणि कुराणानुसार आपले नियम आणि कायदे बनवू. काबुलमध्ये तालिबानचे राज्य झाल्यानंतर ९० च्या दशकात घडलेल्या क्रूरतेची पुन्हा पुनरावृत्ती होत आहे.

मागच्या वेळी अफगाणिस्तान जेव्हा तालिबानच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा मुल्ला नुरुद्दीन तराबी त्या सरकारमध्ये न्यायमंत्री होता. त्या वेळी काबूलमधील क्रीडा स्टेडियमपासून ईदगाह मैदानापर्यंत सामूहिक शिक्षा देण्यात यायची, यावरून संपूर्ण जगाने तालीबानी शिक्षेचा निषेध केला.

पीडितांच्या कुटुंबीयांना बंदुका देण्यात यायच्या, त्यानंतर संबंधित कुटूंबीय आरोपीच्या डोक्यात गोळी झाडून त्याला मारून टाकायचे. जे चोरी करताना पकडले गेले, त्यांचे हात कापले जायचे. ज्यांना डकैतीमध्ये दोषी ठरवण्यात आले त्यांचे दोन्ही हातपाय कापून त्यांना शिक्षा दिली जायची.

सुनावणीपासून शिक्षा सुनावण्यापर्यंत गोष्टी सार्वजनिक होत नव्हत्या, केवळ मुल्ला-मौलवी या गोष्टी ठरवायचे. फक्त शिक्षा लोकांमध्ये दिली जायची. ते म्हणाले की सुरक्षेसाठी हात कापणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानात चोर आणि दरोडेखोरांचे हात पाय कापून परेडही काढण्यात यायची.

आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानात तालीबान्यांनी सत्ता मिळवलीये. त्यांनी आपापली मंत्री पदही वाटून घेतलीत. त्यामुळे आता हे नवीन तालीबानी सरकार स्वत:चे नवीन नियम बनवतयं का? की मुल्ला नुरुद्दीन तराबी यांचं म्हणणं एेकतयं. हे पुढे समजेलचं.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.