द रेड साडी : अस काय होतं ज्यामुळे भारतात या पुस्तकाला विरोध झाला

‘द रेड साडी’ हे सोनिया गांधींच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक आहे. स्पॅनिश रायटर जेवियर मोरो याने हे पुस्तक लिहिलं आहे. २००८ मध्ये ‘El sari rojo’ शीर्षकाखाली या पुस्तकाचं प्रकाशन झाल होत.

फक्त भारत सोडून..

स्पेनमध्ये. नंतर या पुस्तकाचा अनुवाद इटालियन, फ्रेंच, डच आणि इंग्रजी भाषेतही झाला.

जेव्हा स्पेन आणि इटलीतल्या बुकस्टोअर्स मध्ये हे पुस्तक आलं, तेव्हा या पुस्तकाची दणदणीत विक्री सुरू झाली. पण भारतीय कॉंग्रेसला या पुस्तकाविषयी प्रॉब्लेम होता.

याबद्दल द इंडियन एक्सप्रेसमध्ये जून २०१० मध्ये एक स्टोरी छापून आली होती. ज्यात पुस्तकाचा रायटर जेवियर मोरोशी झालेल्या फोन कॉलचा उल्लेख आहे. जेवियरने त्याच्या संभाषणात असं सांगितलं होत कि,

वकील आणि कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पॅनिश आणि इटालियन प्रकाशकांना जेवियरची पुस्तक स्टोअरमधून काढून टाका असे मेल पाठवलेत. तसेच कॉंग्रेसने जेवियरवर तथ्यांशी छेडछाड आणि पुस्तकात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला.

त्यानंतर जेवियर मोरो म्हणाले की, त्यांचे पुस्तक सोनीयाचे चरित्र नाही, तर ती कादंबरी आहे. पण कादंबरीतही सत्य आणि कोणत्याही तथ्यांशी छेडछाड करण्यात आलेली नाही.

जून २०१० च्या पीटीआयच्या हवाल्यानुसार जेवियरला सिंघवी यांनी सोनिया गांधींच्या वतीने कायदेशीर नोटीस देखील पाठविली.त्या नोटिशीत असं म्हंटल गेलं की जेवियरने पैसे मिळविण्याच्या नादात गोपनीयतेचे उल्लंघन केले आहे. बरं, या विषयावर बराच गोंधळ उडाला होता. पण रायटर म्हणून जेवियर ही त्याच्या मुद्यावर ठाम होता.

अखेर २०१५ मध्ये हे पुस्तक भारतात प्रसिद्ध झालच.

असं काय दडलं होत त्या रेड साडीत,

इटलीमध्ये सोनिया गांधी यांच बालपण कस गेल. केंब्रिजमध्ये वयाच्या १९ व्या वर्षी राजीव गांधी यांच्याशी कशी भेट झाली. साधं जीवन जगण्याची इच्छा असलेल्या त्या मुलीने राजकारणात प्रवेश कसा केला. या सर्वाबद्दल पुस्तकात लिहिलय. पुस्तकाच नाव आहे ‘द रेड साडी’.

नेहरू तुरूंगात असताना त्यांनी लाल साडी विणली होती. सोनियाने तिच्या लग्नात ही लाल साडी नेसली होती. त्याच संदर्भाने हे नाव दिलंय. या पुस्तकाला ‘ए ड्रामेटाइज़्ड बायोग्राफी ऑफ सोनिया गांधी’ असही म्हणतात.

पुस्तक वाचताना पहिली काही पान वाचल्यावरच लक्षात येत कि,

कॉंग्रेस या पुस्तकावर बंदी घालण्यावर का अडून बसलं होत. आजवर कॉंग्रेसने सोनियाचे वैयक्तिक जीवन आणि तिचा इतिहास जनतेपासून जाणीवपूर्वक लपवला होता. त्याऐवजी ती एका सुंदर कुटुंबातील स्त्री म्हणून तिची प्रतिमा भारतीय जनतेसमोर आणली आणि हेच पुस्तकात मात्र वेगळं दिलय.

या पुस्तकात सध्याच्या परिस्थितीतील अनेक रहस्यमय प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. जस की परदेशी एनजीओंवर कारवाईबाबत मध्यंतरी बर्‍याचशा बातम्या आल्या होत्या, त्यापैकी बहुतेक ख्रिश्चन मिशनरी होत्या. ज्या मिशनऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत लाखो लोकांचे सक्रियपणे धर्मांतर केले.

सत्तेत बसलेल्या नेत्यांकडून पाठिंबा व प्रोत्साहन मिळाल्याशिवाय हजारो मिशनरी असं कस करू शकतील? त्याचे एक कारण अस असू शकते की, सत्तेत असताना सोनिया गांधींनी मिशनरी आणि त्यांच्या कार्यांसाठी नेहमीच सकारात्मक विचार केला असेल. पुस्तकाच्या सुरुवातीच्या चॅप्टर मध्ये सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या बालपणात याच मूळ शोधता येऊ शकत.

पुस्तकात दिल्याप्रमाणे,

“तिला विशेषतः मिशनऱ्यांच्या कथा आवडायच्या. मिशनऱ्यांनी दूरवरच्या देशातील गरिबांना आपले सर्व काही दिले. एक धर्मप्रसारकाची जीवनशैली, तिला खऱ्या अर्थाने परिपूर्ण वाटत होते कारण आपल्याला आपले आयुष्य इतरांसाठी द्यावे लागते आणि ते साहसपूर्ण असते असे तिला वाटायचे.

तिच्या शाळेतील नन्सनी त्यांना असे चित्रपट दाखवले ज्यात असीसीच्या संत फ्रान्सिसचे आयुष्य आणि ख्रिस्ती धर्माच्या पुराणकथा होत्या. तिच्यावर ख्रिस्ती धर्माचा आणि मिशनऱ्यांचा प्रभाव होता.”

या पुस्तकातून केवळ सोनियाच्या जीवनाबद्दलच समजत अस नाही, तर वाचकांना गांधी कुटुंबाच्या दृष्टीकोनातून १९७०, ८० आणि ९० च्या दशकात प्रचलित राजकीय परिस्थिती समजण्यास मदत होते. या पुस्तकात वर्णन केलेले बहुतेक राजकीय किस्से सर्वप्रचलित आहेत. पण इंदिरा, फिरोज, संजय, सोनिया आणि राजीव यांच्या वैयक्तिक जीवनातील काही बाबींमुळे हे पुस्तक काही प्रमाणात सनसनाटी ठरत.

जस की,

“फिरोज हा जहांगीर गांधी (ghandy) नावाच्या पारशी व्यक्तीचा मुलगा होता. त्याच्या अधिकृत चरित्रावरून तो नौदल अभियंता असल्याचे समजते. परंतु इतर स्त्रोत असे सांगतात की, तो दारूचा व्यवसाय करत होता. १९३० च्या शेवटी त्याने आपल्या नावाचे स्पेलिंग बदलून गांधी (Gandhi) असे केले.

गांधी हे गुजराती हिंदूंच्या बनिया जातींमध्ये एक सामान्य आडनाव आहे. त्याच जातीतून महात्मा गांधी आले होते. त्या छोट्या बदलाचे कारण माहित नाही, पण या आडनावामुळे त्याच्या पत्नीच्या भावी राजकीय कारकिर्दीला अतुलनीय महत्त्व प्राप्त झाले.”

रायटर जेवियरने काही प्रसंगात गांधी घराण्याबद्दल सहानुभूती दाखवली असली तरी इंदिरा गांधी (ज्यांना ज्योतिषात विश्वास होता) आणि जवाहरलाल नेहरू (वैज्ञानिक स्वभावाला प्रोत्साहन देणारे) यांच्यातील फरक स्पष्ट करणारे प्रसंग सांगितले आहेत.

या पुस्तकातील आणखी एक चकित करणारा खुलासा म्हणजे,

लोकांच्या समजुतीनुसार राजीवच्या मृत्यूनंतर सोनियाने स्वत:ला राजकारणापासून अलिप्त केले पाहिजे होते. पण तसे झाले नाही. उलट ती राजकारणामध्ये पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय भूमिका घेऊ लागली. याच काळात त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या विश्वासू साथीदाराला जवळ केले.

पुस्तकात सांगितल्याप्रमाणे,

” ती सध्याच्या घडामोडींशी संबंधित संसदेत काही छोटी छोटी भाषणे करण्याचा प्रयत्न करते आहे. तिने आर्थिक विषयांवर भाष्य करणे टाळले आहे.

राजीवच्या हत्येनंतर पहिले सरकार स्थापन झाले तेव्हा तिला भेटलेल्या एका व्यक्तीवर ती पूर्णपणे विश्वास ठेवते. त्यांचं नाव मनमोहन सिंग असून ते सिख आहेत.

माजी केम्ब्रिज विद्यार्थी, एक तल्लख अर्थशास्त्रज्ञ, नव्वदच्या दशकात देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात यशस्वी झालेल्या सुधारणांचा शिल्पकार, प्रामाणिकपणासाठी ओळखले जाणारे असे.

तिच्यावर त्याचा इतका प्रभाव आहे की, कॉंग्रेस पक्षातील जुने समाजवादी आणि डावे लोक तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात.”

या पुस्तकाचा शेवट २००४ मध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या विजयाने होतो. पण सोनियाने पंतप्रधानपद स्वतःकडे का घेतले नाही याचा खुलासा करण्याचे लेखकाने टाळले. तर दुसरीकडे, या पुस्तकात असे अनेक संकेत आहेत जे बोट दाखवतात राहुल आणि प्रियंकाकडे. या दोघांनीच राजकारणातील सुरक्षेचा विचार करून भूमिका बजावली होती. नटवरसिंग यांनी लिहिलेल्या वन लाइफ इज़ नॉट इनफ या वादग्रस्त पुस्तकातही याच गोष्टीचा उल्लेख आढळतो.

नटवरसिंग म्हणतात,

‘२००४ मध्ये पक्षाला विजय मिळाल्यानंतरही सोनिया गांधी यांनी आपला मुलगा राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून पंतप्रधानपद न घेण्याचा निर्णय घेतला होता. कारण राहुलला भीती होती की वडील राजीव गांधी, आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच सोनियाची ही हत्या केली जाईल.

याशिवाय नटवरसिंग यांनी आपल्या पुस्तकात सोनिया यांना हुकूमशाही, आक्षेपार्ह, गुप्त आणि संशयास्पद स्त्री म्हंटले आहे.”

एकूणच हे पुस्तक अनेक रहस्यांनी भरले आहे. सोनिया, राजीव आणि इंदिरा यांच्या जीवनात डोकावून पाहणार, भरपूर साऱ्या किस्स्यांनी भरलेल अस पुस्तक आहे. काही रहस्यमय प्रश्नांची उत्तरे इथं मिळत नाहीत पण प्रचलित राजकीय परिस्थितीबद्दल वाचकांना समृद्ध करते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.