गाण्यांना सबटायटल्स देऊन साक्षरता वाढवता येते ही कल्पना एका मराठी प्राध्यापकाची होती

आपल्या देशात साक्षरता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यात फ्री एज्युकेशन, ज्यांना कामामुळे शाळेत जायला जमतं नाही त्यांच्यासाठी रात्रीची शाळा, मोठ्या व्यक्तींसाठी प्रौढ शिक्षण अशा योजना आणल्या. त्याचा काही प्रमाणात फायदा पण झाला. यासाठी सरकारकला कोटी रुपये खर्च करावे लागले होते.  

यातच आयआयएम अहमदाबाद येथील एका प्राध्यापकाने साक्षरता वाढीसाठी गाण्याच्या व्हिडीओखाली सबटायटाईल्स देण्यात यावे अशी साधी आणि सोपी संकल्पना मांडली होती. लोकांनी ही गोष्ट हसण्यावारी घेतली होती. मात्र, त्यांच्या या संकल्पनेमुळे भारतात साक्षरतेचे प्रमाण वाढले आणि याची दखल वर्ल्ड बँकेला सुद्धा घ्यावी लागली होती.  

तर या प्राध्यापकाचे नाव आहे ब्रिज कोठारी. 

कोठारी हे मूळचे नांदेडचे. त्यांचा जन्म ९ जून १९६४ रोजी झाला. त्यांचे वडील हे उद्योजक होते. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते आग्रही होते. त्यामुळे ब्रिज यांना शालेय शिक्षणासाठी पॉण्डेचेरी येथील अरबिंदो इंटरनॅशल एज्येकेशन सेंटर येथे पाठविण्यात आले.  

ब्रिज यांचे पुढचे शिक्षण आयआयटी कानपुर येथून घेतले आणि पीएच डी करण्यासाठी अमेरिकेतील कार्नेलो युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतले. त्यानंतर कोठारी यांना अशोका फेलोशिप, स्टॅन्डफोर्ड युनिव्हर्सिटीची त्यांनी रॉयटर्स डिजिटल व्हिजन प्रोग्रॅम सारखे अभ्यासक्रम पूर्ण केले.

कार्नेलो युनिव्हर्सिटीत असतांना ते स्पॅनिश भाषा सुधारण्यासाठी मित्रांसोबत स्पॅनिश पिक्चर पाहू लागले होते. ते पिक्चरचे सबटायटल्स इंग्लिश मध्ये देण्यात येत होते. मात्र, त्यांच्या डोक्यात आले की, याच पिक्चरचे सबटायटल्स इंग्लिश ऐवजी स्पॅनिश मध्ये दिले तर ही भाषा लवकर शिकता येईल असे त्यांच्या लक्षात आले होते. 

हाच फार्मुला आपण वापरून बॉलिवूड गाण्यांना हिंदी सबटायटल्स दिल्यास भारतात साक्षरता वाढेल असं त्यांना वाटू लागले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोठारी भारतात आले. आणि १९९६ मध्ये त्यांनी आयआयएम अहमदाबाद ला प्राध्यापक म्हणून जॉईन झाले. अहमदाबाला ते एमबीएच्या विद्यार्थांना कम्यूनिकेशन विषय शिकवू लागले.

भारतात टिव्ही पाहणाऱ्यांची संख्या काही कोटींमध्ये आहे. उलट ९० च्या दशकात मनोरंजनाचे माध्यम हे केवळ टिव्ही आणि रेडिओ होते. याचा उपयोग घेऊन खूप मोठ्या वर्गाला साक्षर करता येईल अशी त्यांची संकल्पना होती.  

Same Language Subtitling (SLS) म्हणजेच ज्या भाषेत व्हिडीओ आहे त्याच भाषेत सबटायटल्स देण्याची ही संकल्पना होती.

इतर वेळी मराठी भाषेत जेव्हा गाणे टिव्ही स्क्रीनवर दाखवलं जाईल त्यावेळी सबटायटल्स मध्ये शब्द ना शब्द खाली दिला जावा.

जो शब्द कलाकार म्हणत असतो त्या शब्दाचा कलर बदलण्यात यावा. त्यामुळे बघणाऱ्याचे लक्ष हे त्या सबटायटल्स कडे जाईल. यामुळे टिव्ही पाहणाऱ्या व्यक्तीला शब्दाची ओळख होऊ लागते. अशी ही संकल्पना होती. साक्षरता वाढीसाठी हा चांगला उपाय आहे असे कोठारी यांच्या लक्षात आले. 

यातून एकाचवेळी लाखो लोकांना आपण साक्षर करू शकतो असे कोठारी यांनी ओळखले. 

१९९७ ते ९९ सलग दोन वर्ष कोठारी आपली ही संकल्पना घेऊन अहमदाबाद येथील गुजराती दूरदर्शन केंद्रात जाऊ होते. त्यावेळी गुजरात मध्ये दर रविवारी चित्रहार नावाचा गुजराती गाण्यांचा कार्यक्रम होत असे. सर्वाधिक प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत असल्याने कोठारी यांनी गाण्यांना सबटायटल्स द्यावे अशी मागणी केली होती. मात्र त्यांना सतत दोन वर्ष नकार देण्यात आला. 

१९९९ ला शेवटी गुजरात दूरदर्शन केंद्राच्या संचालकांनी गाण्यांना सबटायटल्स देण्याचे मान्य केलं. 

गुजरात मध्ये २००२ केलेल्या मध्ये एका रिसर्च नुसार असे लक्षात आले की, चित्रहार या गाण्याच्या कार्यक्रमाला सबटायटल्स दिल्याने प्रौढांच्या साक्षरतेत प्रमाण वाढले होते. लोकांना गीत माहित होते पण शब्द हे सबटायटल्स मुळे कळाले होते. 

याच वेळी २००२ मध्ये दूरदर्शनला नवीन डायरेक्टर जनरल एस. वाय, कुरेशी आले होते. त्यांना ब्रिज कोठारी यांची सबटायटल्सची संकल्पना आवडली. दूरदर्शन मधील देशभरातील अधिकाऱ्यांना मात्र ही संकल्पना आवडली नव्हती. त्यांचे म्हणणे होते की, ज्या भाषेत व्हिडीओ आहे त्याच भाषेत का सबटायटल्स द्यायचे असा प्रश्न उपस्थित करत होते. 

मात्र, या सगळ्यांचा विरोध झुगारून कुरेशी दूरदर्शनवरील सगळ्या महत्वाच्या आणि प्रसिद्ध कार्यक्रमांना सबटायटल्स द्यायला सुरुवात केली. त्यात हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली भाषेचा समावेश होता. 

२००२ ते २००७ दरम्यान दूरदर्शनच्या कार्यक्रमाला सबटायटल्स दिल्याने काय फायदा झाला यासाठी एका संस्थेकडून अहवाल मागविण्यात आला होता. या ५ वर्षात देशातील १५ लोटी लोकांनी दर रविवारी रांगोळी आणि चित्रहार हा गाण्यांचा कार्यक्रम पाहिला होता. त्या अहवालात असे दिसून आले की, पाचव्या वर्गातील २५ टक्के मुलं साध हेडलाईन वाचू शकत नव्हते. 

गाण्यांना सबटायटल्स दिल्यानंतर ५६ टक्के मुलांना चांगलं वाचायला येऊ लागलं होत. प्रौढ व्यक्ती मध्ये साक्षरतेत बदल दिसू लागले होते. 

ब्रिज कोठारी यांच्या कार्याची दखल वर्ल्ड बँकेने सुद्धा घेतली त्यांना अडीच लाख डॉलरचे पारितोषिक दिले. नवीन प्रयोग केला आणि त्यामुळे ग्रामीण आणि मागास भागातील साक्षरता वाढली म्हणून हे पारितोषिक देण्यात आले होते. कोठारी यांनी यातील एकही रुपया आपल्याकडे न ठेवता सगळे पैसे इतर चॅनेलवर कशा प्रकारे सबटायटल्स देता देतील यासाठी खर्च केले.  

२००४ मध्ये ब्रिज कोठारी यांनी भारतातील साक्षरता वाढीसाठी प्लँनेट रीड नावाची संस्था सुरु केली आहे. 

ब्रिज कोठारी यांना २००९ मध्ये Same Language Subtitling साठी बिल क्लिंटन यांच्या क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह पुरस्कार देण्यात आला. तसेच गुगल फाऊंडेशन, सर रतन टाटा ट्रस्ट, भारत सरकार, महिंद्रा कंपनी, इंडियन पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर सारख्या संस्थांनी ब्रिज कोठारी यांच्या कामाची दखल घेतली आहे.  

एवढ्या मोठ्या संस्थांनी मदत केल्याने १० वर्ष टिव्हीवरील साप्ताहिक कार्यक्रमांना सबटायटल्स देऊ शकलो असे ब्रिज कोठारी सांगतात. यामुळे दर आठवड्याला भारतातील २० कोटी लोकांनी ३० मिनिटे सबटायटाईल्सचा वाचायचे. त्यामुळे साक्षरतेत भर पडली.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.