पासवान काका पुतण्यांच्या भांडणात आता एका महिलेच्या आरोपामुळे नवीन ट्विस्ट आलंय.

 

पहिल्यांदा लोक जनशक्ती पार्टीचा सत्ते वरून वाद असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र गुरुवारी या कहाणीत नवीन ट्विस्ट आला आहे. लोक जनशक्ती पार्टी फुटण्यामागे एक महिला असल्याचे समोर आले आहे.

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी दोन गटात विभागली गेली आहे. एक गट त्यांचा मुलगा चिराग पासवान आणि दुसरा गट त्यांचा भाऊ पशुपती कुमार पारस यांचा आहे. हे दोन्ही गट आपणच खरी लोक जनशक्ती पार्टी असल्याचा दावा करत आहे.

सध्या तरी पारस गट तगडा आहे. निवडणूक आलेल्यांपैकी ५ जण पारस गटात आहे. चिराग पासवान यांच्या गटात ते केवळ एकटेच आहेत.

त्यानंतर चिराग पासवान यांनी आपल्या चुलत भावावर एक आरोप केला आहे. लोक जनशक्ती पार्टी फुटण्यामागे हेच खर कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

रामविलास पासवान यांचे निधनानंतर प्रिन्स राज रामविलास पासवान समस्तीपुर मतदार संघातून निवडून आला आहे. प्रिन्स राज हा रामविलास पासवान यांचे लहान भाऊ रामचंद्र पासवान यांचा मुलगा आहे. प्रिन्स राज पण पारस यांच्या गटात सामील झाला आहे.

चार महिन्यापूर्वी प्रिन्स राज पासवान याने एका महिलेबरोबर दोघांविरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर आता त्या महिलेने सुद्धा प्रिन्स राज पासवान विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचा तपास बिहार पोलीस करत आहेत.

प्रिन्स राज हा चिराग पासवान विरोधातील गटात सामील झाला आहे. आत चिराग पासवान एक पत्र समोर आणले आहे. २९ मार्च रोजी चिराग पासवणे हे पत्र काका पशुपती कुमार पारस यांना लिहिले होते. पारस हे हाजीपुर मतदारसंघातून निवडून आले आहेत.

या पत्रात चिराग पासवान यांनी प्रिन्स राज वर एका महिलेने ब्लॅकमेल करून बलात्काराचा आरोप केला असल्याचे सांगितले होते. मात्र याकडे पारस यांनी दुर्लक्ष केले. मात्र त्याच वेळी प्रिन्सला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला होता.

याबाबत चिराग पासवान यांनी माध्यमांशी बोलतांना सांगीतले की, ८ जानेवारीला याबाबत पहिल्यांदा कळाले होते. पिडीत महिलेने लिहिलेले पत्र माझ्याकडे देण्यात आले होते. यात पिडीत महिलेने तिच्या सोबत घडलेल्या गोष्टी लिहिल्या होत्या. या महिलेने प्रिन्स राज वर बलात्काराचा आरोप केला होता. ही गोष्ट प्रिन्स राज सांगितल्या नंतर त्याने आपल्या सोबत काय घडले याची आपबिती सांगितली.

दोघांनी एकमेकावर आरोप केले होते. त्यावेळी दोघानांही पोलिसात जाण्याचा सल्ला दिला होता अशी माहिती चिराग पासवान यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, १० फेब्रुवारीला प्रिन्स राज याने दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात एक महिला आणि तिच्या साथीदारा विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. आता पर्यंत यात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

प्रिन्स राज यांनी तक्रारीत लिहिले होते की, महिलेने आपण  लोक जनशक्ती पार्टीची कार्यकर्ती असल्याचे सांगितले होते. त्यानंतर एकमेकांचा मोबाईल नंबर शेअर करण्यात आला. थोड्या दिवसानंतर बोलणे सुरु झाले आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

१८ जून २०२० ला त्या महिलेने गाजियाबाद येथील तिच्या घरी बोलाविले. तिथे दोघांमध्ये शाररिक संबंध प्रस्तापित झाले. आणि त्यानंतर अनेकवेळा तिच्या घरी येणे जाने होत होते.

मात्र पुढील काही दिवसात समजले की, ही महिल्या एका दुसऱ्या पुरुषा सोबत लिव्ह इन मध्ये असल्याचे समजले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्या पासून तिच्या पासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. आणि तिचे फोन उचलणे बंद केले. त्यानंतर त्या महिलेने तिच्या सहकाऱ्याच्या नंबर वरून फोन करून आपल्या जवळ तुमचा आपतीजनक एक व्हिडीओ असून तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. एक कोटी  दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रिन्स याने आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच त्या महिलेला २ लाख रुपये दिले असून

महिलेने केलेल्या आरोपावरून लोक जनशक्ती पार्टी फुट पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. चिराग पासवान यांनी हा मुद्दा पक्षांतर्गत लावून धरला होता.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.