कोव्हीड १९ चा BF.7 व्हेरियंट धोकादायक आहे का ? भारतात सापडलेले ४ रुग्ण कसे बरे झाले

पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मागच्या काही महिन्यात कोरोना कमी झाली असे बोललं जात आहे. मात्र चीन मध्ये झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहे. अनेकांना तर हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

चीन मध्ये कोरोनाचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे.

त्याच कारण म्हणाले कोरोनाचा नवा व्हेरियंट BF.7 हा ओमायक्रोनच्या सब व्हेरियंट आहे.  व्हेरियंटचे भारतामध्ये गुजरातमध्ये २ आणि ओडिशात २ असे ४ पेशंट्स असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यातील एकही पेशंट ऍक्टिव्ह नसल्याचे समोर आले आहे. काही माध्यमांनी या सब व्हेरियंटला तर चायना व्हेरियंट सुद्धा म्हटलं आहे.

BF.7 व्हेरियंट हा भारतात पहिल्यांदा जुलै महिन्यात सापडला होता. तर सप्टेंबर महिण्यात ओडिसा या राज्यात BF.7 व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून तो अमेरिका परत गेला आहे. महत्वाचं म्हणजे यानंतर ओडिसा मध्ये एक सुद्धा रुग्णामध्ये जा व्हेरियंट आढळून आला नाही. साधारण तीन महिने झाले आहेत.

ओडिसा नंतर गुजरात मधील दोघांना कोरोना झाला होता आणि BF.7 व्हेरियंटची लागण झाली होती. हे दोन्ही रुग्णांना हॉस्पिटल मध्ये जाण्याची सुद्धा गरज पडली नव्हती. घरीच उपचार घेऊन हे रुग्ण बरे झाले होते.

महत्वाचे म्हणजे BF.7 व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्यानंतर या दोन्ही राज्यातील पेशंटांची संख्या वाढली नाही. त्याचबरोबर त्या चारही रुग्णाला साधं हॉस्पिटलची गरज पडली नाही. मात्र काही वैद्यकीय तज्ञ् सांगत आहेत की, चीन सारखी परिस्थिती इतर देशांमध्ये सुद्धा होऊ शकते. 

 BF.७ या व्हेरियंटमुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते.

ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा आणि अतिसार ही व्हेरियंटच्या रुग्णाची लक्षणे आहेत. त्याशिवाय कोरोनाच्या इतर व्हेरियंटप्रमाणे लक्षणं असू शकतात. BF ७ हा व्हेरियंट १० ते १८ पट वेगानं पसरतोय. म्हणजेच या विषाणूनं बाधित झालेला रुग्ण १० ते १८ लोकांना बाधित करू शकतो. अगोदर झालेल्या लोकांना हा लवकर बाधित करू शकतो.

जरी लस घेतली असली तरीही BF ७ हा व्हेरियंटची लागण होण्याची जास्त शक्यता आहे. मात्र लस घेतल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण घटले आहे. हा विषाणू भारतात आढळला होता. पण आता चीन मध्ये याच व्हेरियंटने धुमाकूळ घातल्यामुळे आत्ता याला सिरियसली घेतलं जातं आहे.

सध्या देशात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २० डिसेंबर पर्यंतची आकडेवारी पाहिल्यास, २० डिसेंबर रोजी देशभरात कोरोनाच्या १ लाख १५ हजार ७३४ कोविड टेस्ट करण्यात आल्या होत्या.

तर देशभरातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ४०८ इतकी आहे. तर महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे १३२ सक्रीय रुग्ण आहेत. सुरुवातीपासून ते आजपर्यंत आतापर्यंत देशात कोरोनाचे ४ कोटी ४६ लाख ७६ हजार ३३० रुग्ण आढळलेले आहेत. यापैकी ४ कोटी ४१ लाख ४२ हजार २४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर महाराष्ट्रात एकूण ८१ लाख ३६ हजार ३८६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ७९ लाख ८७ हजार ८२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ३० हजार ६८० जणांचा मृत्यू झाला आहे तर महाराष्ट्रात आजपर्यंत १ लाख ४८ हजार ४१२ जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण आकडेवारीनुसार, संपूर्ण भारतातील पेशंट्सचा रिकव्हरी रेट ९८.८० टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण १,१९ टक्के आहे. हि सगळी आकडेवारी पाहता देशात आणि राज्यातही कोरोना प्रसाराचा वेग बराच कमी आहे.

चीनमधील वाढत्या संसर्गामुळे भारतही सज्ज असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात यावं, रुग्णांची आेळख, तपास, लसीकरण करण्यात यावं अशा सूचना सर्वच राज्यांना दिल्या गेल्यात. जीनोम सिक्वेन्सिंग हे तंत्र आहे ज्याद्वारे कोविडचा प्रकार शोधला जातो.

केंद्र सरकारने नागरिकांना कोविड परिस्थितीत एप्रोप्रिएट बिहेवियरचा सल्ला दिलाय, एप्रोप्रिएट बिहेविअर’ म्हणजे काय? तर तेच जे आपण आधीपासून पळत आलोय, म्हणजेच तुम्ही एखाद्याला भेटतांना हस्तांदोलन टाळा, मिठी टाळा, शारीरिक अंतर राखा थोडक्यात सोशल डिस्टन्सिंग पाळा.

गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका गेलात तर डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला हात लावणे टाळा. हँड सॅनिटायझर वापर हात सतत धुवत राहा. उघड्यावर थुंकणे टाळा. अत्यंत आवश्यक असेल तरच प्रवास करा. आणि सर्वात महत्वाचं सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट टाकू नका, ज्यामुळे नकारात्मक माहिती किंवा भीती पसरण्याचा धोका असेल.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.