गावाने दारूबंदी व्हावी म्हणून बोकडपार्टीचा निर्णय घेतला अन् मोदींच टेन्शन वाढवलं.

दारूबंदी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. हक्काचा उपाय म्हणजे गाढवावरून धिंड काढणे. पण दारूच्या नशेत असणारे स्वत: हारकून गाढवावर बसायला तयार असतात. झिंगलेल्या अवस्थेत सापासारखं वाकडं वाकडं चालून घरी जाण्यापेक्षा संपुर्ण गाव वाजतगाजत गाढवावर बसवून घरी सोडत असल्यावर कुठल्या दारूड्याला नको वाटेल. थोडक्यात दारूबंदीवरचा हा उपाय सपशेल फेल गेल्यामुळे गंडल्यात जमा झाला. 

त्यानंतर दंड करणे वगैरे पद्धती निघाल्या पण त्या नावापुरत्या. बाटली आडवी करण्याच्या नादात कित्येक गावात भांडण झाली ती गोष्ट देखील वेगळीच. पण या सर्व भानगडीत अस एक गाव सापडलं जिथे दारूबंदीवर अनोखा उपाय शोधण्यात आला आहे. 

बर हे गाव कुठं आहे हे माहिती झाल्यानंतर तुमच्या डोक्यातल्या आहेत त्या फ्यूजा उडतील. 

हे गाव आहे गुजरातमध्ये. तेच आपलं बच्चनवालं म्हारों गुजरात. गुजरातमध्ये दारू बंदी आहे. टोटल राज्यात कागदपत्री कुठही दारू मिळत नाही. का तर म. गांधीची ही जन्मभूमी. अहिंसेच तत्व इथे जन्माला आलं. म. गांधी आयुष्यभर दारूबंदीसाठी झटले. त्यांच्याच राज्यात दारू विकून कसं चालेल म्हणून इथे दारूबंदी करण्यात आली. पण ती फक्त नावापुरतं. जस अहिंसेच्या तत्वांच झालं तसच इथे दारूबंदीच्या निर्णयाचा देखील बाजार उठलेला दिसतो. 

बनासकंठा हा गुजरातमधला एक भाग आहे. तिथे खटीसिटारा नावाच गाव आहे. तिथल्या गावकऱ्यांनी हा नियम लागू केलाय. या गावात दारू पिवून आढळल्यास २००० रुपये दंड + गावाला बोकडाची पार्टी, दारू पिवून उच्छाद घातल्यास ५००० रुपये दंड + गावाला बोकडाची पार्टी असा नियम आहे. बर दारूबंदी असणाऱ्या राज्यातल्या गावाने असा नियम काढल्यावर चर्चा तर होणारच. 

तर या नियमाला मोठ्ठा पाठिंबा पण मिळत आहे. पण झालंय अस की,

प्रशासनाला कळणा की या गावाच कौतुक करायचं की दुर्लक्ष करायचं.

कारण कौतुक केलं तर आपल्या राज्यात दारू मिळते हे एका अर्था मान्य केल्यासारखंच जमा आहे. त्यामुळे ज्या गुजरात राज्याचा विकास सांगून मोदी देश चालवत आहेत त्यांना टार्गेट करायला विरोधकांना हे छोटसं कारण देखील कारणीभूत ठरू शकतं. दूर्लक्ष करायचं झालं तर बिचाऱ्या गावकऱ्यांनी इतक्या कष्टानं दारू बंद करायचा घेतलेला निर्णय चुलीत घातल्यासारखं होणार आहे. सध्यातरी ही बातमी टाईम्स ऑफ इंडियात छापून येवून निवांत राहिली आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.