पंतप्रधान मदत निधी आणि पीएम केअर्स : दिसतात तर सेम पण फरक काय?

पंतप्रधान मोदींनी ट्विटर वरून कोरोनाच्या संकट समयी पीएम केअर्स फंडाला मदत करण्याचे आवाहन केले आणि लागलीच त्याचा उहापोह सुरु झाला.

अंबानींपासून अक्षयकुमार, निक जोनास प्रियांका चोप्रा, विरुष्कापर्यंत सगळ्यांनी या फंडाला भरभरून मदत केली तर रामचंद्र गुहा आणि शशी थरूर यासारख्या विद्वानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष असताना पीएम केअर्स फंड नावाने फंड काढण्याची गरजच काय अशी टीका केली.

आमच्या पंतप्रधानांनी काहीही केलं तर लोकांना त्यात काळबेरंच दिसत त्यात कुणी काय करावं. असो….

हे सगळं ठीक आहे पण आमचं घोडं मात्र पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष, पीएम केअर्स फंड म्हणजे नक्की काय इथंच अडलं.

मग विचार केला दिवसभर घरात लोळून कंटाळलेल्या आपल्यासारख्या भिडूंना उगा कशाला डोकं खाजवायला लावावं आणि म्हंटल आपणच सांगावं.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष ( Prime Minister’s National Relief Fund- PMNRF) :

PMNRF हि एक ट्रस्ट आहे जी स्वातंत्र्यानंतर १९४८ साली स्थापन केली गेली. हा निधी पूर,वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आप्पत्ती पासून ते मोठी दुर्घटना, दंगे यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ताबतोब मदत म्हणून वापरली जाते. तसेच या निधीतील पैसे मोठ्या वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरता येऊ शकतो.

हा निधी आपल्यासारख्या लोकांच्या देणग्यांतूनच उभा आहे याला सरकारच्या बजेट मध्ये कोणतीही तरतूद असत नाही. या फंडाचे मॅनेजमेंट पंतप्रधानांच्या सह सचिवाकडे असते. या फंडाला दिलेले डोनेशन इनकमटॅक्स मध्ये वजावटीस पात्र असते तसेच कंपन्यांही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)म्हणून हा निधी देऊ शकतात. PMNRF चे दरवर्षी ऑडिट होत असते. जर कुणाला PMNRF ला ऑनलाईन मदत करायची असेल तर

pmnrf@centralbank या भीम /यूपीआय आयडी वर मदत करू शकता. अधिक माहिती हवी असल्यास आपण pmnrf.gov.in या साईट वरून घेऊ शकता.

पीएम केअर्स फंड (Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च ला ट्विटर वरून पीएम केअर्स फंड निर्माण केल्याची माहिती दिली. हि सुद्धा एक सामाजिक संस्था (ट्रस्ट ) आहे. या फंडचे चेअरमन हे पंतप्रधान आहेत व संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री हे सदस्य आहेत.

या फंडचा मुख्य उद्देश हा COVID-१९ सारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी वापरला जाईल. तसेच कंपन्यां पीएम केअर्सला दिलेल्या निधीचा समावेश कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत करू शकतात.

या फंडमध्ये अगदी मायक्रो डोनेशन सुद्धा करता येते.

सध्यातरी हि एवढीच माहिती पीएम केअर्स फंड याबद्दल उपलब्ध आहे. जर कुणाला पीएम केअर्स फंडाला ऑनलाईन मदत करायची तर

pmcares@sbi या यूपीआय आयडी वर मदत करू शकता. अधिक माहितीसाठी आपण press information bureau च २८ मार्चच प्रेस रिलीज वाचू शकता.

आता या pmcare बद्दल काही विरोधक आक्षेप घेत आहेत, त्यांचं म्हणणं काय हे एकदा जाणून घेऊ.

सुरवात होते पीएम ‘केअर्स’ या नावापासून. विरोधकांच म्हणणं आहे की हे नावच असं बनवलंय ज्यातून वैयक्तिक पंतप्रधानांचा प्रचार होतोय. काही जण तर म्हणत आहेत पंतप्रधान रिलीफ फंड सुरु केला नेहरूंनी, त्याच महत्व कमी करण्या साठी मोदींनी पीएम ‘केअर्स’ सुरु केलं. आता ही टीका विरोधकांचा आकस म्हणता येईल.

पण त्यांचा दुसरा मुद्दा आहे की पीएम रिलीफ फ़ंड मध्ये तीन हजार आठशे कोटी रुपये शिल्लक पडले आहेत अशा वेळी पीएम केअर्स या नवीन फ़ंड ची स्थापना का केली ?

सरकारचे समर्थक म्हणतात की हा फ़ंड फक्त कोरोना व भविष्यात येणाऱ्या साथीच्या रोगासाठी खास निर्माण केला आहे आणि या फंडाच्या वापरासाठी संसदेची मान्यता घ्यायला लागणार नाही. पण हे तर मुद्दे पंतप्रधान निधीमध्येसुद्धा कव्हर होतात.

हे सोडून आणखी यात खास काय आहे ते सरकारने अजून तरी स्पष्ट केलेलं नाही.

असो तर भिडूनो ज्या कुणाला मदत करायची इच्छा आहे त्यांनी PMNRF केली काय किंवा पीएम केअर्स फंडला केली काय मदत महत्वाची आहे. मदत कोठेही करा फक्त खोट्या यूपीआय आयडी आणि मदत मागून फसवणाऱ्या संस्थांपासून सांभाळून राहा.

  • CS प्रतिभा टारे

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Sujit Kadam says

    PMNRF fund is allowed to use any national crisis by any government at any time.
    But PMcares fund has to be used within this 5 year span (by modi government only). It is not able to use this fund after this epidemic COVID-19.

Leave A Reply

Your email address will not be published.