भाजीपाला विकून शिकल्या, आईने मंगळसूत्र गहाण टाकून डॉक्टर बनवलं

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. या साथीच्या आजारामुळे सर्वजण त्रस्त आहेत. मात्र कोरोना विरूध्दच्या या लढ्यात आपले आरोग्य कर्मचारी खंबीरपणे लढा देतायेत. आपले कर्तव्य बजावताना अनेकजण या विषाणूच्या कचाट्यात सापडले, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र अद्यापही डॉक्टर, नर्स, आपला जीव धोक्यात घालून, आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा देत आहेत.

या दरम्यान अशीच एक प्रेरणादायी कथा आहे डॉ. विजयालक्ष्मी देशमाने यांची. ज्यांनी आपल्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिलेत. मागास जातीमध्ये जन्मल्यापासून ते झोपडपट्ट्यांमध्ये राहण्यापर्यंत; भाज्या विकण्यापासून ते डॉक्टर बनण्यापर्यंत सर्व गोष्टी छाप सोडणाऱ्या आहेत आणि आताही त्या नि: स्वार्थपणे समाजसेवा करतायेत

कर्नाटक संस्थेच्या कर्करोग सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अनेक पुरस्कारांच्या विजेत्या डॉ. विजयालक्ष्मी देशमाने.

भारतातील एक सर्वांत प्रतिभावान ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोग विशेषज्ञ) आहेत. शेकडो वर्षे अन्याय झालेल्या अन्यायामुळे मागास राहिलेल्या चर्मकार जातीतून येतात. त्यांचे वडील बाबुराव हे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक होते. त्याकाळात होत असलेल्या सामाजिक क्रांतीने ते  प्रभावित झाले होते. ते जरी स्वतः फारसे शिकलेले नसले तरी जाती-परंपराची प्रत्येक भिंत तोडून त्यांनी कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषा शिकल्या.

‘देशमाने’ आडनावामागची स्टोरी

एक भाऊ आणि 6 बहिणी नंतर त्यांचा जन्म झाला. हा दहा जणांचा गोतावळा त्यांच्या आत्यांनी दिलेल्या एका छोट्या घरात राहत होता. जे झोपडपट्टीत होते. एक वेळचं जेवण मिळणही मोठ्या मुश्किलीचं काम होतं, त्यामुळं बाकीच्या सुख – सुविधा तर स्वप्नांसारख्याच होत्या.

विजयालक्ष्मी यांनी एकेठिकाणी दिलेल्या मुलाखतीत सांगितात की,

आईवडिलानी आम्हा भावंडांच्या पालनपोषणासाठी खूप संघर्ष केला. जंगलातून लाकूड तोडून विक्री करण्याचे कामही त्यांनी केले. वडिलांनी काही काळ कुली म्हणून पणं काम केले. शेवटी त्यांना गिरणीत नोकरी मिळाली. ते लोकांमध्ये इतक्या लवकर मिसळत की लोक त्यांना देशमान्य म्हणू लागले. ज्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचे आडनाव देशमान्य ठेवले.

विजयालक्ष्मी यांचे नाव पंडित नेहरूंची बहीण तसेच भारताच्या पहिल्या यूएन जनरल असेंब्लीचे अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित यांच्या नावावर ठेवण्यात आले आणि देशमान्यची मुलगी असल्याने मला ‘देशमाने’ आडनाव मिळाले.

आईने मंगळसूत्र देऊन डॉक्टर बनवलं

विजयालक्ष्मी यांच्या ववडिलांचे एकच स्वप्न होते की, त्यांनी डॉक्टर व्हावं आणि गरीब व दुःखी लोकांची सेवा करावी. झोपडपट्टीत राहायला असून अशी स्वप्ने पाहणं ही एक अनोखी गोष्ट होती. मात्र, यावरून त्यांचे वडील किती आशावादी होते याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

विजयालक्ष्मी यांच्या आईने नंतर भाजीपाल्याचे एक छोटे दुकान उघडले. आईच्या मदतीसाठी विजयालक्ष्मी आणि त्यांचा भाऊ डोक्यावर या भाज्या आणत. विजयालक्ष्मी अभ्यासात खूप चांगल्या होत्या. मात्र, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना बारावीच्या पुढे शिक्षण घेता येणार नाही, हे त्यांना चांगलचं ठाऊक होतं. त्यात बाकीची भावंड पण होतीचं.

विजयालक्ष्मी यांनी आपल्या आयुष्यातला कधीही न विसरणारा किस्सा सांगताना म्हंटलं.

त्यांना के. एम. सी, हुबली इथं एमबीबीएस प्रवेश परीक्षा द्यायला जायचं होतं. त्या रात्री त्यांच्या आईने एकमेव दागिना म्हणजे मंगळसूत्र त्यांच्या वडिलांच्या हातात ठेवलं, जेणेकरुन ते विजयालक्ष्मी यांच्या अभ्यासासाठी कर्ज घेऊ शकतील.

आधी फेल मगं विद्यापीठात प्रथम क्रमांकावर

एमबीबीएस करण्यापूर्वी विजयालक्ष्मी यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण कन्नडमध्ये केलं होतं. त्यांना एमबीबीएसची लेक्चर तर समजायची पण इंग्रजी कच्ची असल्यामूळं त्या फर्स्ट इयरला फेल झाल्या. पण तिथल्या शिक्षकांच्या मदतीनं सेकंड इयरपर्यंत त्या इंग्रजी खूप चांगल्या पद्धतीने शिकल्या, ज्यानंतर त्यांनी माग वळूनचं पाहिलं नाही.

फायनलला त्या सगळ्या विद्यापीठात पहिल्या आल्या. त्यांच्या या यशाची बातमी समजताच घरात उत्सवाचे वातावरण होते. त्यानंतर त्यांनी एमएस केले. मग किदवई इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी येथे सीनियर रेसिडेंट डॉक्टर ऑफ़ सर्जिकल ऑन्कोलॉजी म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्या स्तनाच्या कर्करोगाच्या विशेषज्ञ बनल्या. या प्रवासात त्यांच्या सहकार्यांनी देखील त्यांना मदत केली.

विजयालक्ष्मींना त्यांचे काम फार आवडते. त्या नेहमीच त्यांच्या रूग्णांच्या संपर्कात असतात, जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल. त्या सांगतात की,

त्या कधीही ऑपरेशन करताना त्यांची सर्व भीती देवाला सुपूर्त करतात. त्यांच्यामते त्या केवळ निमित्त आहेत, त्यांचे गुरू, पालकांचे पालनपोषण आणि रूग्णांचे प्रेम त्यांना घडविण्यास जबाबदार आहे. त्या स्वतः ला फार लकी मानतात की, त्या अशा व्यवसायात काम करतात, ज्यामध्ये त्यांना लोकांचा जीव वाचवण्याचा बहुमान मिळाला.

2015 मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या,पण त्यांच्यामते काम अद्याप बाकी आहे, आणि माणसाने सतत शिकत राहिले पाहिजे. त्या बर्‍याच सामाजिक कार्याचा एक भाग आहे. त्यांनी खेड्यांमध्ये जागरूकता शिबिरे, संशोधन व शिक्षण कार्यक्रमही केले आहेत. कर्नाटक कर्करोग सोसायटीमध्ये
त्या मोफत उपचार देत आहेत.

केवळ डॉ.विजयलक्ष्मीच नाही तर त्यांच्या बहिणींनीही जीवनात यश मिळवून आपल्या पालकांचे नाव मोठे केले. त्यांच्या चार बहिणींनी पीएचडी केली आणि आपापल्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.