५० वर्षांपासून जामखेडमध्ये सुरू आहे, गोरगरिबांच्या मोफत आरोग्यसेवेचा आरोळे पॅटर्न

नगरच्या अमेरिकन मिशन बॉय्ज स्कूलमध्ये एक मुलगा शिकत होता, त्यादरम्यान प्लेगची साथ आलेली, तेंव्हा त्या मुलाचे दोन वर्गमित्र औषधे न मिळाल्यामुळे त्या साथीमध्ये बळी पडले. हा प्रसंग पाहून त्या संवेदनशील मुलाने मनाशी निर्धार पक्का केला आणि पुढे जाऊन डॉक्टर झाले ..साधेसुधा डॉक्टर नाही तर गोर-गरीबांचा डॉक्टर रजनीकांत आरोळे !

डॉक्टर हे देवदूत असतात असं फार पूर्वीपासून म्हणले जाते, कोरोनाकाळात तर याची प्रचीती अख्या जगाला आलीये.

तुम्ही नास्तिक असा किंवा आस्तिक, तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येतोच येतो, जेंव्हा आपल्याला डॉक्टरांमध्ये देव दिसतो…

असाच एक देव आम्हालाही माहिती आहे, डॉ. रजनीकांत आरोळे नावाचा !

आजकालच्या कमर्शियल डॉक्टरांना सामाजिक कार्याचं काही एक पडलेलं नसतं, परंतु याला काही डॉक्टर अपवादही आहेत. त्यातलं एक खूप महत्वाचं नाव म्हणजे डॉ. रजनीकांत आरोळे होय.

आरोग्य हे देशातल्या लोकांची सहाव्या क्रमांकाची गरज आहे हे रजनीकांत डॉक्टरांनीच सांगितले होते. फक्त उठसुठ सामाजिक कार्य करणे महत्वाचे नाही तर त्याला योग्य मार्ग, पद्धत राबविणे महत्वाची आहे असे सांगत,

त्यांनी सामाजिक आरोग्यसेवेचे आयामच त्यांनी बदलून टाकले होते.

ते मुळचे महाराष्ट्रातील अहमदनगरच्या सुप्याचे आहेत. आई-वडील शिक्षक. वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून मेडिसीन आणि सर्जरीची पदवी घेतली. मेबल कमला इम्यॅन्युअल नावाची  जीवनसाथीही त्यांना तिथेच भेटली. त्यांच्या या लग्नाच्या व्रताने गरीब भागातील हजारो ग्रामस्थांचे आरोग्य वाचले आहे.

डॉ. रजनीकांत आरोल आणि त्यांची पत्नी माबेले यांनी लग्नाच्या वचनासोबतच आयुष्यभर ग्रामीण भागातील गरिबांची सेवा करण्याचेही वचन घेतले होते.

त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले आणि त्यांनी १९६० च्या काळात कर्नाटकातील कोलारला निवासी डॉक्टर म्हणून आरोग्य सेवेला प्रारंभ केला,ग्रामीण भागात काम करीत असल्यामुळे त्यांनी आधीच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव जवळून पाहिले होते.

यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील ‘वडाळा मिशन’मध्ये काम करण्याची संधी चालून आली आणि त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. तिथे त्यांनी मन लावून काम केले. त्यांचे प्रामाणिक काम पाहून मिशनरिजनी त्यांना परदेशात काम करण्याची ऑफर दिली.

परंतु ग्रामीण भारतातल्या आरोग्य व्यवस्थेत आपण जास्त काम करू शकतो, ग्रामीण जनतेला आपण आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊ शकतो म्हणून त्यांनी स्वतःचा देश निवडला.

आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी मानले आणि ते थेट स्वतःच्या जामखेड या दुष्काळी भागात पोहचले आणि तिथेच ग्रामीण आरोग्य प्रकल्प उभारला. हजारो लोकांच्या नशिबी ज्या ठिकाणी अज्ञान आणि अंधश्रद्धा होते त्या ठिकाणी स्थायिक होणे इतके सोपे काम नव्हते.  खेड्यांमध्ये कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण प्रति हजार २००, क्षयरोग (टीबी) आणि कुष्ठरोग, प्रदूषित पिण्याच्या पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या आतड्यांसंबंधी रोग आणि इतर अनेक प्रकारच्या आजारांनी हि जनता ग्रासलेली होती.

तेथे त्यांनी अनेक गरिबांना मोफत आरोग्य सेवा पुरविली. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

२०१४ मध्ये  या जोडप्याला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात “स्वावलंबी ग्रामीण आरोग्य सेवा आणि आर्थिक उन्नतीची चळवळ” चालवल्याबद्दल प्रतिष्ठित रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा वारसा त्यांचे मुलं डॉ.रवी आरोळे आणि शोभा आरोळे हे यशस्वीपणे चालवत आहेत. जामखेड मधील त्यांचा आरोळे पॅटर्न बराच गाजला होता. कोरोनाच्या लाटेत त्यांनी रुग्णांचे मोफत उपचार केले.

एक रुपयाही न देता त्यांच्या जुलिया हॉस्पिटल मधून गरीब जनता ठणठणीत बरी होऊन गेले…याचाच अर्थ  हे बहिण-भाऊ नक्कीच त्यांच्या आईवडिलांचा समाजकार्याची धुरा पुढे चालवत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.