महोगनी शेतीतून खरंच लाखोंचा फायदा होवू शकतो, कुंदन पाटील यांच मॉडेल पहाच…

शेतकरी आणि स्किमा..

आम्ही लहान होतो तेव्हा इमू पालनाचा फॅड आलेलं, शेवगा असो की कडकनाथ कोंबडी. अशा स्किमा येतात. शेतकऱ्यांना अवाजवी पैशांच आमिष दाखवतात आणि पुढे गायब होवून जातात.

अशा स्किमांमधून शेतकरी एक गोष्ट शिकला तो म्हणजे आत्ता अशा भुलथापांना फसायचं नाही.असल्या प्रकारातून झालेली ही एकमेव चांगली गोष्ट.

पण चांगल्या बरोबर वाईट देखील गोष्टी होतात. झालं अस की यामुळे शेतकरी चांगल्या गोष्टींवर देखील संशय घेवू लागला. जी गोष्ट पटण्यासारखी आहे, पुढे जाण्यासारखी आहे अशा गोष्टींवर देखील संशय घेवून पारंपारिक पिकांवरच चार पैसे उभारू लागला…

त्यामुळे काय खरं आणि काय खोटं असा प्रश्न आपल्या भिडूंना देखील पडतो.

अशीच एक गाजत असणारी स्कीम म्हणजे महोगनी लाकूड. काही वर्षात हमखास नफा म्हणून शेतकरी या पीकाकडे वळत आहेत. तर काहीजणांच म्हणणं आहे की हे पण काही दिवसात फसेल.

संशय घेणं चांगलाय, पण संशयाचं निराकरण पण व्हायला पाहीजे. म्हणूनच बोलभिडूवर लेख लिहून महोगनीचा मॅटर समजून, विस्कटून सांगूया म्हणलं…

आपला मुख्य मुद्दा आहे तो महोगनी सेफ आहे का? यात फसवणूक होणार का? यातून हमखास नफा मिळणार का?

अशा सर्व प्रश्नांसाठी आम्ही क्रॉपसिटी ऍग्रोव्हेट प्रायव्हेट लिमिटेडच्या कुंदन पाटील यांच्याशी संपर्क साधला.

कारण संपूर्ण भारतात महोगनी शेतीबद्दल कॉन्ट्रक्ट फार्मिंग करणारी त्यांची पहिलीच कंपनी आहे. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर लक्षात आलं की महाराष्ट्रात महोगनीबद्दल इंत्यंभूत माहिती असणारे ते व्यक्ती आहे. त्यांच्यासोबत जे बोलणं झालं तेच विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला.

कुंदन पाटील सांगतात,

कोणतिही नवीन स्कीम आली की त्यावर संशय तर घेतलाच जातो. असा संशय फायद्याचाच जास्त ठरतो. कारण शेतकऱ्याला अशा गोष्टींमुळे संपूर्ण माहिती मिळते. आत्ता माझ्याबद्दल विचाराल तर मी सर्वात पहिला साग उत्पादनाचा विचार करत होतो. सागासाठी ४० वर्ष थांबाव लागतं. इतके वर्ष थांबू शकणारे शेतकरी भारतात तर नाहीत.

त्यामुळे महोगनीचा विचार पुढे आला. सुरवातीला शासनाच्या सर्व परवानग्या, कागदपत्रे अशा गोष्टींची माहिती मिळवली. अशा गोष्टींत सर्वात महत्वाची गोष्ट असते ती ग्राहकांची. गेली पाच वर्ष मार्केट रिसर्च केला.

त्यासाठी भारताच्या सर्वच भागात फिरलो आणि सुमारे ९,५०० ग्राहकांची अशी यादी तयारी केली ज्यांना महोगनीच्या लाकडांची वर्षभर मागणी असते. आज आम्ही शेतकऱ्यांना महोगनी लागवड करण्यास ठामपणे सांगतो ते याच कारणामुळे आमच्याकडे तुमचा माल कुठे आणि कसा विकायचा याची यादीच तयार आहे, मार्केट उपलब्ध आहे.

कुंदन पाटील यांनी पुढे सांगितलं की,

आजवरचा इतिहास आहे की, लाकडाचे दर कधीच कमी झाले नाहीत. ते दरवर्षी वाढतच जातात. त्यामुळे निश्चितच वर्षागणिक अधिकचा फायदा देणारे क्षेत्र म्हणून लाकूडक्षेत्र आहे. ऊस सोडला तर निश्चित उत्पन्न देवू शकेल असे एकही पारंपारिक पीक शेतकऱ्यांकडे नाही. अशा वेळी निश्चित व शाश्वत पैशाचा स्त्रोत म्हणून शेतकरी महोगनी शेतीकडे पहात आहेत.

अशा वेळी क्रॉपसिटी ऍग्रोव्हेट प्रायव्हेट लिमिटेड मार्फत आम्ही शेतकऱ्यांना महोगनी शेती सोप्पी करून देतो.

महोगनी शेतीमध्ये फक्त लागवडीचा मुद्दा नसतो. यामध्ये तोडणी आणि वाहतुकीसाठी वनविभाग  आणि रेवेन्यू विभाग अशा दोन्ही विभागांचा संबंध येतो. बरेच शेतकरी इथूनच माघार घेतात. कारण शासकीय परवानग्या मिळवणं सोप्पी गोष्ट नसते. अशा वेळी शासकीय परवानग्या मिळवणे, कागदपत्रे तयार करणे आणि मार्केट शोधणे यासाठी कुंदन पाटील यांची कंपनी समोर येते.

महोगनी शेतीसाठी विश्वासार्ह संबंध निर्माण करून तो विश्वास टिकवणं हा कुंदन पाटील यांचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी ते शेतकऱ्यांसमोर थेट कॉन्ट्रेक्ट फार्मिंगचा पर्याय ठेवतात.

भारत सरकार सोबत कागदपत्रांची देवाण घेवाण करण्यापासून ते परवानग्या मिळण्यापर्यन्तच्या सर्व गोष्टी कंपनीमार्फत केल्या जातात. बरीच क्लिष्ट असणारी ही पद्धत कंपनीमार्फत सोप्पी करण्यात येते. लागवडीच्या परवानग्यांपासून ते मार्केटमध्ये लाकूड विकण्यापर्यन्तची सर्व जबाबदारी व सहकार्य कंपनी घेते.

नेमकं हे सर्व कसं करण्यात येतं याबद्दल कुंदन पाटील विस्ताराने सांगतात,

ते म्हणतात,

“क्रॉपसिटी ऍग्रोव्हेट प्रायव्हेट लिमिटेड इच्छुक शेतकऱ्यांना संपर्क करते आणि त्यांच्याशी १२ वर्षांचा करार केला जातो, या अंतर्गत एका एकर मध्ये ५०० झाडे लावली जातात. ती रोपे देखील कंपनी पुरवते. त्यानंतर कंपनीचा प्रतिनिधी दर ३ महिन्याला त्या त्या शेतीला भेट देतो आणि पिकांची वाढ कशी होतेय यावर लक्ष ठेवतो.

शेतकऱ्यांना सुरवातीपासूनच मोहगणी शेतीविषयक योग्य ते मार्गदर्शन म्हणजेच, या वृक्षाला खतं कोणती हवीत, तसेच याला लागणारी खते विकत घेण्यासाठीही कंपनी मार्गदर्शन, कोणत्या काळात लागवड करायची, जमीन कशी हवीये असे सर्व मार्गदर्शन करण्यात येते.

विशेष म्हणजे क्रॉपसिटी ऍग्रोव्हेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ड्रोन कंपनी आहे. या ड्रोन मध्ये एक रडार बसवलेला आहे जो शेतीमधील प्रत्येक झाडाची उंची मोजतो, त्याच्या वाढीची गती मोजली जाते तसेच एनओपी साईज मोजली जाते, त्याची गर्त मोजली जाते.

हे तंत्रज्ञान जगात फक्त जपान आणि भारतातल्या या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कंपनीकडे उपलब्ध आहे.

या पिकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला सुरुवातीचे फक्त ३ वर्ष खत आणि पाणी पुरवठा करावा लागतो आणि एकरी फक्त १० हजार रुपये खर्च येणारे हे पिक आहे.

तसेच लागवडीच्या ७ वर्षांनी जेंव्हा लागवड पूर्ण होत येते तेंव्हापासूनच फर्निचर कंपनीसोबत एग्रो कंपनीचा समन्वय चालू असतो. त्यानंतर शेतकऱ्यांचे लाकूड विक्रीसाठी तयार होते त्या दरम्यान त्याचे मार्केटिंग करणे हे या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची जबाबदारी असते. तोडणीच्या वेळेसची कायदेशीर प्रक्रियेची जबाबदारी हि संपूर्णतः कंपनीची असते.

विश्वासार्हतेचा प्रश्न आल्यावर कुंदन पाटील म्हणाले की या क्षेत्रातील इतर कंपन्या कशा काम करतात या आम्ही काही सांगू शकत नाही पण आम्ही शेतकऱ्यांकडून कोणतीही ऍडव्हान्स रक्कम घेत नाही.  नाममात्र रजिस्ट्रेशन फी घेऊन कॉन्ट्रॅक्ट केला जातो, तिथून थेट जेव्हा शेतकऱ्यांना उत्पन्न सुरू होते तेव्हा त्यातील १५% टक्के रक्कम कंपनी कन्सल्टन्सी चार्जेस म्हणून घेते. कोणाकडूनही ऍडव्हान्स घेतला नसल्यामुळे फसवणुकीचा संबंधच येत नाही.

उलट ग्राहकासोबतचा दर शेतकऱ्यांना मान्य झाल्यानंतर कंपनी ३०% ऍडव्हान्स देणार आणि वर्षाला कंपनी हि शेतकऱ्यांना ऍडव्हान्स देणार जी एकूण उत्पन्नामधून कट होतील म्हणजेच शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पन्नासाठी १० वर्ष थांबण्याची गरज रहात नाही. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने उत्पन्न मिळत जाते.”

आजवर ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्याशी करार केला व त्यांच्या खात्यावर ऍडव्हान्स जमा झाले याची माहिती क्रॉपसिटी कंपनीने आपल्या वेबसाईटवर सहज मिळू शकते. यामुळे फसवणुकीला वाव मिळत नाही.

कार्बन क्रेडिट

महोगनी शेतीचा आणखी फायदा म्हणजे यातून तयार मिळणारे कार्बन क्रेडिट. सध्याच्या पर्यावरणाबद्दल जागृती होत असलेल्या काळात कार्बन क्रेडिटचे महत्व वाढत चालले आहे. प्रदूषण वाढलेल्या विकसित देशांना कार्बन क्रेडिटची आवश्यकता असते. म्हणूनच तेथील कंपन्या कार्बन क्रेडिट विकत घेण्यासाठी उत्सुक असतात. विकसनशील देश आपले कार्बन क्रेडिट विकून त्यातून पैसे कमवू शकतात.

महोगनी शेतीचा फायदा असा की ही झाडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करतात. याचा फायदा कार्बन क्रेडिट साठी करण्यासाठी क्रॉपसिटी ऍग्रो कंपनीने कंबर कसली आहे. यासाठी परदेशी कंपन्यांशी करार केले आहेत. यामुळेच कार्बण क्रेडिट विकून त्यातून येणारी डॉलर मधली रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. कुंदन पाटील यांच्या मते झाड पाच वर्षांचे झाल्यापासून वर्षाला एकरी साधारण ५० हजार ते १ लाख इतकी रक्कम कार्बन क्रेडिट मधून आपल्याला मिळू शकते.

थोडक्यात काय तर महोगनी शेतीबद्दल असणाऱ्या सर्व शंका दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाच शिवाय त्यांनी उभा केलेलं एक सक्सेसफुल मॉडेल देखील आम्हाला सांगितलं.

हे सगळं सुरू असताना सामाजिक भान जपण्यासाठी क्रॉपसीटी कंपनी आपल्या ८०% शेअर्सचा वाटा अनाथ मुलांसाठी खर्च करणार आहे हे विशेष.कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाजार भोगाव इथला हा तरुण पाच सहा वर्षे अभ्यास करून शेतकऱ्यांना शाश्वत फायदा देणारे मॉडेल बनवतो, मराठवाड्यापासून ते तेलंगणा पर्यंतच्या शेतकऱ्यांना त्याबद्दल जागृती करण्यासाठी धडपडतो ही निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे.

महोगनी लागवडी बाबतीत कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग करणारी कुंदन पाटील यांची देशातील पहिली कंपनी आहे. तुम्ही देखील महोगनी शेतीबाबत विचार करत असाल तर कुंदन पाटील यांच्याशी तुम्ही थेट संपर्क करू शकता.

कुंदन पाटील यांचा संपर्क क्रमांक : 

+91 93257 94597

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.