हे आहेत गणिताचे दोन मास्तर एकाच नाव “डकवर्थ” आणि दूसऱ्याचं “लुईस”

क्रिकेट आणि पावसाचा ३६ चा आकडाच म्हणावा लागेल. कारण फुटबॉल, हॉकी, टेनिस या खेळासारखा क्रिकेट पावसात खेळता येत नाही. क्रिकेट सामना सुरु असताना पाउस सुरु झाला तर मध्येच खेळ थांबवावा लागतो.

ठरवलेल्या वेळेत पाऊस थांबल्यास खेळ पुन्हा सुरु होतो. त्यात कधी ओवेर्स कमी केल्या जातात तर कधी कधी पाउस न थांबल्याने सामानाच रद्द करावा लागतो.

१९९२चा क्रिकेट वर्ल्डकप.

इंग्लंड-दक्षिण आफ्रिकामध्ये सेमी फायनल सुरु होती. दक्षिण आफ्रिकेला जिंकायला १३ बॉल मध्ये २२ रन हव्या होत्या. एवढ्यात वरून देवाची कृपा झाली. धो धो पाऊस सुरु झाला. त्याने मचची १२ मिनिटे घेतली. तेव्हाच्या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला टार्गेट बदलून देण्यात आले. नवे टार्गेट होते १ बॉलमध्ये २१ रन. दक्षिण आफ्रिका हरली. त्यांच्यावर अन्याय झाला हे सगळ्या जगान बघितल होतं.

इंग्लंड मध्ये रेडियोवर क्रिस्तोफर मार्टिन जेकीन्स कोमेंट्री करताना म्हणत होता,

“कुठे तरी कोणी तरी बसलं आहे जे यापेक्षा काही तरी चांगली आयडिया घेऊन येतील. “

एक संख्याकशास्त्रज्ञ ही कोमेंट्री ऐकत होता. त्याने विचार केला की आपणच आपलं गणिती डोकं लढवून का हा नियम शोधून काढू नये? त्याने आपल्या मित्राला सोबत घेऊन व्यवस्थित गणिती आकडेमोडीचा संशोधन करून एक नियम बनवला. त्याला त्या दोन्ही गणिततज्ञांची नावे देण्यात आली,

डकवर्थ आणि लुईस.

या दोघां संख्यांकशास्त्राच्या तज्ञांनी कधी हातात बॅट पण धरली नसेल. पण त्यांनी याचा शोध लावला आणि तिथून क्रिकेटची सगळी गणितेचं बदलून गेली. या शोधाबद्दल त्यांना मेम्बर ऑफ ब्रिटीश एम्पायरनी सुद्धा गौरवण्यात आलं.

download

सामना चांगला रंगात येऊन रोमहर्षक होत असताना मध्येच पावसाने काशी केल्यास सगळा मजा किरकिरा होतो. सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कप मध्ये आपण हेच बघतो आहे. सामना चालू असताना तर पाउस पडतोच आहे शिवाय काही सामने सुरु होण्याआधीच पावसाला सुरुवात होऊन सामना न खेळवताच रद्द करावा लागतो आहे. असे आतापर्यंत तीन सामने रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे संघांच्या पोइंट्स चे नुकसान होत आहे. अशा सामन्यांचे निकाल लावणे आधी कठीण जायचं. पण नंतर डकवर्थ लुईसमुळे यामध्ये थोडी सुसूत्रता आली .

काय आहे डकवर्थ लुईस नियम ?

या नियमाचा शोध फ्रंक डकवर्थ आणि टोनी लेविस यांनी १९९५ मध्ये इंग्लंडमध्ये लावला. १९९७ मध्ये इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात या नियमाचा पहिल्यांदा वापर करण्यात आलेला, हा सामना झिम्बाब्वेने ७ धावांनी जिंकला होता. त्यानंतर या नियमाला आयसीसी कडून मान्यता मिळाल्यानंतर १९९९ च्या वर्ल्ड कप याचा वापर चालू करण्यात आलेला. आतापर्यंत पावसामुळे प्रभावित झालेल्या २०० च्या वर सामन्यात हा नियम वापरला गेला आहे. आयसीसी अंतरगर्त खेळवल्या जाणार्या सगळ्या सामन्यात हा नियम लागू होतो.

कसा असतो डकवर्थ लुईस नियम ?

डकवर्थ लुईस नियमानुसार सामना खेळत असलेल्या दोन्ही टीम कडे दोन साधन असतात ज्याआधारे ते जास्तीत जास्त रन्स बनवू शकतात. ते दोन साधन म्हणजे बाकी असलेल्या विकेट्स आणि ओवेर्स. सामन्याच्या कुठल्याही क्षणी कोणत्याही टीमची रन्स बनवण्याची क्षमता या दोन साधनांवर निर्भर असते. हे लक्षात घेता डकवर्थ आणि लुईस यांनी एक सूची बनवली आहे. ज्यावरून काळात की सामन्याच्या वेगवेगळ्या क्षणी फलंदाजी करत असलेल्या संघाकडे किती साधन बाकी आहे.

खाली दिलेली सूची बघितली तर आपल्या लक्षात येईल की, पारी सुरु होण्यापूर्वी ५० ओवेर्स आणि १० विकेट्स असतील तेव्हा रन्स बनवण्याचे साधन १०० टक्के असेल. नंतर टीम जसजशी ओवेर्स खेळत जाते आणि विकेट्स गमवते त्याच हिशोबाने तिचे साधन हि कमी होत जातात.

DL method

समजा एखादी टीम २० ओवेर्स खेळली आहे आणि २ विकेट्स गमावल्या आहेत तर त्या ठिकाणी त्यांचे बाकी राहिलेले साधन हे ६८.२ टक्के असतील. आता या स्थित पाउस चला झाला आणि तो थांबून पुन्हा खेळ सुरु होईपर्यंत १० ओवेर्सचा वेळ वाया गेला आहे. म्हणजे आता त्या टीमकडे २० ओवेर्स बाकी आहेत आणि २ विकेट्स गमावल्यामुळे सूचीनुसार त्यांचे ५४ टक्के साधन बाकी आहेत.

उदाहरण

समजा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५० ओवेर्स मध्ये २५० रन्स बनवले आहेत. दुसऱ्या टीमने ४० ओवेर्स मध्ये ४ विकेट्स गमावून १९९ रन्स केले आहेत. तेव्हाच पाउस सुरु होतो आणि थांबायचे नाव घेत नाही. पुढे काहीच खेळ होत नाही आणि सामना तिथेच थांबवावा लागतो. मग आता विजेता कोण हे ठरवायला डकवर्थ लुईस नियम वापरला जातो.

पहिल्या टीमने ५० ओवेर्स खेळल्या म्हणजे त्यांनी १०० टक्के साधन वापरले. दुसऱ्या टीमकडे सुद्धा परी सुरु होण्याआधी १०० टक्के साधन होते. ४० ओवेर्स नंतर दुसऱ्या टीमकडे १० ओवेर्स बाकी आहेत आणि ५ विकेट्स गमावल्या आहेत. डकवर्थ लुईस नियमानुसार त्या टीमकडे २७.५ टक्के साधन बाकी आहे. याचा अर्थ त्यांनी १००-२७.५ = ७२.५ साधन वापरले आहे. यात स्पष्ट आहे दुसऱ्या टीमला पहिलीच्या तुलनेत कमी साधन त्यानुसार दुसऱ्या टीमच्या लक्ष्यात साधनानुसार घट करावी लागणार. म्हणजे १००/७२.५.

पहिल्या टीमने बनवले होते २५० म्हणजे २५०x७२.५/१०० = १८१.२५. तर दुसऱ्या जिंकण्यासाठी हवे होते १८२ पण त्यांनी आधीच १९९ केलेले आहेत. म्हणजे ते १८ रन्सनी जिंकले आहेत.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.