इंग्लंडमधल्या नदीमध्ये देवनागरी लिपी कोरलेला गूढ खजिना सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी विल रीड नावाचा एक नद्यांचे उत्खनन करणारा तज्ञ आपल्या दोन मुलांना घेऊन सोव नदीच्या बगिंगटन पुलावर गेला. आपण मासेमारी करताना जसे गळ टाकतो तसेच लोहचुंबक लावलेले गळ त्यांनी पुलावरून नदीत टाकले.

काही वेळात विलच्या गळाला काही तरी जड लागलं. त्याने आपल्या मुलांना पाहायला सांगितल्यावर ते दोघे पाण्यात उतरले. तेव्हा त्यांनी वडिलांना ओरडून सांगितलं की,

आपल्याला नदीत खजिना सापडला आहे

त्यांना नदीत काही ठोकळे सापडले. हे ठोकळे सोन्याचे नसून शिसे या धातूचे होते. नंतर मोजल्यावर कळाल हे एकुन 64 ठोकळे होते. काही दिवसांनी आणखी 20 ठोकळे मिळाले.

14SMwill3

या ठोकळ्यांच्या सोबत काही नाणी सापडली आहेत. यातील एका नाण्यावर दुर्गा मातेचं चित्र आहे. या नाण्याच्या पाठीमागे ‘श्री’ असे कोरलेले आहे.

14SMwill9

विलच्या लक्षात आलं की हा खजिना भारतीय आहे.

त्याने यावरच संशोधन सुरू केलं. त्याला मिळालेल्या ठोकळ्यांवर काही आकडे आणि देवनागरी भाषेत काही अगम्य अस कोरलेल होतं.

सुरवातीला त्याला वाटलं की ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून प्रचंड संपत्ती आणली होती, त्याचाच हा भाग असावा. किंवा कुठल्या भारतीय राजाने हे ठोकळे नदीत सोडले असतील.

या ठोकळ्यांना मोठा इतिहास असला पाहिजे याचा त्याला अंदाज आला.

विल रीड याने या सगळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तेव्हा तिथे आलेल्या काही कमेंट्स वरून हा नेमका काय प्रकार आहे याचा अंदाज लागू लागला.

ते ठोकळे म्हणजे सापशिडीचे ठोकळे नाहीत तर राहू यंत्र होते.

ठोकळ्यांच्यावर देवनागरी लिपी मध्ये :ओम राहवे नमः’ अस कोरल होत तर त्यावरील आकडे लिपीत होते.

15 08 13
10 12 14
11 16 09

या आकड्यांची उभी आडवी तिरकी बेरीज केली तर ती 36 येत होती. रीडला आणि त्याच्या टीमला गूढ तांत्रिक ठोकळे मिळाले होते.

गेल्या काही दिवसात इंग्लंडमधल्या अनेक नद्यांमध्ये विशेषतः थेम्स नदीमध्ये अशा विचित्र गोष्टी सापडत आहेत.

काही दिवसांपूर्वी रीड च्या मित्राला एका नदीत नारळ सापडला, त्या नारळामध्ये एक अस्सल सोन्याची गणपतीची मूर्ती मिळाली आहे.

याच कारण शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना जवळपास 100 वर्षांपूर्वी पंडित रूपचंद जोशी यांनी लिहिलेल्या लाल ‘किताब या पुस्तकाची माहिती मिळाली.

हे पुस्तक उत्तर भारतीयांमध्ये प्रचंड फेमस आहे.

यात तुमच्या वर आलेली वेगवेगळी संकटे आणि त्यावर मंत्र तंत्राचा तांत्रिक उपाय सांगितलेला आहे. जवळपास 43 दिवस हे मंत्र तंत्र करून शेवटच्या दिवशी राहूचे ठोकळे नदीत विसर्जित केले जातात.

साधारण बाराव्या शतकापासून गंगा नदीमध्ये अनेक ठिकाणी असे संकटनिर्मूलनासाठी राहूचे ठोकळे सोडण्याची प्रथा चालत आलेली आहे असे मानले जाते.

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी थेम्स हीच गंगा नदी आहे.

आपल्याकडेही अनेकदा शेत पिकवणाऱ्या नदीला कृतज्ञतेने एखाद नाणं समर्पित करण्याची प्रथा आहे.

अनेक जण युरोप अमेरिकेत गेल्यावरही सवयीने या प्रथेच पालन करतात.

मात्र विल रीड याला सापडलेले ठोकळे नाणी हे किती वर्षांपूर्वीचे आहेत याचा उलगडा व्हायचा आहे. त्याचा सुरवातीचा अंदाज हा खजिना कमीतकमी 100 वर्षांपूर्वीचा असावा असा होता.

मात्र तेव्हा सोव्ह नदीवर तिथे पुलच नव्हता त्यामुळे हे ठोकळे अलीकडच्या काळातील असण्याची शक्यता आहे असे त्याने द हिंदू या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

विल रीडला या शिस्याच्या गूढ ठोकळ्याचे किती पैसे मिळतील नक्की ठाऊक नाही.

उलट त्याचे मित्र सांगतात की ज्या कोणी व्यक्तीने हे ठोकळे नदीत सोडले आहेत ते त्याच्यावर कसलं तरी संकट आलंय म्हणून सोडले आहेत. तरी दुसऱ्याची निगेटिव्ह एनर्जी स्वतः वर ओढवून घेऊ नको असं काही जणांच विलला सांगणं आहे.

पण अशा गोष्टींवर विश्वास नसलेला विल रीड आपल्या मुलांना घेऊन नव्या शोधाच्या मागे लागला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.