फेसबुक घुमवणारे पाच प्रकारचे लोक, तुमचा नंबर कुठं लागतोय पहा ! 

२१ व्या शतकातला सर्वात क्रांन्तीकारी शोध म्हणजे फेसबुक. आपण एका गल्लीत खेळल्यासारखं आणि एका चड्डीत फिरल्यासारखं मार्क झुकरबर्ग ला झुक्या म्हणू लागलो याहून फेसबुकचं विकेंद्रीकरण ते काय असू शकतं. आज फेसबुक माणसांना जोडणार महत्वाचं अंग म्हणून सांगितल जातय. समाजातील व्यक्ती व्यक्तींना, जाती जातींना, धर्मा धर्मांना जोडण्याचं आणि तोडण्याचं महत्वपुर्ण योगदान फेसबुकडे निर्विवाद जातय. 

खरतर फेसबुक म्हणजे विविधतेने नटलेला जलसागरच जणू, आणि या जलसागरात मुक्तपणे हिंडणारे फिरणारे तुम्ही आम्ही फेसबुके.

किती हि विविधता… 

STOP, काय म्हणलां विविधता. एक्सक्युझमीच बर का ? जरा निरखून बघितलं तर काहीच विविधता दिसत नाही. सगळ कस सारखं आहे. हेच पाच प्रकार. या पाच प्रकाराहून वेगळा मराठी माणूस फेसबुकवर तर सापडणार नाही. 

बघा चेक करा, आपण नक्की कुठं आहे ते.. 

१) राडा करणारी टोळी. 

#Euuuu. राडा करणारी फेसबुकवरची सर्वात मात्तब्बर गॅंग. एका मिनटात यांच्याऐवढे लाईक तर मोदी पासून हार्दिक पटेलला देखील येत नसतात. यांचा मेन माणूस पप्या गायकवाड. विविध रंगाचे फोटोशॉप. दोन चार रंगबेरंगी कपड्याच्या जोड्या. एखाद्या अॅडिबास नायतर पोमाचा शूज. सोबत पांढरी अॅक्टिवा नायतर ड्यूक. हो फोडणीला चांगली मैत्रीण असली तर २ चार हजार वाढीव लाईक्स.. 

हि आहे फेसबुकवरची सर्वात पॉप्युलर गॅंग. यात सहभागी होण्यासाठी पहिला मुद्दा असतोय तो नामांतराचा. नावाच्या पुढं राडा करणारा, धुरळा करणारा, पप्पांची लाडकी, आईची परी.. वगैरे वगैरे टाईप लिहायचं असतं. त्यातही कुलपणा हवा असेल तर ड्यूक चालवत असला तर DRz, रायडर, रिस्क ट्रेकर वगैरे टाईप इंग्लीश लावायचं. हे झालं की तुम्ही पहिली पायरी चढली. तसही गाव गोळा करायचं आपल्या संगळ्यांकडेच अंगभूत कौशल्य असतच. इथं टॅग करून गाव गोळा करायचं. इवू राडा करायचां. 

हे जमलं तर तुम्हीपण या गॅंगमध्ये जावू शकताय. कदाचित आत्ता देखील असाल पण संशोधना अंती या प्रकारची लोकं असले लेख वाचत नाहीत हे देखील सिद्ध झालय. 

२) पैलवान गॅंग. 

बघा. विचार करा. काहिहि बोलण्याच्या आणि लिहण्याच्या आधी शंभर वेळा विचार करा. कसय परत घरावर दगड पडली तर विचारायला यायचं नाही. आत्ता या गॅंगवर लिहायचं आणि चुकून त्यांनी हे वाचलं तर #रीष कुबेर यांच्यासारखा आम्हाला देखील लेख मागं घ्यायला लागायचां. भावना लय महत्वाच्या असतात वो. तर महाराष्ट्रात पैलवान लोकांचा देखील मोठ्ठा समुह आहे. हा समुह जास्त राडा करत नाही. फक्त हेलिकॉप्टरमधून येण्याचा प्रयत्न करतो. यांच्याकडची सर्वात कमी संपत्ती म्हणजे फॉर्च्युनर.

तुम्ही या गॅंगमध्ये असाल तर तुमच्याबद्दल फुल्ल रिस्पेक्ट. (न ठेवून सांगतोय कोणाला) 

३) लेखक लोकांची टोळी. 

सर तुम्ही दिर्घ लिहा. या ओळीत साहित्य अकादमीची ताकद आहे. सर खरचं खूप मस्त लिहलय. तोडलय, फोडलय, जोडलय, घेतलय वगैरे वगैरे ४० च्या वरती कमेंट आणि २०० च्या वरती लाईक्स असणारी टोळी म्हणजे फेसबुक लेखकांची. हे काय करतात न आलेले, कुठेतरी एकलेले अनुभव स्वत:च्या नावावर खपवत असतात. यांच्याकडे वेळेनुसार दर्द, दुखं, प्रेम, जोक्स, आनंद वगैरे मिळत असतो. काही वेगळं होतं नसेल तर वेळप्रसंगी स्वत:चा एक हॅशटॅग निर्माण करतो. 

नंतर हि माणसं गायब होतात आणि नवी माणसं सॉरी सेलिब्रिटी जन्माला येतात. हाच काय तो सृष्टीचा नियम असतोय बघा. 

४) राजकारणाचे फंटर. 

मोदींना अस्स केलं, साहेबांनी तस्स केलं, राज साहेब आगे बढों, मंदिर वहीं बनाऐंगे, चौकिदार चौर हैं, राष्ट्रवादी भ्रष्ट्रवादी आणि गर्दीत सापडलेलं एखाद बाळ म्हणजे आपचे सपोर्टर. अस एकंदरित चित्र असतय. दिवस सुरू होतो ते दुसऱ्या पार्टीच्या नेत्याची आब्रु काढूनच. सकाळ्ळ झालं की पोराचं राजकारण सुरू होतं. पहिल्या टप्यात दिवसभर आलेल्या बातम्यांच्या खाली ओळीने ट्रोल करत जी गाडी सुसाट सुटते ती रात्री एक दिड वाजेपर्यन्त छोटमोठ्या गोष्टी शेअर करून दमून भागून जाते. यात तरुणाई पण असते आणि रिटायर लोक देखील असतात. माझ्या भूमिकांवरतीच देशाची नौका पुढं रेटणार आहे अस वाटणारा प्रत्येक इसम सहजरित्या या प्रकारात दाखलं होवू शकतो. इतकच. 

तर आपण यात असाल तर आनंदच. नसाल तर काळजी करू नका पुढचा प्रकार तर तुमचाच असणार. 

५) गुतूंन गुत्यांत साऱ्या गुंता माझा वेगळा. 

रंगुन रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात साऱ्या गुंता माझा वेगळा. म्हणजे कस तर  आज नेटफ्लिक्स तर उद्या फुटबॉल. परवा गेम ऑफ थ्रोन्स तर थेरवा मोदी कधीतरी पाणी फाऊंडेशन तर कधीमधी मिम्स. जसा प्रवाह घेवून जाईल तसे वाहत जाणारे तरीही आपली वेगळी ओळखं जपणारे फेसबुके या प्रकारात आग्रहाने येतात. २०१४ ते २०१९ पर्यन्तचा काळात यांनी राजकारणावर जास्तीत जास्त दोन कमेंट केलेल्या असतात  तरिदेखील हि लोकं मतदानाच्या रांगेत उभा राहिलेली दिसतात हे विशेष. जास्तीत जास्त वेळ हा वरुन खाली टाईमलाईन खेचत घालवण्यात हि लोकं वेळ घालवतात. 

तर हे झाले पाच प्रकार तुम्ही यात कुठेच नसला तर तुमच्यासाठी हा खास फोटो… 

घराच्या चौकटीवर लावा गुण येईल.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.