आत्ताच नाही तर, याआधीही हमीद अंसारी यांच्यावर राष्ट्रविरोधी असल्याचे आरोप झालेत

देशाचे माजी उपराष्ट्रपती राहिलेले हमीद अंसारी. कायमच वादात सापडणारं व्यक्तिमत्व. आत्ताही ते एका मोठ्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेत. 

आत्ताचं प्रकरण म्हणजे, पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी भारतात येऊन येथील माहिती गोळा केली आणि ती आयएसआय प्रमुखापर्यंत पोहोचवली अशी चर्चा सोशल मीडियावर चालू आहे.  सोनम महाजन ट्विटर युझरने ट्विट केले,

यूट्यूबर शकील चौधरी यांच्याशी झालेल्या संभाषणात मिर्झा यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे नाव घेतलेय, हमीद अन्सारी उपराष्ट्रपती असतांना त्यांनी आणि मिल्ली गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्राचे संस्थापक जफरुल इस्लाम खान यांच्या निमंत्रणावरून पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा भारतात आले होते असं मिर्झाचं म्हणणं असल्याचे दावे केले जातायेत.  याच नुसरत मिर्झा यांनी व्यक्तीने अनेकदा आंतरराष्ट्रीय मीडियावर भारताविरुद्ध वादग्रस्त विधानं केलीत. 

मात्र त्यांनी हमीद अंसारी यांचा उल्लेख करत केलेलं दावे खरे आहेत ? जी सोशल मीडियावर केली जाणारी चर्चा खरी आहे ? पाकिस्तनी पत्रकार मिर्झा नक्की काय म्हणाले ? तर या व्हिडिओच्या ११.४५ मिनिटांना नुसरत मिर्झा प्रत्यक्षात काय म्हणाले ते ऐका.

 

ही बातमी चुकीची असून अर्धवट असल्याचेही दावे केले जातायेत, 

मिर्झा ज्या कार्यक्रमात आलेले तो कार्यक्रम ११ डिसेंबर २०१० मध्ये विज्ञान भवन, एन दिल्ली येथे आयोजित केलेला. या कार्यक्रमाचे आयोजक इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट, ऑल इंडिया बार असोसिएशन, इंडियन कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट हे होते. या कार्यक्रमाचा विषय (International Conference of Jurists on International Terrorism and Human Rights) “आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि मानवाधिकारांवर न्यायवैद्यकांची आंतरराष्ट्रीय परिषद असं होतं. थोडक्यात या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी दहशतवादावर भाषण दिले होते.

आता सोशल मीडियावर ज्याप्रमाणे बोललं जातंय कि, हमीद अन्सारी यांच्या निमंत्रणावरुन पाकिस्तानी पत्रकार भारतात आलेले. मात्र २०१० मध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजक हमीद अन्सारी हे नव्हेतच. त्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. अन्सारी यांच्यावर इतक्या गंभीर प्रकारचे आरोप करण्याऐवजी बार असोसिएशन आणि गृह मंत्रालयाकडून जाब विचारले पाहिजेत.

असो, देशाच्या सर्वोच्च पातळीवरचे दुसऱ्या क्रमांकावरच्या उपराष्ट्रपती पदावर राहिलेले हमीद अंसारी यांच्यावर इतके टोकाचे आरोप पहिल्यांदाच झालेले नाहीयेत.

 तर याआधीही हमीद अंसारी वादात सापडले होते त्यातीलच काही वाद म्हणजे,

२०१२ मध्ये जनलोकपाल विधेयकावर हमीद यांनी काँग्रेसला वाचवले अशी टीका त्यांच्यावर झालेली. ३० डिसेंबर २०१२ ला संसद अधिवेशनात जनलोकपाल विधेयकाबाबतची मध्यरात्री राज्यसभेत येऊन त्यांनी कार्यवाही स्थगित केली होती असा आरोप त्यांच्यावर झालेला.  

२०१५ मध्ये प्रजासत्ताकदिनी राष्ट्रगीताच्या वेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी न दिल्यावरून वाद झाला  होता. त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. 

२०१५ च्या जूनमध्ये पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही ते अनुपस्थित होते तेंव्हा देखील ते जाणूनबुजून गैरहजर राहिलेत अशी टीका त्यांच्यावर झालेली.

२०२१ जानेवारीमध्ये पत्रकार अमन चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत, अंसारी यांनी भारतातील मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचा दावा केलेला ज्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झालेली.

२०२२ जानेवारीमधील घटना आहे,  

प्रजासत्ताक दिनानिमित्त वॉशिंग्टनमध्ये आयोजित केलेल्या व्हर्चुअल प्रोग्रॅम मध्ये ते म्हणलेले की, “अलीकडच्या काळात नागरी राष्ट्रवादाची जागा सांस्कृतिक राष्ट्रवादाने घेण्याचे प्रयत्न होत आहेत. धार्मिक बहुसंख्याकांना राजकीय मक्तेदारी म्हणून दाखवून धर्माच्या आधारावर असहिष्णुतेला खतपाणी घातले जात आहे.

भारतात असहिष्णुता वाढत आहे अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली होती तीही आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यामुळे त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर दिसून आला. 

तसेच रॉचे माजी अधिकारी एनके सूद यांनी अंसारी यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल पुन्हा एकदा चर्चा होतांना दिसून येतेय, सूद यांनी केलेले आरोप म्हणजे,

एनके सूद यांनी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हमीद अन्सारी यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली होती. 

त्यांनी गंभीर आरोप केलेले कि, १९९०-९२ दरम्यान अंसारी इराणचे राजदूत असतांना त्यांच्यामुळे आखाती देशात  RAW अधिकार्‍यांचा जीव धोक्यात आला होता. शिवाय १९९१ मध्ये भारतीय अधिकारी संदीप कपूर यांच्या अपहरणामागे हमीद अन्सारी यांचा निष्काळजीपणा असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला.

हमीद अंसारी यांचं नंबी नारायणन यांच्या फसवणुकीच्या केसमध्ये कनेक्शन  असल्याचा आरोप केला जातो. 

रॉचे माजी अधिकारी एनके सूद यांनी केलेल्या आरोपांनुसार, शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवणं, त्यांची बदनामी करणं, त्यांना देशद्रोहाच्या प्रकरणात गोवणं, त्यांची कारकीर्द उद्ध्वस्त करणं अशा षड्यंत्रात रतन सहगल नावाची एक व्यक्ती होती. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी सहगल नामक व्यक्तीने हे योजना आखली. हा सहगल अमेरिकन एजन्सी सीआयएसाठी हेरगिरी करताना पकडला गेला होता. जो हमीद अंसारी यांचा ओळखीचा होता, असे आरोप एनके सूद यांनी केलेले. 

देशात एका समुदायाला सुरक्षित वाटत नाही, असं विधान करणारे हमीद अंसारी हे मोठ्या राजकीय घराण्यात जन्मलेले आहेत. 

त्यांचे आजोबा डॉ. मुख्तार अहमद अन्सारी जे १९२७-२८ दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष होते. हमीद यांचे चुलतभाऊ अफझल अन्सारी उत्तर प्रदेशच्या कौमी एकता दलाचे नेते आहेत.  कुख्यात डॉन मुख्तार अन्सारीही हमीद यांचे चुलतभाऊ आहेत.  

हमीद अंसारी हे १९६१ मध्ये IFS बनले. भारतीय परराष्ट्र सेवेत काम करता असताना त्यांनी चार दशके ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इराण आणि सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून जबाबदारी पाहिली. ९० च्या दशकात त्यांना संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी बनवण्यात आले.

त्यानंतर ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि नंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००७ पासून तर २०१७ पर्यंत त्यांनी उपराष्ट्रपती पद भूषवलं. उपराष्ट्रपतींना राज्यसभेचे सभागृहही चालवावे लागते. यामुळे ते सलग १० वर्षे राज्यसभेचे अध्यक्षही राहिलेत.

मात्र त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत दुर्दैवाने त्यांच्यावर अनेक टोकाचे आरोप विरोधकांकडून झालेत. म्हणूनच तगडी राजकीय कारकीर्द असूनही हमीद अंसारी कायमच वादात सापडणारं व्यक्तिमत्व ठरलेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.