या बाईमुळे पोलिओ, स्वाईन फ्लू ते कोरोनाची लस शोधणं सोप्प जातं

इतिहासात अशी अनेक माणस आहेत ज्यांनी आपल्या कामातून अजरामर होऊन जगाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

मग तो टेलिफोनचा शोध लावणारा ग्रॅहम बेल असेल किंवा लाईटचा शोध लावणारा एडिसन असेल किंवा विमानाचा शोध लावणारे राईट बंधू असतील या सर्वांनी जगाला अशा गोष्टी दिल्यात ज्यांना मरण नाही. ज्यांच्यामुळे जगाचा उद्धारच झालाय.

ही गोष्ट अशाच एका बाईची.

ही बाई वैज्ञानिक नव्हती का शास्त्रज्ञ नव्हती. साधी शिक्षणाची सुविधा देखील तिला मिळालेली नव्हती, पण आज जे जीवघेणे आजार येतात ते दूर करायचे असतील तर आजही तिची मदत घ्यावी लागते.

विशेष म्हणजे या जगातून ती कधीच गेली. पण जाता जाता ती अशी गोष्ट करुन गेली की ज्यामुळे आपण तिचे उपकार विसरू शकत नाही.

ही गोष्ट आहे ‘हेनरिटा लॅक्स’ या ७० वर्षांपूर्वीच मेलेल्या एका अमेरिकन कृष्णवर्णीय महिलेची.

या गुलाम असलेल्या महिलेमुळेच आज असाध्य रोगांवर उपचार शोधण्यास मदत होत आहे.

५ लहान मुलांची आई असलेली हेनरिटा एके दिवशी योनीतून रक्तप्रवाह होत असल्याने ‘द जॉन्स हॉपकिन्स’ दवाखान्यात दाखल झाली.

हेनरिटा ही एक गुलाम असलेली अमेरिकन महिला होती. त्याकाळी गुलाम असलेल्यांचा फक्त जॉन हॉपकिन्स दवाखान्यातच इलाज केला जाई.

तिथे तपासणी नंतर अस लक्षात आल की,

तिला गर्भाशयाचा कॅन्सर आहे. आणि तिथे मोठी गाठ आलेली आहे.

हेनरिटावर लगेच रेडीअम उपचार सुरु करण्यात आले. त्याकाळी कॅन्सर सारख्या रोगावर हे बेस्ट उपचार होते. तिच्या कॅन्सर पेशींचा अभ्यास करण्यासाठी त्या डॉ.जॉर्ज गे च्या लॅब मधे पाठवण्यात आल्या.

डॉ. जॉर्ज अनेक वर्षांपासून हॉपकिन्स दवाखान्यातील कॅन्सर पेशंटचे सेल्स जमा करायचे. त्यावर ते अभ्यास करायचे. काही काळानंतर जवळपास सगळ्या पेशंटचे सेल्स नष्ट व्हायचे पण,

हेनरिटाच्या सेल्सचा अभ्यास करताना त्यांना कळाल की, 

तिचे सेल्स म्हणजे पेशी नष्ट न होता दर २०-२४ तासाला चौपट वेगाने वाढत होते. याचाच अर्थ असा कि दुर्दैवाने हेनरिटाच्या शरीरातील कॅन्सर पेशी/सेल्स पण दुपटीने वाढत होत्या.

या सगळ्याचा जो व्हायचा तो परिणाम झालाच आणि ४ ऑक्टोबर १९५१ ला वयाच्या ३१ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.

‘हेनरिटा लॅक्स’ ला अजिबात माहिती नव्हत की तिच्या नकळत ती जगाला कोणतं वरदान देऊन जातीय.

डॉ.जॉर्ज गे यांनी पेशींच जिवंत असण आणि त्यांची एक साखळी तयार होणं याचे कारण शोधण्यासाठी या पेशी/सेल्स जगभरातल्या डॉक्टरांना पाठवल्या. या तयार झालेल्या सेल्सला हेनरिटा च नाव देण्यात आल.

त्यांना आज ‘हेला सेल्स’ म्हणून ओळखलं जातं.

आजपर्यंत या हेलासेल्स नष्ट झालेल्या नाहीत. अगोदर एखाद्या गोष्टीवर उपचार शोधायचे म्हणल्यास सुरुवातीला त्याचे प्रयोग प्राण्यांवर केले जायचे. मग पुढचा भाग म्हणून त्या औषधाची अचूकता तपासण्यासाठी एखाद्या माणसावर त्याचा प्रयोग केला जाई पण मानवाच्या जिवंत सेल्समुळे म्हणजेच हेलासेल्स मुळे हे काम खूपच सोपं झाल.

या सेल्समुळेच पोलिओ सारख्या रोगावर तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी करता आली.

Screenshot 2020 03 14 at 2.16.26 PM

या सेल्स जगभरातील डॉक्टरांकडे पाठवल्यास डॉ. जोनस साक ने या पेशींवर प्रयोग करून बघितला. त्याची ही लस हेलासेल्स वर असलेल्या पोलिओच्या विषाणूंना नष्ट होती. अशा प्रकारे १९५२ मधे पोलिओची लस शोधण्यात आली. हे हेलासेल्सच सर्वात मोठ यश होत.

अशाच एका शास्त्रज्ञाला हेलासेल्स वर प्रयोग करताना एक लिक्विड सापडलं.

ज्यामुळे मानवी गुणसूत्रे स्पष्टपणे बघता येऊ लागली. यावरूनच कळाल कि माणसाच्या शरीरात ४६ गुणसूत्रांच्या जोड्या असतात. इबोला, HIV-AIDS सारख्या असाध्य रोगांचा अभ्यास करण्यासाठी हेलासेल्स उपयोगात येतात.

हेलासेल्स या क्लोनिंग केलेल्या पहिल्या सेल्स आहेत. शिवाय माणसाच्या शरीरावर हार्मोन्स, ड्रग्स, विषाचा काय काय परिणाम होतो. हेलासेल्स मुळे हा परिणाम माहित करून घेणे सोपं झालय.

बाकी ‘हेनरिटा लॅक्स’ बद्दल एकाच वाटत की,

सगळ्या माणसांच आयुष्य सोपं करण्यासाठीच त्या महिलेने जन्म घेतला होता.  एका स्त्रीमुळेच आज मानवी आरोग्याच्या समस्या ओळखून दूर करण्यात यश आलय.

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.