हा आयरिश म्हातारा भारताचा ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय.

वय वर्ष ७० वर्ष. जन्म इंग्लडचा. ओळख पर्यावरणतज्ञ. त्यांच नाव कैरोन रॉन्सले. गेल्या पाच वर्षांपासून ते भारतात आहे. गेली पाच वर्ष ते काय करतायत तर राजस्थानमधील नैसर्गिक जलस्त्रोत असणाऱ्या बावडी, विहीरी, नाले साफ करत आहे. ते देखील एकट्याच्या हिंम्मतीवर. 

केरोन रॉन्सले यांच भारतासोबत असलेले नातं म्हणजे त्यांचे आजोबा भारतीय रेल्वेमध्ये चीफ इंजिनियर होते. भारत स्वतंत्र झाला आणि त्यांचे आजोबा इंग्लडला परतलेले. आयरिष असणारे कैरोन रॉन्सेल यांच्यावर त्यांच्या आजोबांचा मोठा प्रभाव होता. आजोबांकडून भारताबद्दल अनेक गोष्टी ऐकल्यानेच भारत-पाकिस्तान-बांग्लादेश अशा देशांमध्ये फिरण्यासाठी जावं अस त्यांना वाटतं होतं.

त्यातूनच १९९८ साली पाकिस्तानला गेले.

पाकिस्तानमध्येच राहून लहान मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला. कराची मध्ये त्यांनी मुकबधीर मुलांना शिकवण्यास सुरवात केली.  त्याचसोबत कराची शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये मुलांना आधुनिक शिक्षण देण्यावर त्यांनी जोर दिला. या गोष्टी करत असताना मुलांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी म्हणून शिकवण्यास जाणाऱ्या प्रत्येक शाळेत ते “रोप” लावण्याचा कार्यक्रम हाती घेत. 

मात्र हे सर्व करत असताना मात्र पाकिस्तान कडून त्यांना वाईट अनुभव आल्याचं ते सांगतात. पाकिस्तानमधून त्यांना बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या. अशा वेळी ब्रिटीश दूतावासाने देखील त्यांची मदत केली नाही. ते सांगतात की पाकिस्तानमधून अशा प्रकारे बाहेर पडणे हतबलता होती.  

काही काळ इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर ते २००४ मध्ये ते भारतात आले.

भारतीय संस्कृती, पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी भारत भ्रमण करण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात बेअरफूट कॉलेजमध्ये रेन वॉटर हॉर्वेस्टिंगच्या संदर्भातून त्यांनी अभ्यास करण्यास सुरवात केली. या दरम्यानच त्यांना जोधपूर परिसरातील ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या बावड्या पाहता आल्या. 

बावड्या म्हणजे राजस्थानमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक विहीरी.

झालरास व बावड्या या राजस्थानच्या ऐतिहासिक वारसा समजला जातो. चारी बाजूंनी पायऱ्या असणाऱ्या या विहीरी नैसर्गित जलस्त्रोतसाठी उपयोगी ठरत आल्याच आहेत पण वास्तुकलेचा देखील त्या अजोड नमुना समजल्या जातात. 

राजस्थान भागात बोअरवेल, सिंचनाच्या सुविधा वाढत गेल्यानंतर ऐतिहासिक बावड्यांच्या महत्व कमी होत गेलं. पाण्यासाठी वापर कमी झाल्यानंतर बऱ्याच बावड्याची दुर्देशा होत गेली. दारू, जूगारच्या अड्यांसोबत प्रातविर्धीसाठी या ऐतिहासिक बावड्या वापरल्या जावू लागल्या. 

या बावड्यांचा अशा प्रकारे होणारा वापर पाहून आयरीश केरोन रॉन्सले यांना प्रचंड वाईट वाटलं. त्यांनीच पुढाकार घेवून या बावड्यांना गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरवातीला स्थानिक नगर व ग्रामपंचायतींना संपर्क साधून त्यांनी सफाईसाठी कार्यकर्ते मिळवण्याचा प्रयत्न केला. पण या कामासाठी माणसं लावण्याबद्दल प्रशासनाने हात झटकले. त्यानंतर आवाहन करुन लोकांना या कामात  बोलवण्यास सुरवात केली. उत्साहात येणारे लोकं बावड्याची दुर्देशा पाहून कमी होवू लागले. मलमुत्रांनी पुर्णपणे वाईट अवस्था झालेल्या बावड्या साफ करण्यास कोणीच धजावत नव्हते. 

अशा वेळी मेहनारनगढ म्युझियन ट्रस्टने त्यांचे परिश्रम पाहून पाच ते सहा कर्मचारी व सफाईसाठी इतर साहित्य देण्याची सोय केली. अवघ्या काही दिवसातच त्यांचे काम पाहून परिसरातून त्यांना मदत येवू लागली. टॅक्टरमार्फत कचरा उचलला जावू लागला,

एक एक करत ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या राम बावडी, क्रिया झालरा, गोविंदा बावडी. चंडपोल बावडी, महामंदिर बावडी, महिला बागझालरा, तापी बावडी, गुलाब सागर अशा बावड्या साफ केल्या. राजस्थामधल्या सर्व बावड्या साफ करून येणाऱ्या पिढ्यांना त्यांच ऐतिहासिक महत्व देखील समजून सांगण्याच काम ते करत आहेत. 

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Dr Avinash Patil ,jalgaon jamod says

    Good article.

  2. Dr Avinash Patil jalgaon jamod. says

    Good article,

Leave A Reply

Your email address will not be published.