तुम्हाला-आम्हालाच नाही एंजल प्रियाने शाहीद आफ्रिदीलाही गंडवलं होतं…

एक जमाना होता जेव्हा फेसबुकवर पोरांच्या डीपीला इम्रान हाश्मी, सलमान खान यांचेच फोटो असायचे. मुलींच्या डीपीची जबाबदारी जेनेलिया वैनी, ऐश्वर्या राय यांनी सांभाळलेली असायची. या अकाउंट मागचा चेहरा कुणाचा याच्याशी पोरांना काही देणंघेणं नसायचं. गुड मॉर्निंग, जे1 झालं का?, या डीपीमध्ये तू आहेस का?, कुठे राहतेस? रिप्लाय दे ना. इथून किती लव्हस्टोऱ्या सुरू झाल्या आणि किती व्हायच्या राहिल्या याची गिणतीच नाही.

या सगळ्या राड्यात आणखी एक फेसबुक अकाउंट हिट झालेलं होतं, ते म्हणजे एंजल प्रिया. प्रत्येकाच्या लिस्टीत एक तरी एंजल प्रिया असायची आणि तिचा रिप्लाय येऊ किंवा न येऊ आपला ‘Hii’ तिच्या मेसेज बॉक्समध्ये पडलेला असायचाच.

आता एंजल प्रिया खऱ्या की खोट्या, याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा. कुणी फोटो पाहिले, कुणी आवाज ऐकला तर कुणी फजिती करुन घेतली. ज्यांचं भांडं फुटलं, त्यांचा पोरांनी लई बाजार उठवला. आता तुम्हाला वाटलं असेल की, एंजल प्रियामुळं फक्त तुमच्याच चौकातली पोरंच गंडली… तर थोडं थांबा. एक लय वाढीव किस्सा आहे.

तुम्हाला शाहीद आफ्रिदी आठवतो का? विसरणंच शक्य नाही म्हणा. आपल्या भारतीय टीमच्या तोंडातला विजयाचा घास आफ्रिदीनं लय वेळा हिरावून घेतला. भारत-पाकिस्तान मॅच सुरू असताना आफ्रिदी क्रीझवर असला की टेन्शननी आपला जीवच अर्धा व्हायचा. गंभीर, विराट, सेहवाग या प्लेअर्ससोबत त्याचे अनेकदा राडे झाले. त्यानं रिटायरमेंट परत घेण्यावरुन पण त्याला अनेकांनी ट्रोल केलं.

पण एक गोष्ट मात्र खरी, आफ्रिदी प्लेअर म्हणून डेंजर होता. शेवटच्या बॉलवर सहा रन्स जिंकायला हवे असले, तरी आफ्रिदी सिक्स मारु शकणार याची गॅरंटी असायची. त्याच्यात सिक्स मारायची ताकद इतकी होती की, गड्यानं सहा बॉल सिक्स मारायलाही कमी केलं नसतं. त्याला बूम बूम आफ्रिदी हे नाव उगाच नव्हतं पडलं.

आता आफ्रिदी ग्राउंडवर कितीही डेंजर असला, तरी ग्राऊंडच्या बाहेर तो साधा माणूस. त्यालाही भावना आहेत, तो पण प्रेमात पडतोय आणि मातीही खातोय. हा माती खाण्याचा किस्सा स्वतः आफ्रिदीनंच आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे.

पुढची स्टोरी तुम्हाला आफ्रिदीच्या भाषेतच सांगायला हवी…

”माझं लग्न व्हायच्या आधीचा किस्सा आहे. तेव्हा मोबाईल फोन नवीन नवीनच आले होते. फोनवर बोलायचं म्हणलं, की लई पैसे खर्च व्हायचे. त्याकाळात मी एका पोरीशी फोनवर बोलायचो. तिचा आवाज खरंच लय गोड होता. तो गोड आवाज ऐकायला मी मॉप पैसा उधळला. दिवस-रात्र मी तिच्याशी फोनवर बोलायचो. मग एक दिवस आम्ही भेटायचं ठरवलं.”

भावांनो आणि बहिणींनो इमॅजिन करा, ज्या व्यक्तीशी तुम्ही इतके दिवस फक्त फोनवर बोलताय. ज्या व्यक्तीच्या आवाजानं तुम्हाला येड लावलंय, त्या व्यक्तीला भेटायचं म्हणजे काय साधी गोष्ट नाय. लाला आफ्रिदी शंभर टक्के आतुर असणार.

अखेर तो दिवस आला. त्या गोड आवाजामागचा चेहरा पाहण्याची आफ्रिदी वाट पाहत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली, आफ्रिदी आवरुन सावरुन दार उघडायला गेला आणि त्याच्या बत्त्या डीम झाल्या…

कारण दारात उभं होतं हातात गुलाब घेतलेलं एक पोरगं. तेव्हा आफ्रिदीला समजलं की, आपण एवढे पैसे घालवून, एवढ्या रात्री वाया घालवून जो आवाज ऐकत होतो, ती पोरगी नव्हतीच.. तो होता पोरगा.

आफ्रिदीच्या भावनांचा पार कचरा झाला, हृदयाचे हजार तुकडे झाले. त्या दिवसापासून आफ्रिदीनं फोनवर बोलण्याचा नाद धरला नसेल. आयुष्यात तो शून्यावर आऊट झालेला विसरेल, पण या फोनवरच्या आवाजानं केलेला विषय लालाच्या लक्षात कायम राहील.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.