फुकट डाऊनलोड करत असाल तर २ लाखांपर्यंतचा दंड भरण्याची “पंचायत” येवू शकते

आज ट्विटरवर #panchayat2 फुल ट्रेंडिंगवर आहे. पंचायत या लोकप्रिय सीरिजचा दुसरा सीझन रिलीज झाला आहे, हे कारण तर आहेच मात्र तो वेळेआधीच रिलीज झाला आहे, हे महत्वाचं कारण आहे.

अभिनेता जितेंद्र कुमार स्टारर या सीरिजच्या पहिल्या सिजनला भरभरून प्रेम मिळालं होतं. म्हणूनच दुसऱ्या सिजनची सगळेच वाट बघत होते. 

दुसरा सीझन २० मे ला येणार होता. पण तो कालच १८ मे ला रिलीज करण्यात आलाय. 

प्रेक्षकांना सरप्राईज वगैरे हे काही त्यामागचं कारण नाहीये. तर निर्मात्यांकडे काही पर्यायच नव्हता. ॲमेझॉन प्राइमवर येण्याआधीच ही सिरीज टेलिग्रामवर रिलीज झाली होती. म्हणून नाईलाजास्तव नुकसान टाळण्यासाठी निर्मात्यांना दोन दिवसांपूर्वी ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

तेव्हा सिरीज किंवा चित्रपटाच्या अशा पायरेटेड फॉर्म्सचा OTT वर, त्यांच्या कमाईवर काय परिणाम होतो? आणि काय कायदे त्यामागे आहेत? हे बघूया… 

सगळ्यात पहिले पायरेटेड काय असतं? हे जाणून घेऊ…

एखाद्या व्यक्तीने त्याचा टाइम, नॉलेज किंवा स्किल वापरून काही तरी बनवलं आहे, मुव्ही, सिरीज काहीही आणि ते जर तुम्ही डाउनलोड करून बघत आहात, त्याचे पैसे न देता तर त्याला पायरसी कन्टेन्ट म्हणतात. याच्या अनेक वेबसाईट्स अव्हेलेबल असतात, अनेक तुम्हाला माहित असेलच मात्र तरी सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे टेलिग्राम. 

कोणताही चित्रपट, सिरीज यावर फ्री तुम्हाला मिळत असते. मात्र जेव्हा आपण असे कन्टेन्ट डाउनलोड करून बघतो तेव्हा ते बनवणाऱ्या व्यक्तीच्या, त्या कन्टेन्टच्या बिजनेसला, कमाईला खूप मोठा फटका बसत असतो. आता अल्मोस्ट सगळे चित्रपट, सिरीज OTT प्लँटफॉर्मवर रिलीज होतात. तेव्हा अशा पायरसी कन्टेन्टचा थेट परिणाम OTT वर होतोय…

२०२१ च्या एका सर्वेनुसार यामुळे OTT चा वार्षिक ३०% रेव्हेन्यू कमी होत आहे. 

सोनीलिव्ह ॲपवरील ‘स्कॅम १९९२’ आणि एमएक्स प्लेअरवरील ‘आश्रम’ यासारखे लोकप्रिय शो लाँच झाल्यानंतर दीड तासातच लीक झाले होते. टेलिग्राम आणि पॉपकॉर्न टाइम सारख्या ॲप्सच्या माध्यमातून युजर्स टोरंट इकोसिस्टमचा फायदा घेत आहेत. ज्यामुळे आताच कुठे देशात उभारणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा व्यवसाय दोन पावलं मागे असल्याचं सर्वेचं म्हणणं आहे. 

कसं?

एक म्हणजे या समस्येमुळे OTT ला त्यांचे संभाव्य ग्राहक जे सब्स्क्रिप्शन घेऊ शकतात ते गमावण्याचा धोका असतो. तर बऱ्याच वेळा, जे ऑलरेडी युजर्स आहेत ते पायरेटेड मिळत असेल तर सब्स्क्रिप्शन न घेण्यास सुरुवात करण्याची शक्यता जास्त असते. फुकटात मिळणाऱ्या गोष्टीला पैसे का द्यायचे, हे आपण म्हणतो ना, तसंच. OTT चा कमाईचा मार्गच सब्स्क्रिप्शन असतो आणि नेमकं यावर पायरसी घाव घालतो. 

उदाहरणार्थ सोनीलिव्हवरील ‘स्कॅम १९९२’.

या सिरीजचा किमान एक एपिसोड भारतातल्या २३ मिलियन लोकांनी आधीच पाहिला असावा, असा अंदाज ऑर्मॅक्स मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश कपूर यांनी डिसेंबरच्या ब्लॉगमध्ये दिला आहे. आणि तेव्हा सोनीलिव्हचे २ मिलियन स्बस्क्राइबर्स होते. म्हणजे २१ मिलियन बेहिशेबी-प्रेक्षक आहेत, असं स्पष्ट झालं. 

लॉकडाऊनच्या काळात तर ही पायरसीची समस्या झपाट्याने वाढली आहे. 

पण हे लीक नक्की होतात कसे? 

याला दोन कारणे आहेत.. 

एक म्हणजे हॅकिंग. ही सध्या खूप सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक वेळा या OTT प्लॅटफॉर्मवरील कुकीज आणि बॉट्सचाही वापर सिस्टिम हॅक करण्यासाठी केला जातो. याने कन्टेन्ट तर जातोच मात्र बऱ्याचदा वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका असतो. 

तर दुसरं कारण आहे प्रमोशन.

प्रमोशनच्या वेळी चित्रपट किंवा सिरीज यांची कॉपी अनेकदा काही कॉर्पोरेट ठिकाणी पाठवल्या जाते, तेव्हा ते लीक होण्याची भीती असतेच. 

आता याच्याशी आपल्याला काय करायचं? आपल्याला कन्टेन्ट फ्री मिळतोय ना बस. असं म्हणत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, ते इल्लिगल, बेकायदेशीर आहे. आणि त्यासाठी शिक्षा देखील होऊ शकते. 

कुणाचंही ज्ञान, श्रम असं फुकटात घेणं कायद्यानुसार इल्लिगल आहे. म्हणून तसं करणारा प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार असतो. भारतासह अनेक देशांमध्ये पायरसीला बेकायदेशीर मानलं गेलंय. भारतात मुव्हीज, सिरीज डाउनलोड करून बघणं लीगल आहे का इल्लिगल हे copyright protection and infringement law अंतर्गत येतं. 

कॉपीराइट ॲक्ट १९५७ कलम ६३ नुसार अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना सहा महिने ते तीन वर्षे तुरुंगवास किंवा ५०,००० ते २ लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. 

शिवाय ही शिक्षा केवळ अशा प्रकारची वेबसाइट तयार करणाऱ्यांनाच नाही, तर या पायरेटेड साइट्सवरून सिनेमे डाऊनलोड करणाऱ्यांसाठी देखील आहे. म्हणजे तुम्ही पायरेटेड कन्टेन्ट वापरतायेत असं समजलं तर तुम्हालाही जेलवारी होऊ शकते. 

याच लॉ अंतर्गत नेहमी पायरेटेड वेबसाईट्स, ॲप बॅन होत असतात. 

शिवाय गुगल प्ले स्टोरचा देखील रुल आहे की, जे ॲप पायरसी कन्टेन्ट प्रमोट करतात ते प्ले स्टोर राहू शकत नाही. 

मग आता प्रश्न राहतो की, जर हे इल्लिगल आहे तर टेलिग्राम प्ले स्टोरवर कसकाय आहे? त्यावर पायरसी खुलेआम सुरु असताना कार्यवाही का होत नाही? 

याचं कारण म्हणजे टेलिग्रामची मेसेजिंग सिस्टीम. टेलिग्राम हे खरंतर मेसेजिंग ॲप आहे. म्हणून ते स्पष्ट करतं की, एन्ड टू एन्ड इन्स्क्रिप्सशनमुळे मेसेजेस हे पाठवणारा आणि रिसिव्ह करणाऱ्यामध्येच राहतात. म्हणून आम्हाला माहित नाही की, आमचे युजर्स मेसेजिंगमधून काय पाठवतात. या एका स्टेटमेंटमुळे टेलिग्राम वाचतं. 

अशावेळी OTT प्लॅटफॉर्म्स किंवा सिरीज बनवणारे निर्माते पुढे येऊन एक कंपनी हायर करतात जी टेलिग्रामवर असा कन्टेन्ट आला असेल तर त्यावर नियंत्रण करण्याचं काम करतात. म्हणून अनेकदा त्या सिरीज किंवा मुव्हीच्या लिंक काही वेळात, जवळपास २४ तासात तिथून हटवला जातात. काल ज्या लिंकवर सिरीज असते आज ती लिंक एक्सपायर दिसण्याचं हेच कारण असतं. 

असं असलं तरी याने OTT प्लॅटफॉर्मला फटका बसतोच आहे. आणि शिवाय त्या कलाकारांना देखील तोटा होतोय. म्हणून कुणाच्याही कलेचा फुकट आनंद घेताना आपण जागरूक प्रेक्षक म्हणून विचार करणं गरजेचं आहे. आणि इल्लिगल गोष्ट तर ही आहेच म्हणून स्वतःला गुन्हेगार होण्यापासून टाळणं देखील महत्वाचं आहे. 

पंचायत सीरिजल बघून जसं त्याला प्रोत्साहन देणं, प्रेम देणं गरजेचं आहे तेवढंच त्यातील कलाकार आणि त्यांच्या टीमच्या एफर्ट्सला रिस्पेक्ट देणंही आवश्यक आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आणि पंचायत सिरीजबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा… 

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.