इथे आहेत ‘फेक न्यूज’ ओळखण्याचे खरेखुरे उपाय.

सातफनी नाग, बोलणारा मासा, पुस्तक वाचणारं माकड यांनी कधी तुमचा पोपट केलं आहे का ?

एखादी बातमी whatsapp वर पाठवल्यावर ग्रुप च्या स्वयंघोषित बुद्धीवंताने त्या बातमीचे खरे फॅक्ट सांगून चारचौघात तुम्हाला खोटे पडले आहे का ?

गुड मॉर्निंग सोबत येणारे महान व्यक्तींचे सुविचार, झटकन श्रीमंत व्हायचे ७ उपाय, इतिहासाच्या नावा खाली फिल्मी स्टोऱ्या , निवडणुकीच्या आधी प्रचारासाठी दाखवण्यात येणारा विकास असल्या सगळ्या मेसेज वर विश्वास ठेवायचा मोह तुम्हाला ही आवरत नाही का ?

अहो मोठे मोठे मंत्री या रोगाचा शिकार झाले आहेत तर त्यापुढे तुम्ही आम्ही काय चीज आहात. तर आम्ही घेऊन आलो आहोत काही उपाय. त्याचं वापर करा आणि कॉलर ताठ करून आपल्या ग्रुप मध्ये  फॅक्टस  मांडा. आणि लोकांच्या कौतुकाचा भाग बना.

१.कॉमन सेन्स-

अतिशय अनकॉमन अशी ही गोष्ट आहे हे मान्य, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ? आम्ही मदत करतो. सर्वप्रथम बातमीचा स्त्रोत तपासा. ती बातमी नवीन आहे की जुनी ? ती बातमी खऱ्या वेबसाईट वरून अाली आहे की खोट्या ? थोडसं लॉजिक जरी वापरलं तरी फेक न्यूज लगेच सापडतात. बऱ्याचदा अशा फेक न्यूज मध्ये स्पेलिंग मध्ये चुका असतात.जुन्या तारखा असतात. यावरून पण आपण एका नजरेत खोटी बातमी पकडू शकतो. रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचून सुद्धा आपला फेक न्यूज ओळखायचा कॉमन सेन्स तयार होऊ शकतो.

२.गुगल –

आपल्याला एखाद्या गोष्टीची शहानिशा करायची आहे त्या पूर्वी सगळ्यात बेसिक करायचे काम. म्हणजे गुगल. तिथे शोधल्यावर तुमच्यासमोर त्या गोष्टीचे हजारो लिंक्स दिसतील.त्यातूनही कोणत्याही धार्मिक संघटनेला, पक्षाला, जातीयवादी विचारांना वाहून घेतलेल्या साईट दिसतील तर त्या वर क्लिक करायचा मोह आवरा आणि कोणत्याही एखाद्या सुप्रसिद्ध वर्तमानपत्राच्या वेबसाईट वर तुम्हाला खरी बातमी मिळू शकते. गुगल हे दुधारी तलवार आहे तिथे तुम्हाला फसवायला अनेक खोट्या किंवा प्रपोगंडा पसरवणाऱ्या वेबसाईट आढळतील त्यांच्या पासून दूर राहा.

हे ही वाचा-  

३.विकिपीडिया-

जगातला सगळ्यात मोठा माहितीचा स्त्रोत. येथे कुठल्याही प्रकारची माहिती, इतिहास, सद्यस्थिती सापडू शकते. मात्र येथेही १०० टक्के खरी माहिती मिळेल असे नाही कारण विकिपीडियाची माहितीत बदल करणे हे खुले ठेवले असल्यामुळे आपण सुद्धा यात बदल करू शकतो. आज काल अनेक सायबर योद्धे तेथील माहिती सुद्धा बदलत असतात. त्यामुळे विकिपीडिया वरून मिळालेली माहिती दोन वेळा पडताळून पहा.

४.सरकारी वेबसाईट-

आजकाल यांच्या विश्वासार्हते वर प्रश्नचिन्ह उठत आहेत मात्र तरीही इथे जबाबदारीने सल्ला देऊ इच्छितो की सरकारी वेबसाईट वरील माहिती बहुतांशी खरी असते.कोणत्याही माहितीची अधिकृत आकडेवारी हवी आहे तर सरकारी वेबसाईट वर तुम्हाला सहज मिळून जाईल. सरकारी न्युज चॅनेल वरच्या बातम्या खऱ्या असण्याचे चान्सेस जास्त असतात. फक्त तुम्हाला एकच खबरदारी घ्यायची आहे की ती वेबसाईट खरोखर सरकारची आहे का ते चेक करणे. यासाठी सोपा कानमंत्र सांगतो. वेबसाईटचे डोमेन नेम चेक करा. म्हणजे वेबसाईटच्या शेवटी “.com” असते ना तिथे सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर “gov.in” असते. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट चा पत्ता “maharashtra.gov.in” असा आहे. हे सोडून काही सरकारी संस्था “.org.in” अथवा “.ac.in” हे डोमेन वापरतात. हे सोडून इतर सर्व साईट फेक आहेत हे ओळखावे.

५.माहितीचा अधिकार –

जर सरकारी वेबसाईट माहिती मिळाली नाही तर तुम्ही माहितीचा अधिकार वापरू शकता. २००५ च्या या  कायद्यामुळे भ्रष्टाचाराविरूद्धचे मोठे शस्त्रच जनतेला मिळालेले आहे. सरकारी ऑफिस, सार्वजनिक संस्था, शासकीय अनुदान मिळणाऱ्या संस्था यानं माहितीच्या अधिकाराचे पालन करणे बंधनकारक आहे.थोडासा शहाणपणा आणि रिस्पोन्सिब्लीटी दाखवली तर कोणतीही माहिती आपण मिळवू शकतो.अतिशय सोपी प्रक्रिया आहे फक्त नाममात्र फी द्यावी लागते. त्यासाठी सरकारी ऑफिस मध्येच जायची गरज नाही.आरटीआय च्या वेब  पोर्टल वर  rtionline.gov.in याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता.

६. फेक न्यूज चा पर्दाफाश करणाऱ्या वेबसाईट – 

फेक न्यूज ला उघडे पडणे या एकमात्र उद्देशाने काही वेबसाईट काम करत आहेत. तेथे तुम्हाला विनासायास खोट्या बातमीच्या पाठीमागचे सत्य कळू शकेल. या वेबसाईट मध्ये तज्ञ लोकांची टीम खोट्या बातम्यांचे संशोधन करते. त्यांच्या रोजच्या बातम्या सोडून आपल्याला एखाद्या बातमीची वैधता तपासून हवी असेल तर तेही काम ही टीम करते. फक्त त्यांना ती बातमी पाठवायची मग खरी माहिती त्याच्या स्त्रोता सकट आपल्या पर्यंत पोहचवली जाते.  ALT NEWS, HOEX Slayer असे काही फेसबुक पेजेस हेच काम करत आहेत. त्यातही ALT NEWS या कामात अग्रगण्य मानली जाते. ही वेबसाईट हिंदी आणि इंग्लिश मध्ये काम करते. मराठी मध्ये अशा माध्यमांची कमतरता जाणवत आहे.

हो आम्हाला मान्य आहे की बातमीचं खरेपणा तपासण्यामागे कष्ट आहे आणि माहिती न तपासता पुढे ढकलणे सोपे आहे. पण आज आपलं देश फेक बातम्यांचे खूप दुष्परिणाम भोगत आहे.बरोबर दंगली पेटवणे, सामाजिक सलोखा नष्ट करणे, एखाद्या नेत्याचे चारित्र्यहनन करणे अशा गोष्टीसाठी काही समाजकंटक लोक फेक न्यूजचा आधार घेत असतात. आपल्याला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देवाने डोके दिले आहे त्याचा जबाबदारीने वापर करा. कोणतीही पोस्ट शेअर करण्यापूर्वी त्याची वैधता चेक करा. चांगली सवय आहे हो ही.

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.