इनबॉक्सात जाऊन ‘जे1 झालं का?’ हे विचारण्यापेक्षा या इफेक्टिव्ह टिप्स वापरुन बघ भिडू…

माझा एक शाळकरी मित्र आहे. पोरगं शाळेत असताना लय शामळू होतं. पोरींशी बोलायला भावाची हातभर फाटायची, त्यामुळे भाऊ आयुष्यात अरेंज मॅरेज करणार अशी आम्हाला गॅरंटी होती. याच्या तोंडून आम्ही लई पोरींची नावं ऐकली होती. पण त्यादिवशी एका पोरीच्या तोंडून भाऊचं नाव ऐकून आम्ही बधीर झालो.

पण विषय वेगळाच निघाला, आमच्या भावानं तिला पाच-सहा मेसेज केले होते. Hiiiii, Gd Mrng Dear, जे1 झाले का? सगळे या टाईपचे. आता अर्थात पोरगीनं एकाही मेसेजला रिप्लाय दिला नव्हता. उलट तिनं ‘हा बघा गुळपाड्या’ असला मेसेज स्क्रीनशॉटसकट तिच्या ‘गर्ल्स कट्टा’ या ग्रुपवर पाठवला होता. त्या ग्रुपवर आमच्या एका मित्राचा खडा होता. वैनींनी आम्हाला हे पाठवलं आणि आमची अब्रूच निघाली.

पण आपला माणूस म्हणल्यावर त्याला समजवणं आपलंच काम आहे. त्याला दिलेल्या टिप्स खुल्या दिल्यानं तुम्हाला सांगतोय. कारण, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं! आणि प्रेम करायला बोलावं लागतंय आणि बोलायला इनबॉक्सात जावं लागतं. तिथं दमदार एंट्री कशी करायची, रिप्लाय कसा मिळवायचा याच्याच या टिप्स. 

टिप क्रमांक एक-

पहिला मेसेज एकदम निवांतवाला टाकायचा. Hii, Wassup, Nice pic असले मेसेज पाठवायचे नाहीत. शायरी वैगेरे तर चुकूनही नाही. पहिला मेसेज हे तुमचं पहिलं इम्प्रेशन असतंय. त्यामुळे ते दमदार पडलं पाहिजे. भले कितीही दिवस लागू द्या, पण पहिला मेसेज योग्यच जाऊ द्या. 

मग तो मेसेज पाठवायचा कसा?

त्यासाठी सादर आहे टिप क्रमांक दोन-

एकतर ओळख नसताना मेसेज करायचा नाहीच. करायचा झाला तर स्टोरीला रिप्लाय द्यायचा. तो रिप्लाय म्हणजे कुठला स्माईली नाही, तर एखादा शब्द असला पाहिजे. असा मेसेज ज्यानं बोलणं स्टार्ट व्हायला हवं. तिनं तुम्हाला प्रश्न विचारायला हवेत, मग प्रश्नोतराच्या तासातून गुलाबी इतिहास घडायला सुरुवात होत असती.

टीप क्रमांक तीन- (गुळपाड्यांसाठी खास)

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप कुठंही एखाद्या सुंदर पोरीनं सुंदर फोटो टाकला, तर तिला ‘तू सुंदर दिसतीये’ असं सांगणाऱ्या किमान १५० कमेंट्स आणि २०० मेसेज आलेले असतात. त्यात आपली अगरबत्ती लावायला कधीच जायचं नाही. तुम्ही जितका गूळ पाडणार, तितकी मार्केट व्हॅल्यू डाऊन.. गुळाची नाय तुमची. त्यामुळं अगदी लईच माधुरी दीक्षित दिसत असेल.. तरी दोन दिवसांनी मेसेज करायचा. ”परवा भारी दिसत होतीस.. सांगायचं राहून गेलं.” आता त्यावेळी पोरगी खराब मूडमध्ये असेल, तर तिचं दिल दिल गार्डन गार्डन होणार.. तुम्हाला एक मार्क जास्त.

टीप क्रमांक चार-

 कायतर नवं करा. तिनं विचार केला पाहिजे की, याला सुचलं कसं. तुमच्या नावाची चर्चा झाली पाहिजे, असला मेसेज करा. मग तिचा रिप्लाय नाय आला, तरी तिच्या मैत्रिणीचा मेसेज येणार हे फिक्स. आता हे नवं काय हवं? तर एखादा हटके प्रश्न ज्यानं पोरगी हसेल, खुश होईल. जेवण तर ती आपण मेसेज नाय केला तरी करणारच आहे, त्यामुळे असा प्रश्न बघा ज्यानं उत्सुकता वाढेल आणि तुमची इज्जत पण.

टीप क्रमांक पाच-

स्वतहून मेसेजच करु नका. आता तुम्ही म्हणाल भावा मेसेज केलाच नाही, तर बोलणं सुरु कसं होणार? तर शेठ तिचा मेसेज आल्यावर. आता तो येणं काय सोपं नसतं. त्यासाठी लय कसरत करावी लागते. पहिलं म्हणजे आपलं अकाउंट एक नंबर पाहिजे. तुम्ही सतत क्वालिटी फोटो, स्टेट्स टाकले पाहिजे. कधीकधी बौद्धिकही लिहिलं पाहिजे. मग कधीतरी तुमच्या स्टोरीला एखादा बदाम येतो, पोस्टवर कमेंट पडते. मग रिप्लाय द्यायचा आणि तिथून मग सुरु होतात गुलाबी स्टोऱ्या.

जो स्वतःहून मेसेज करत नाय तोच खरा धडाकेबाज.          

 आता एवढ्या पाच ट्रिक वापरुनही तुम्हाला रिप्लाय आला नसेल, तर काही दिवस प्रयत्न करणं सोडा. चार पुस्तकं वाचा, चार शायऱ्या वाचा, रिअल लाईफ मैत्रिणींमध्ये मिसळा आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं अकाऊंट भारी ठेवा.

आता ही स्टोरी आम्ही काहीशा स्वानुभवानं लिहिली, तर काही पोरींकडून माहिती घेऊन. जिंदगीत कधीच कुठल्या पोरीला जबरदस्ती किंवा चुकीचा मेसेज पाठवू नका. आपली स्वतःची आब राखा. लय उपदेश देत नाय, कारण तुम्ही तेवढे हुशार असणार याची आम्हाला गॅरंटी आहे.

काय करु नका हे सांगणारं दोन शब्दांचं भाषण देऊन, आम्ही हा कार्यक्रम संपवतोय. हे भाषण आमच्या एका कार्यकर्तीनं दिलंय, त्यामुळे त्याचं महत्त्व ओळखा-

चुकून मेसेज आला, चुकून फोन लागला असल्या ट्रिका लय जुन्या झाल्या. त्या वापरु नका. इंग्लिश झाडणार असाल, तर स्पेलिंग नीट लिहा, नायतर थेट मराठीत बोला. तू माझ्या एक्स सारखी दिसतेस असला मेसेज पाठवणार असलात, तर मोबाईल जाळा (मग भावा एक्सलाच मेसेज कर. हा आमचा रिप्लाय ठरलेला असतोय.) माझ्या मित्र-मैत्रिणींच्या बड्डेला मला हॅप्पी बर्थडे मेसेज करुन काहीही साध्य होणार नाही. ही डीपीमध्ये तूच आहेस का? या प्रश्नाला उत्तर देणं आम्हाला जमत नाही. जरा डिसेन्सी बाळगा आणि प्रामाणिक आणि सभ्य प्रयत्न करणार असाल, तर प्रयत्न सुरू ठेवा.. यश नक्की मिळेल!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.