दिव्यांग लोकांसाठी या आयआयटीयन भिडूने स्वदेशी मोटर व्हीलचेअर बनवलीय…

भारतात टॅलेंटेड लोकांची कमी नाही याचा प्रत्यय आपल्याला बऱ्याच घटनांमध्ये दिसून येतो. प्रसिद्धीचा जास्त गाजावाजा न केवळ आपल्या कामावर फोकस करून काही मंडळी लोकांच्या सेवेसाठी खपत असतात. सामाजिक कार्य करताना लोकांचा विचार करून आणि दिव्यांग लोकांना येणाऱ्या अडचणी लक्ष्यात घेऊन एका भिडूने एक अप्रतिम शोध लावला आहे तो म्हणजे स्वदेशी मोटर व्हीलचेअर बनवली आहे.

देशभरात सध्या याच मोटर व्हीलचेअरची चर्चा सुरू आहे. दिव्यांग लोकांच्या अडचणींवर मात करण्यासाठी या व्हीलचेअरची निर्मिती करण्यात आली आहे.

IIT मद्रासमधून BTech चे शिक्षण घेतलेल्या स्वस्तिक सौरव दासने दिव्यांगांसाठी खास प्रकारची मोटर व्हीलचेअर तयार केली आहे,

ज्याच्या मदतीने ते इकडून तिकडे सहज जाऊ शकतात. 30 वर्षीय स्वस्तिक हा मूळचा ओडिशाचा असून तो सामाजिक बदलासाठी झटत आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अपंगांवर संशोधन केले आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देशभर फिरले. 5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी 2020 मध्ये त्यांच्या प्राध्यापक सुजाता श्रीनिवासन यांच्यासोबत स्टार्टअप सुरू केले आणि अपंगांसाठी निओबोल्टसारखी अप्रतिम मोटर व्हीलचेअर बनवली.

असा दावा केला जात आहे की अशा प्रकारची ही पहिली स्वदेशी मोटर चालवलेली व्हीलचेअर आहे, जी खडबडीत रस्त्यावरही धावण्यास सक्षम आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही व्हीलचेअर 25 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते.

25 किमी प्रतितास वेग असलेली ही व्हीलचेअर आतापर्यंत देशभरात 600 हून अधिक लोकांना विकली गेली आहे, ज्यामुळे स्वस्तिकने लाखोंची कमाई केली आहे. या क्रमाने, आता स्वस्तिक त्याच्या प्रोफेसर सुजाता यांच्यासोबत नवीन स्टार्टअप ‘निओमोशन’ अंतर्गत वैयक्तिकृत व्हीलचेअर देखील तयार करत आहे, जेणेकरून दिव्यांग त्यांच्या गरजेनुसार त्यांची व्हीलचेअर डिझाइन करू शकतील.

राष्ट्रीय पातळीवर या व्हीलचेअरची दखल घेतली गेली असून भारतभर ही स्वस्तिकने बनवलेली व्हीलचेअर कशी पोहचवली जाईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहे. केवळ 30 वर्षाच्या पोराने उदात्त दृष्टिकोन ठेवून ही व्हीलचेअर बनवून तीही पूर्णपणे स्वदेशी ही गोष्ट भारतासाठी अभिमानास्पद आहे. स्वस्तिक आणि त्याचे सहकारी सध्या ही स्वदेशी मोटर व्हीलचेअर देशभर विक्री करत आहे आणि त्याचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.

हे ही वाच भिडू :

Webtitle : IIT Student make Swadeshi motor wheelchair for handicap people

Leave A Reply

Your email address will not be published.