गौरवास्पद इतिहास असणाऱ्या भारतीय वायुसेनेची सुरूवात कधी, कुठं आणि कशी झाली…
भारतीय वायुसेनेला मोठा इतिहास आहे. तसंच आत्तापर्यतच्या १९६१, १९६५, १९७१. १९९९ चं कारगील युद्ध आणि सध्या केलेला सर्जीकल स्ट्राईक अशा अनेक लढायांमध्ये भारतीय वायूसेनेनं महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र भारतामध्ये वायू सेनेची सुरूवात कधी झाली? कुठून झाली?
तसंही तुम्ही म्हणाल आम्हाला विमानं नवी नाहीत कारण आमच्या पुराणामध्ये देव आणि राक्षस विमानामधून लढत होते. रावणानं सीतेला याच विमानात बसून लंकेला पळवून नेलं होतं. अजूनही कित्येक कथा आपण ऐकल्या.
अधिकृत रित्या जग म्हणत विमानाचा शोध राईट बंधूनी १९०३ साली लावला आणि जगातलं पहिलं विमान उडवलं. काही वर्षातच या विमानांचा वापर युद्धामध्ये देखील करण्यात येऊ लागला. प्रत्येक देशाचे स्वतःचे हवाईदल उभे राहू लागले.
आपल्या भारतीय वायूसेनेच्या विजयाचा त्याच्या कारकिर्दीच्या, आणि संघर्षाच्या इतिहास जाणून घेऊ..
भारतात खरी विमानं ब्रिटीशांच्या काळात बनवण्यात आली. 1913 ब्रिटीश एस.डी मेस्सी या अधिकाऱ्याने लखनऊ येथे विमानांचं प्रशिक्षण देण्यासाठी शाळा सुद्धा सुरू केली होती. त्यानंतर पहिल्या महायुद्धामध्ये भारताच्या इंद्रलाल राॅय या पहिल्या फायटरनं जर्मनीच्या हवाई अड्ड्य़ांना नेस्तनाबूत केलं होतं.
भारताचा पहिला हवाई फायटर म्हणून इंद्रजित राँयला ओळखलं जातं. यावेळेसच भारतात खऱ्या अर्थानं विमानाचा उदय होत होता.
१९१८ साली भारतातील काही ठिकाणी राॅयल एअर फोर्सची स्थापना करण्यात आली होती. मात्र ती पहिल्या महायुद्धासाठी आणि ब्रिटीशांसाठीच मर्यादित होती. मात्र भारताची स्वत:चं वायुसेना असावी यासाठी १९२७ भारतात जोर धरला गेला. त्यासाठी १९३० मध्ये विमानांच्या प्रशिक्षणासाठी लंडनला ६ कॅडेट पाठवण्यात आले. त्यांना ट्रेन करण्यात आले. तसंच भारतीय रेल्वेमधील काही तांत्रिक कामगारांना एकत्र करण्यात आलं.
८ ऑक्टोबर १९३२ साली भारताची स्वत:ची वायुसेना अस्तित्वात आली.
भारताची वायुसेना तयार तर झाली होती. मात्र ती जपणं आणि वाढवणं कठीण होतं. भारतीय वायुसेनेत जास्त भरणा हा ब्रिटीशांचाच होता. त्यामुळे पगाराच्या बाबतीत भारतीय कामगार आणि ब्रिटीश कामगारांमध्ये फरक केला जायचा. भारतीय अधिकाऱ्यांना अपमानाची वागणूक दिली जायची. त्यामुळे पाहिजे तेवढ्य़ा प्रमाणात भारतीय वायुसेनेचा विस्तार होत नव्हता.
या सगळ्या कारणांमुळे भारतीय लोक वायुसेना चालवण्यासाठी सक्षम नाहीत. त्यामुळे भारतीय वायुसेना बरखास्त करू असा निर्णय एअर मार्शल सर जाॅन स्टिल यांनी घेतला होता.
मात्र १९३९ साली ब्रिटीश साम्राज्याने हिटलरविरूद्ध युद्ध घोषीत केलं होतं. तेव्हा आपल्याला वायुसेनेची जास्त प्रमाणात मदत लागेल या हेतुने ब्रिटीशांनी भारतीय वायुसेना वाढवण्याचा निर्णय घेतला. वायुसेनेच्या प्रगतीसाठी आणि विस्तारासाठी १७ दशलक्ष पाऊंड दिले.
कराची, बाँम्बे, कोचीन, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी वायुसेनेत सिव्हीलयन घेण्यात आले. १९३८ च्या शेवटी भारतीय वायुसेनेत तब्बल २०० अधिकारी आणि कामगार होते. तसंच या वायुसेनेते अमेरिकेने तयार केलेल्या अनेक उपकरणांना जोडण्यात आलं त्यांना सक्षम करण्यात आलं.
दुसऱ्या महायु्द्धात भारतीय वायुसेनेनं प्रत्यक्षात भाग घेतला नव्हता. मात्र ब्रिटीशांच्या वायुसेनेला भारतीय वायुसेनेचा पाठिंबा होता. त्यांना संरक्षण देण्यात येत होतं. त्यामुळे या महायुद्धात भारतीय वायुसेनेनं भक्कम अशी कामगिरी केली होती.
या कामगिरीमुळे भारतीय वायुसेनेला राॅयल ही पदवी देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या महायु्द्धानंतर राँयल इंडियन एअर फोर्स असं भारतीय वायुसेनेचं नामकरण करण्यात आलं होतं. तसंच वायुसेनेत जवळपास १६०० अधिकारी आणि ३०००० हजाराच्यावर सैनिक झाले होते.
१९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला. त्यानंतर मात्र वायुसेनेची वाताहात झाली. कारण अनेक महत्वाची ठिकाणं आणि विमानं ही पाकिस्तानात होती. विभागणीमुळे यावर परिणाम झाला. मात्र या सगळ्यातून वायुसेना टिकून राहिली आणि १९५० साली भारत गणराज्य झाल्यानंतर राॅयल ही पदवी काढून फक्त भारतीय वायुसेना आस्तित्वात आली.
भारत आणि पाकिस्तान फाळणीनंतर काश्मिर संस्थानाच्या संघर्षात भारतीय वायुसेनेनं मोठं सहकार्य केलं होतं.
मात्र, स्वातंत्रानंतर भारतीय वायुसेना आपल्या कतृत्वानं आणि पराक्रमानं वृद्धीगंत होत गेली. आणि भारताच्या गौरवशावली इतिहासात आपल्या पराक्रमाचे ठसे उमटवत आहे. सध्य़ा भारतीय वायुसेनेला ९० वर्षे झाली आहेत. मात्र एवढ्या वर्षातला भारतीय वायुसेनेचा पराक्रम, झंझावात आणि संघर्ष हा वाखाण्याजोगा आहे आणि भारतीयांसाठी अभिमानाचा आहे.
हे ही वाच भिडू.
- कारगिल युद्ध , सर्जिकल स्ट्राईक ते आजचा एयर स्ट्राईक या मागे आहे हा शूर योद्धा.
- युद्धभूमीवर उतरणारी पहिली महिला एअरफोर्स पायलट, जिला कारगिलमध्ये शौर्यपदक मिळालं !
- स्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली होती.
- यशवंतरावांच्या एका आदेशावर २२ भारतीय विमाने पाकिस्तानात घुसली होती.