कमोड की भारतीय बैठक ; दोन्हीकडच्या गोष्टी घेवून हमखास पोट साफ करणारा फॉर्म्युला आलाय

सध्या भारताचा प्रॉब्लेम काय आहे माहिताय.

हिंदू-मुस्लीम, मोदींची सत्ता, राज्यातली महाविकास आघाडी, अर्थव्यवस्था, क्रिप्टोकरन्सी, शेअरमार्केट, IPL, ड्रिम इलेव्हन, साऊथ इंडस्ट्री, काश्मिरी पंडीत, आगामी महानगरपालिका निवडणूका….

तर नाही..

सगळ्यात मोठ्ठा प्रॉब्लेम आहे हलक होण्याचा. निम्म्यापेक्षा जास्त लोकांची सकाळची पोटं हलकी होत नाहीत. पोट साफ न होणं आणि तासभर बसून राहणं हा सगळा प्रॉब्लेम आहे. आणि हा मुख्य प्रॉब्लेम दुर्लक्षित होतोय कारण या प्रॉब्लेमपायी लोकं संडासात जास्त वेळ बसून जगातल्या सगळ्या गोष्टींवर मत व्यक्त करु लागलेत..

बर आत्ता तासभर बसणं शक्य झालय कारण बऱ्याच घरात कमोड आलेत. सिटींग पोजिशन ही ऑफिसच्या खुर्चीसारखीच असल्यानं तासभर बसणं काही जड वाटत नाही. पण कमोडचा प्रॉब्लेम असा आहे की वैज्ञानिक कारणानुसार ही पद्धत योग्य नाही. कमोडमध्ये बसल्यामुळे अनेकांची पोटं रिकामी होत नाही, स्पष्ट सांगायचं तर कुथता येत नाही. योग्य ठिकाणी दाब देता येत नाही.

अन् दूसरीकडे इंडियन टॉयलेट आहेत. याचं कसय की पोट रिकाम व्हायला एकदम बेस्ट. पण इथं तासभर बसणं शक्यच नसतय.

दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एका वयानंतर इंडियन टॉयलेट वापरता येत नाहीत. ज्यांना गुडघ्याचा आजार झाला आहे त्यांना तर हे अशक्यच असत. घरातल्या म्हाताऱ्यांना त्यांची अडचण विचारली तर सगळा प्रकार रितसर ते सांगतील.

दूसरीकडं काही घरांमध्ये अजूनही इंडियन टॉयलेट आहेत. तिथं तासभर बसणं अशक्य असतय. म्हणजे काय तर दोन्हीकडं चांगल्या गोष्टी आहेत अन् दोन्हीकडं प्रॉब्लेम आहेत. हे म्हणजे कॉंग्रेस पण भारी अन् भाजप पण भारी पण दोन्हीकडं काहीतरी गंडलय अस झालय.

असो तर यावर तिसऱ्या आघाडीसारखा तिसरा पर्याय आणलाय..

अन् तो आणलाय आम आदमीने…

या पद्धतीचं नाव आहे.. SquatEase Indian Toilet.. 

सत्यजित मित्तल या मुलाने MIT Institute of Design मधून शिक्षण घेतलय. त्यानेच हा पर्याय आणलाय. २०१६ साली त्याच्या डोक्यात आलेली ही आयडिया आत्ता मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहे.. 

आत्ता नक्की या पोराने काय केलय..

तर इंडियन टॉयलेटला बेस दिलाय. पाठीमागून जरा चढ देण्यात आल्यामुळे बॅलन्स करणं सोप्प होतय. तुम्ही फोटोत बघत असाल तसाच हा प्रकार.

Screenshot 2022 05 16 at 11.02.02 PM

पुर्वीच्या प्रकारात काय होतं तर बॅलन्स करता येत नाही. विशेष म्हणजे ज्या लोकांना कमोडची सवय लागते त्या लोकांना तर इंडियन टॉयलेट वापरता देखील येत नाहीत. शिवाय गुडघ्यांचा आजार असणाऱ्यांना देखील यावर बसता येत नाही. पण पाठीमागे बेस लावल्याने काय. होत तर भार पुढे पडतो आणि शरीर बॅलन्स करणं सोप्प जात.

शिवाय दोन्ही प्रकारच्या टॉयलेटमध्ये जो सुवर्णमध्ये गाठायचा होता तो इथे गाठण्यात आला आहे हे सहज दिसून जातं.

बर आत्ता हे आम्हीच सांगत असतो तर भपाऱ्या मारतोय म्हणून विषय सोडून देण्यासारखा असता. पण भारत सरकारच्या Prototyping विभागाकडून देखील याला मदत मिळाली आहे. ऑर्थोपेडिक विभागामार्फत गेली चार वर्ष वेगवेगळ्या टेस्ट करुन या प्रोटोटाईपला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे.

त्यानंतर 2018 च्या वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन सिंगापूर यांच्या भागीदारीतून हे टॉयलेट मार्केटमध्ये देखील आणण्यात आलेले आहे.

दूसरीकडे याचा मोठ्या प्रमाणावर वापर मागील कुंभमेळ्यात करण्यात आलेला होता. इथे ५ हजारांहून अधिक अशा प्रकारचे टॉयलेट देण्यात आले होते. त्यानंतरच लोकांना या पद्धतीचं महत्व जरा चांगल्या पद्धतीने कळालय.

बाकी तुमचं काय मत असेल ते सांगा, खा..प्या..आणि मज्जा करा…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.