टिपू सुलतान मरेपर्यन्त राम लिहलेली अंगठी घालत होता

१७९९ साली टिपू सुलतान श्रींगपट्टनम च्या लढाईत मारला गेला. त्याचे मृत शरीर जेव्हा त्याच्या सहकार्यांच्या हाती लागले तेव्हा त्याच्या हातात तलवार तशीच होती. त्याच्या बोटात एक अंगठी होती ज्यावर राम लिहण्यात आलं होतं.

ही अंगठी ४१ ग्रॅम सोन्याची होती. पुढे ही अंगठी ब्रिटीश लंडनला घेवून गेले. २०१४ साली त्याचा लिलाव करण्यात आला आणि लंडनच्या क्रिस्टीम लिलावकेंद्रावरून ती १ लाख ४५ हजार पाऊंड इतक्या रक्कमेला एका अज्ञात व्यक्तीने विकत घेतली. 

टिपू सुलतान हा मुस्लीम होता. म्हणून आज कट्टर हिंदूत्ववादी टिपू सुलतान हा कसा देशद्रोही होता हे सांगताना दमत नाही. त्याने हिंदू लोकांवर अत्याचार केले, मंदीरे उद्ध्वस्त केली अस सांगण्यात येत. पण यातील एकाही गोष्टीबाबत लोकांकडे ठाम पुरावा नसतो. तरिही दूर्देव अस की, टिपू सुलतान बाबत या गोष्टी पटतात. 

टिपू सुलतान यांची बदनामी कशी होत गेली त्याबाबतचा एक किस्सा ओडिसाचे माजी राज्यपाल आणि गांधीवादी नेते प्रा. बी.एन. पांडेय यांनी आपल्या इतिहास के साथ अन्याय या पुस्तकात लिहला आहे. 

ते लिहतात, 

प्रा. पांडेय लिहतात की टिपू सुलतान याला हिंदूधर्मविरोधी दाखवण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले जातात याची माहिती मला एक शोधनिंबध लिहताना माहिती झाली. 

झालं अस की, 

जेव्हा मी अलाहाबाद विद्यापीठात टिपू सुलतान यांच्या संबधात रिसर्च करत होतो. याच काळात हिस्ट्री असोशिएशनचे काही विद्यार्थी त्यांच्या असोशिएशनचे उद्घाटन करण्यासाठी माझ्याकडे आले होते. त्यातीलच एकाकडे टिपू सुलतान संबधित पुस्तक होते. हे पुस्तक घेवून मी चाळू लागलो तेव्हा एक वाक्य मला दिसलं, यामध्ये लिहण्यात आलं होतं की, 

तीन हजार ब्राह्मणो ने आत्महत्या कर ली, क्यों की टिपू उन्हे जबरदस्ती मुसलमान बनाना चाहतां था. 

या पुस्तकाचे लेखक महामहोपाध्याय डॉ. परप्रसाद शास्त्री होते. जे कलकत्ता इथल्या विश्वविद्यालयात संस्कृत विभागाचे प्रमुख होते. मी लागलीच डॉ. शास्त्रींना पत्र लिहून टिपू सुलताना संबधित लिहलेल्या या वाक्याचा संदर्भ विचारला. मात्र उत्तर मिळालं नाही. तरिही मी पत्र लिहीत गेलो. अखेर कंटाळून त्यांनी मला उत्तर पाठवलं. त्यात मैसूर गॅजिटियरचा संदर्भ सांगण्यात आला. 

म्हैसूर गजेटियर कुठेच मिळत नसल्यामुळे मी  मैसूर विश्वविद्यालयाचे कुलपती सर बृजेन्द्र नाथ सील यांना पत्र लिहलं आणि असा संदर्भ म्हैसूर गॅजेटमध्ये आहे का अशी विचारणा केली. त्यांनी प्रा. कन्टईया यांनाकडे माझं पत्र पाठवलं. ते तेव्हा म्हैसूर गॅजेटचे नवीन संस्करण करण्याचा कामात व्यस्त होते.

त्यांनी मला कळवल की अशा प्रकारच्या कोणत्याच घटनेची नोंद म्हैसूर गॅजेटमध्ये नाही. आणि स्वत: म्हैसूर गॅजेटवर काम करत असल्याच्या संदर्भ देवून सांगितलं की अशी कोणतीही घटना आजपर्यन्त माझ्या वाचनात आली नाही आणि यामध्ये तथ्य असू शकेल असे कोणतेही पुरावे नाहीत. हे फक्त कपोकल्पित रचलेल्या गोष्टी असाव्यात. 

टिपू सुलतानचे प्रधानमंत्री पुनैया एक ब्राह्मण व्यक्ती होते तर सेनापती कृष्णराव देखील ब्राह्मण होते. बी.एन. पांडेय सांगतात म्हैसूर विश्वविद्यालयातून मला १५६ मंदिरांची यादी देण्यात आली ज्यामध्ये टिपू सुलतान या मंदिरांना वार्षिक अनुदान देत असल्याची नोंद आहे. त्याचसोबत त्यांना टिपू सुलतान याने श्रृंगेरी मठाचे जगद्रुरू शंकराचार्यांना लिहलेला पत्रांच्या फोटो कॉपी देखील पाठवल्या. हे पत्र वाचल्यानंतर शंकराचार्य आणि टिपू सुलतान यांच्या घनिष्ठ  संबंध असल्याचं स्पष्ट झालं. 

म्हैसूरच्या राजांच्या प्रथेप्रमाणे टिपू सुलतान रोज सकाळी रंगनाथ मंदीरात जावून दर्शन घेत असे.  कर्नाटक पुरातत्व विभागाअंतर्गत श्रृगेरी मठाचे शंकराचार्य आणि टिपू सुलतान यांच्या दरम्याची जी पत्र प्राप्त झाली आहेत त्यामध्ये टिपू सुलतान म्हणतो, सर्व जगाच्या कल्याणासाठी तूम्ही तपस्या आणि प्रार्थना करा. याचसोबत तो सांगतो की तुम्ही म्हैसूरमध्ये पुन्हा या कारण राज्यामध्ये चांगली माणसं वास्तव करत असतील तर राज्यात पाऊस पाणी चांगला होता. राज्य खूष राहतं. 

यंग इंडिया या पुस्तकात लिहण्यात आलं आहे की,

टिपू सुलतान श्री वेंकटरमण, श्री निवास आणि श्रीरंगनाथ सारख्या मंदिरांना जमिनी आणि बहुमुल्य किंमतीच्या भेटवस्तू द्यायचा.  त्या मंदीरांना दानधर्म तर करायचा पण पूजा अर्चेवर देखील त्याचा विश्वास होता. 

टिपू सुलतान अखेर ब्रिटीशांसोबत लढाई करताना गेला. तो गेला तेव्हा लिहण्यात आलं, 

ख़ुदाया, जंग के ख़ून बरसाते बादलों के नीचे मर जाना, लज्जा और बदनामी की जिंदगी जीने से बेहतर है।

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Nawin W says

    Yes, Tipu Sultan is treated differently by different groups. They who oppose him says that Tipu became more secular in later part of his carrear when his Kingdom became weak. When he was strong he did commit atrocities on Hindus. Can u check the reality and inform. Or the atrocities were more to do with politics and not religion.

Leave A Reply

Your email address will not be published.